WhatsApp Calling साठी आले नवे फीचर्स, मिळतील स्नॅपचॅट सारखे इफेक्ट्स
कॉलिंग आणखी मजेदार करण्यासाठी WhatsApp ने अनेक नवीन फीचर्स आणले आहेत. व्हिडीओ कॉलसाठीही नवीन सुविधा आली आहे.
WhatsApp ने कॉलिंगसाठी एक-दोन नव्हे तर अनेक नवीन फीचर्स आणले आहेत. हे Android आणि iOS दोन्ही वापरकर्त्यांसाठी आणले गेले आहेत.
WhatsApp च्या ब्लॉग पोस्टनुसार, आता तुम्हाला ग्रुपमधील सर्व सदस्यांना ग्रुप कॉलमध्ये इन्व्हाईट करायचे नसेल, तर तुम्ही ग्रुपमधील काही सदस्यांची निवड करू शकता.
ग्रुप कॉलमध्ये निवडक काँटॅक्ट्स निवडण्यास सक्षम
स्नॅपचॅटप्रमाणेच यूजर्सना WhatsApp वर व्हिडिओ कॉलसाठी दहा इफेक्ट्स मिळतील. यामध्ये तुम्हाला पप्पी इयर्स, अंडरवॉटर, कराओकेसाठी मायक्रोफोन देणे इ. फीचर्स मिळतील.
व्हीडिओ कॉलसाठी इफेक्ट
डेस्कटॉपवर चांगल्या कॉलिंगसाठी, आता जेव्हा तुम्ही WhatsApp डेस्कटॉप ॲपवरील कॉल टॅबवर क्लिक कराल तेव्हा तुम्हाला कॉल सुरू करण्यासाठी, कॉल लिंक तयार करण्यासाठी किंवा थेट नंबर डायल करण्यासाठी अनेक पर्याय मिळतील.
डेस्कटॉपवर कॉल करणे झाले सोपे
डेस्कटॉप असो किंवा मोबाईल फोन, आता तुम्हाला दोन्हीकडून चांगली व्हीडिओ कॉलिंगदरम्यान चांगली कॉलिटी मिळेल. तुम्हाला दोन्ही कॉल प्रकारादरम्यान क्लियर कॉलिटीसह हाय रिझोल्यूशन व्हिडिओचा लाभ मिळेल.