सप्टेंबर 2024 मध्ये 30,000 रुपयांअंतर्गत येणारे 5 बेस्ट IQOO स्मार्टफोन

उत्तम परफॉर्मन्ससह तुम्ही बजेट फ्रेंडली IQOO स्मार्टफोनच्या शोधात आहात? येथे आम्ही तुम्हाला 30,000 रुपयांअंतर्गत येणाऱ्या बेस्ट IQOO स्मार्टफोनबद्दल सांगणार आहोत.

 30,000 रुपयांअंतर्गत येणारे 5 बेस्ट IQOO स्मार्टफोन

Amazon वर IQOO Z9s Pro 28,999 रुपयांना सूचिबद्ध आहे. या फोनमध्ये 120Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.7-इंच फुल HD AMOLED स्क्रीन आहे. परफॉर्मन्ससाठी यात 4nm MediaTek Dimensity 7300 प्रोसेसर आहे. 50MP मेन आणि 16MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध. तसेच, फोनमध्ये 5500mAh ची बॅटरी आहे.

iQOO Z9s Pro

Amazon वर IQOO Z9s फोन 24,998 रुपयांना सूचिबद्ध आहे. यात 120Hz रिफ्रेश रेटसह 6.67-इंच FHD+ AMOLED डिस्प्ले आहे. परफॉर्मन्ससाठी मीडियाटेक डायमेन्सिटी 7300 प्रोसेसर उपलब्ध. फोटोग्राफीसाठी 50MP मेन आणि 16MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. फोनमध्ये 5500mAh बॅटरी मिळेल.

iQOO Z9s

Flipkart वर IQOO Neo 7 फोन 29,499 रुपयांना सूचिबद्ध आहे. यात 120Hz रिफ्रेश रेटसह 6.78 इंच फुल एचडी प्लस एमोलेड डिस्प्ले आहे. तसेच, MediaTek Dimension 8200 5G प्रोसेसर उपलब्ध. OIS सह 64MP प्राथमिक, दोन 2MP कॅमेरे आणि समोर 16MP फ्रंट कॅमेरा आहे. यात 5000mAh बॅटरी आहे, जी 120W फ्लॅश चार्जला सपोर्ट करते.

iQOO Neo 7

Amazon वर IQOO Z7 PRO फोन 21,999 रुपयांना सूचिबद्ध आहे. फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.78 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले आहे. तर, फोन ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेंसिटी 7200 प्रोसेसरसह येतो. iQOO Z7 Pro 5G 66W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येतो. फोनमध्ये 64MP प्रायमरी आणि 16MP फ्रंट कॅमेरा मिळेल.

iQOO Z7 Pro

Flipkart वर IQOO Z5 फोन 29,990 रुपयांना सूचिबद्ध आहे. फोनमध्ये 6.67-इंच फुल एचडी प्लस, एलसीडी डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेटसह आहे. मागील कॅमेरा 64MP + 8MP + 2MP आहे, तर फ्रंट कॅमेरा 16MP आहे. परफॉर्मन्ससाठी यात स्नॅपड्रॅगन 778G चिपसेट मिळेल. तर 5000 mAh बॅटरी, 44W फास्ट चार्जिंग सपोर्टसह उपलब्ध.

iQOO Z5