झोलोने आपला नवीन स्मार्टफोन ब्लॅक 1X लाँच केला आहे. हा झोलो ब्लॅक सीरिजचा दुसरा स्मार्टफोन आहे. ह्याची किंमत ९,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. ह्या फोनमध्ये शानदार स्पेक्स दिले गेले आहेत. चला तर मग जाणून घेऊयात काय आहे ह्या स्मार्टफोनची खास वैशिष्ट्ये.
सुरुवात करण्याआधी जाणून घेऊयात की स्मार्टफोनमध्ये आपल्याला काय काय मिळत आहे.
प्रोसेसर:मिडियाटेक 6753
डिस्प्ले: ५ इंच १०८० पिक्सेल
रॅम: 3GB
स्टोरेज: 32GB
कॅमेरा: 13 MP, 5MP
ओएस:अॅनड्रॉईड ५.१
बॅटरी: २४००mAh
ह्या फोनच्या वरच्या बाजूस पाहिले असता, येथे एयरपीससह ५ मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे, ज्याच्या माध्यमातून आपण उत्कृष्ट सेल्फी काढू शकता. त्याचबरोबर येथे एक LED फ्लॅशसुद्धा पाहू शकता.
आणि जर खालच्या बाजूस पाहिले तर, येथे ३ नेव्हीगेशन बटन दिसतील.
ह्या स्मार्टफोनमध्ये ५ इंचाची डिस्प्ले दिली गेली आहे आणि त्याचे पाहण्याचे कोनसुद्धा उत्कृष्ट आहेत.
फोनच्या दोन्ही वरील आणि खालील बाजूस फॉक्स लेदरची ग्रिप दिली आहे. त्याशिवाय तळाशी आपल्याला २ स्पीकर ग्रिलसुद्धा दिसतील.
मॅट आणि ग्लॉसी बॅकच्या जागेवर ह्या स्मार्टफोनला रिफ्लेक्टिव PVC बॅक दिली गेली आहे.
त्याशिवाय ह्या स्मार्टफोनमध्ये १३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरासुद्धा दिला गेला आहे. त्याशिवाय ह्या फोनमध्ये आपल्याला LED फ्लॅशसुद्धा दिला आहे.
फोनच्या डाव्या बाजूस एक पॉवर बटण आणि वॉल्यम रॉकर बटन दिले गेले आहे. तेथेच उजव्या बाजूस एक सिम स्लॉट दिला गेला आहे.