मोफत OTT सबस्क्रिप्शनसह Jio ने लाँच केले नवीन प्लॅन्स, पहा किंमत

जुलै महिन्याच्या सुरुवातीला तिन्ही खाजगी आणि टेलिकॉम दिग्गज कंपन्यांनी म्हणजेच JIO, AIRTEL आणि VI ने प्लॅन्सच्या किमती वाढवल्या आहेत.

आता Jio ने ग्राहकांना दिलासा देत नवे प्लॅन्स आणून आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यास सुरुवात केली आहे.

नवे प्लॅन्स 329 रुपये, 949 रुपये आणि 1049 रुपयांच्या किंमतीत ऑफर करण्यात आले आहे.

Jio चा 329 रुपयांचा प्लॅन

- 28 दिवसांची वैधता - दररोज 1.5GB डेटा -  अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा - दररोज 100SMS उपलब्ध

या प्लॅनमध्ये JioTV, JioCloud आणि JioCinema सोबत Jio Saavn Pro चे ऍक्सेस मिळेल.

Jio चा 949 रुपयांचा प्लॅन

- 84 दिवसांची वैधता - दररोज 2GB डेटा, 5G वेलकम ऑफर - अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा - दररोज 100SMS उपलब्ध

या JIO रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना 90 दिवसांसाठी Disney+Hotstar सबस्क्रिप्शन मिळेल.

Jio चा 1049 रुपयांचा प्लॅन

- 84 दिवसांची वैधता - दररोज 2GB डेटा, 5G वेलकम ऑफर - अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा - दररोज 100SMS उपलब्ध

SonyLIV आणि ZEE5 मध्ये ऍक्सेस मिळेल. तसेच, तुम्हाला JIoTV मोबाईल ॲपचा ॲक्सेस देखील दिला जात आहे.