30000 रुपयांच्या अंतर्गत टॉप 5 कॅमेरा स्मार्टफोन्स,

Top 5 Camera Phones 

तुम्ही उत्कृष्ट कॅमेरा क्षमतेसह मध्यम-श्रेणीच्या स्मार्टफोन शोधात असाल, तर तुमचा शोध संपला आहे. 30,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे पुढील टॉप 5 कॅमेरा फोन आहेत, ज्यांचा तुम्ही नक्कीच विचार केला पाहिजे.

30000 रुपयांअंतर्गत येणारे कॅमेरा फोन्स

Honor 200 ट्रिपल कॅमेरा सेटअपसह सुसज्ज आहे. ज्यामध्ये 50MP वाइड लेन्स, 50MP टेलिफोटो लेन्स आणि 12MP अल्ट्रावाइड लेन्स आहेत. आकर्षक सेल्फीसाठी यात 50MP फ्रंट-फेसिंग कॅमेरा देखील आहे. डिव्हाइसमध्ये 6.7-इंचाचा OLED डिस्प्ले आहे ज्याचा 120 Hz रीफ्रेश दर आहे. तुम्ही विजय सेल्सवरून फोन 29,999 रुपयांना खरेदी करू शकता.

Honor 200

Oppo F27 Pro+ Amazon India च्या वेबसाइटवर 29,999 रुपयांना उपलब्ध आहे. डिव्हाइसमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये 64 MP वाइड लेन्स, 2 MP मॅक्रो लेन्स आणि 8 MP फ्रंट-फेसिंग कॅमेरा जबरदस्त आकर्षक फोटो आणि सेल्फी कॅप्चर करण्यासाठी आहे.

Oppo F27 Pro+

Vivo V40e फोन ड्युअल कॅमेरा सेटअपसह 50MP वाइड लेन्स आणि 8MP अल्ट्रावाइड लेन्ससह एक उल्लेखनीय फोटोग्राफी अनुभव देतो. यात हाय कॉलिटी सेल्फीसाठी यात 50 MP फ्रंट-फेसिंग कॅमेरा देखील आहे. Flipkart वरून तुम्ही 28,999 रुपयांमध्ये ते मिळवू शकता.

Vivo V40e

Realme GT 6T सह, तुम्ही 50MP वाइड लेन्स आणि 8MP अल्ट्रावाइड लेन्स असलेल्या ड्युअल कॅमेरा सेटअपसह जबरदस्त फोटो कॅप्चर करू शकता. यात निर्दोष सेल्फीसाठी 32MP फ्रंट-फेसिंग कॅमेरा देखील आहे. तुम्ही हा फोन Flipkart वरून 29,817 रुपयांना खरेदी करू शकता.

Realme GT 6T

Samsung Galaxy S23 FE फोन ट्रिपल कॅमेरा सेटअपसह सुसज्ज आहे. ज्यामध्ये 50MP वाइड लेन्स, 8MP टेलिफोटो लेन्स आणि 12MP अल्ट्रावाइड लेन्स आहेत. जबरदस्त सेल्फीसाठी डिव्हाइसमध्ये 10MP फ्रंट-फेसिंग कॅमेरा देखील आहे. सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइटवरून तुम्ही फोन 29,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

Samsung Galaxy S23 FE