अरेरे! VI ने कमी केली दोन लोकप्रिय प्लॅन्सची वैधता, पहा किंमत

VI ने अलीकडेच प्लॅन्सच्या किमतीत वाढ केली. त्यात आता VI ने दोन प्रीपेड प्लॅनमधील फायदे देखील कमी केले.

VI ने 666 आणि 479 रुपयांच्या दोन प्रीपेड प्लॅनची ​​वैधता कमी केली आहे.

आता VI ने 479 रुपयांच्या प्लॅनची ​​वैधता 8 दिवसांनी आणि 666 रुपयांच्या प्लॅनची ​​वैधता 13 दिवसांनी कमी केली आहे.

VI च्या 479 रुपयांच्या प्लॅनची नवी वैधता 48 दिवसांची आहे. ज्यात डेली 1GB डेटा, अमर्यादित कॉलिंग , डेली 100SMS मिळतील.

VI चा 666 रुपयांचा प्लॅन आता 64 दिवसांच्या वैधतेसह येईल. यामध्ये दररोज 1.5GB डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 SMS मिळतील.