फक्त दोन दिवस बाकी! Jio चा दीर्घकालीन प्लॅन आत्ताच करा रिचार्ज
अलीकडेच Jio ने 'न्यू इयर ऑफर' अंतर्गत त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये एक नवीन रिचार्ज प्लॅन सादर केला.
या प्लॅनची किंमत 2025 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. हा प्लॅन दीर्घ वैधतेसह येणारा प्लॅन आहे. मात्र, हा प्लॅन मर्यादित काळासाठी सादर करण्यात आला होता.
ही ऑफर फक्त 31 जानेवारीपर्यंत उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये प्रीपेड ग्राहकांना 200 दिवसांची दीर्घकालीन वैधता मिळणार आहे.
तसेच, या प्लॅनमध्ये अमर्यादित 5G इंटरनेट आणि अमर्यादित कॉलिंगचा लाभ मिळेल. ज्यांच्याकडे 4G कनेक्शन आहे, त्यांना दररोज 2.5GB डेटा मिळणार आहे.
तुम्हाला संपूर्ण वैधतेदरम्यान, एकूण 500GB डेटा मिळेल. संपूर्ण वैधतेदरम्यान ग्राहकांना दररोज 100SMS देखील मिळतील.