POCO X6 सिरीज अखेर भारतात लाँच करण्यात आली आहे. या सिरीज अंतर्गत POCO X6 5G आणि POCO X6 Pro 5G हे दोन स्मार्टफोन सादर करण्यात आले आहेत. स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे झाले तर ह्या स्मार्टफोन्स मध्ये 6.67 इंच डिस्प्ले आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 64MP रियर कॅमेरा आहे. त्याच वेळी, यात सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP फ्रंट कॅमेरा आहे. तर, Pro मॉडेल MediaTek Dimensity 8300-Ultra ने सुसज्ज आहे. हा फोन Android 14 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. चला तर मग बघुयात नवीनतम स्मार्टफोन सिरीज तुमच्या बजेटमध्ये बसेल की नाही?
हे सुद्धा वाचा: Jio ने लाँच केले New International Roaming Packs, जगाच्या कानाकोपऱ्यातून तुमच्या कुटुंबाशी कनेक्ट रहा। Tech News
POCO X6 5G फोनचे 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज मॉडेल 19,999 रुपयांना लाँच केले गेले आहे. तर, त्याच्या 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 21,999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. याचे टॉप मॉडेल 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज वेरिएंटसह येते, ज्याची किंमत 22,999 रुपये आहे. या फोनमध्ये ब्लॅक आणि व्हाइट कलरचे पर्याय उपलब्ध आहेत.
यावतिरिक्त, POCO X6 Pro 5G स्मार्टफोनच्या 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 24,999 रुपये इतकी आहे. तर, त्याच्या 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 26,999 रुपये इतकी ठवेण्यात आहे. फोनमध्ये ब्लॅक, ग्रे आणि यलो कलरचे पर्याय उपलब्ध आहेत.
फोनच्या उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनची सेल 16 जानेवारी 2024 रोजी Flipkart वर सुरु होईल. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला ICICI बँक कार्डद्वारे फोनवर 2000 रुपयांपर्यंत सूट मिळेल.
POCO X6 5G स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश दर 120Hz आहे. तर, POCO X6 Pro फोनमध्ये 6.67 इंच लांबीचा CrystalRes AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रीफ्रेश दर 120Hz आहे.
POCO X6 5G फोन नवीन Snapdragon 7s Gen 2 प्रोसेसरने सुसज्ज आहे, ज्यामध्ये 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज देण्यात आले आहे. तर, POCO X6 Pro 5G फोन MediaTek Dimensity 8300-Ultra प्रोसेसरने सुसज्ज आहे, ज्यामध्ये 16GB LPDDR5x रॅम उपलब्ध आहे. तसेच, फोनमध्ये 1TB UFS4.0 स्टोरेज आहे.
फोटोग्राफीसाठी POCO X6 5G फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 64MP प्रायमरी कॅमेरा OIS सपोर्टसह मिळेल. यात 8MP सेकंडरी कॅमेरा आणि 2MP चा तिसरा कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP फ्रंट कॅमेरा आहे.
त्याबरोबरच, फोटोग्राफीसाठी या POCO X6 Pro 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात देखील 64MP प्रायमरी कॅमेरा OIS च्या समर्थनासह आहे. याव्यतिरिक्त, 8MP अल्ट्रा-वाइड आणि 2MP तिसरा कॅमेरा उपलब्ध आहे. यात सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP फ्रंट कॅमेरा आहे.
POCO X6 5G फोनची बॅटरी 5,100mAh आहे, ज्यामध्ये 67W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. तर, POCO X6 Pro 5G फोनची बॅटरी 5,000mAh आहे, ज्यामध्ये 67W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.