Absolutely Lowest! स्वस्त Samsung Galaxy A14 5G नव्या स्टोरेज व्हेरिएंटसह लाँच, जाणून घ्या किंमत। Tech News

Updated on 07-Jan-2024
HIGHLIGHTS

Samsung Galaxy A14 5G स्मार्टफोन आणखी एका स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लाँच

Samsung Galaxy A14 5G स्मार्टफोन बजेट विभागात सादर करण्यात आला आहे.

या फोनवर तुम्हाला लाँच ऑफर आणि बँक ऑफर देखील दिले जाऊ शकतात.

Samsung ने अलीकडेच Samsung Galaxy A14 5G स्मार्टफोन बजेट विभागात लाँच केला होता. हा स्वस्त स्मार्टफोन कंपनीचा बेस्ट सेलर स्मार्टफोन्सच्या यादीत येतो. दरम्यान कंपनीने या फोनचा आणखी एक स्टोरेज व्हेरिएंट लाँच केला आहे. पूर्वी हा फोन तीन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये खरेदीसाठी उपलब्ध होता. आता ब्रँडने त्याचा 4GB रॅम + 128GB व्हेरिएंट लाँच केला आहे. मात्र, हा फोन सध्या ऑफलाइन मार्केटमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. लवकरच हा फोन ऑनलाइन मोडमध्ये देखील लाँच केला जाईल. बघुयात सविस्तर माहिती-

हे सुद्धा वाचा: Limited ऑफर! 200MP कॅमेऱ्यासह येणार Honor 90 5G सेलमध्ये मिळतोय तब्बल 6 हजार रुपयांनी स्वस्त। Tech News

Samsung Galaxy A14 5G च्या नव्या व्हेरिएंटची किंमत

Samsung Galaxy A14 5G मोबाईलच्या 4GB RAM + 128GB व्हेरिएंटची लिस्टिंग किंमत 15,499 रुपये इतकी आहे. या फोनवर तुम्हाला लाँच ऑफर आणि बँक ऑफर देखील दिले जाऊ शकतात. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा डिव्हाइस 4GB RAM + 64GB स्टोरेज, 6GB RAM + 128GB स्टोरेज आणि 8GB RAM + 128GB स्टोरेजमध्ये आधीपासून उपलब्ध आहे. तुम्ही हा फोन ब्लॅक, डार्क रेड आणि लाइट ग्रीन अशा तीन कलर ऑप्शन्समध्ये येतो.

Samsung Galaxy A14 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy A14 5G स्मार्टफोनमध्ये मोठा 6.6-इंच लांबीचा FHD+ डिस्प्ले आहे, 90Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येतो. डिस्प्लेचे पिक्सेल रिझोल्यूशन 2408 x 1080 इतके आहे. कंपनीने उपकरणामध्ये उत्तम कार्यक्षमतेसाठी Exynos 1330 चिपसेट स्थापित केला आहे, जो वापरकर्त्यांना चांगला अनुभव देतो. फोनच्या स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन 8GB RAM + 128GB पर्यंत अंतर्गत स्टोरेजला सपोर्ट करतो. स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रो SD कार्ड स्लॉट देखील देण्यात आला आहे.

याव्यतिरिक्त, Samsung Galaxy A14 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 50MP प्राइमरी, 2MP मॅक्रो आणि 2MP डेप्थ सेन्सर आहे. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 13MP चा फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये उपलब्ध बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, यात 5000mAh बॅटरी आणि 15W चार्जिंग सपोर्टसह उपलब्ध आहे. सिक्योरिटीसाठी यामध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरसुद्धा मिळेल.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :