लेटेस्ट OnePlus 13 सिरीज भारतात अखेर लाँच, जाणून घ्या किंमत

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता OnePlus कंपनीने अखेर आपली बहुप्रतीक्षित OnePlus 13 सिरीज भारतात लाँच केली आहे.

या सिरीज अंतर्गत OnePlus 13 आणि OnePlus 13R स्मार्टफोन भारतात सादर करण्यात आले आहेत.

या फोन्समध्ये मागील मॉडेल्सपेक्षा आणखी सुधारित कॅमेरा, वर्धित वॉटरप्रूफिंग, सुधारित डिझाइन आणि अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेन्सर यासह प्रभावी अपग्रेड सादर करण्यात आले आहेत.

12GB + 246GB = 69,999 रुपये 16GB + 512GB = 71,999 रुपये 12GB + 1TB = 89,999 रुपये

OnePlus 13 5G ची भारतीय किंमत

OnePlus 13 5G या फोनची विक्री 10 जानेवारी 2025 पासून सुरू होईल. ICICI बँक क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना OnePlus 13 5G च्या खरेदीवर 5,000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल.

12GB + 256GB = 42,999 रुपये 16GB + 512GB = 49,999 रुपये

OnePlus 13R 5G ची भारतीय किंमत

हा फोन 13 जानेवारी 2025 पासून खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात येईल. ICICI बँक क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना OnePlus 13R 5G च्या खरेदीवर 3,000 रुपयांची त्वरित सूट मिळेल.