मोबाईल डिवायसेस निर्माता कंपनी शाओमीने काही दिवसांपूर्वी भारतात आपला नवीन स्मार्टफोन Mi मॅक्स लाँच केला. भारतात ह्या स्मार्टफोनची किंमत १४,९९९ रुपयांपासून सुरु होते. डिस्प्लेच्या बाबतीत हा कंपनीचा भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा स्मार्टफोन आहे. हा दोन व्हर्जनमध्ये लाँच केला गेला आहे. स्नॅपड्रॅगन 650 प्रोसेसर, 3GB रॅम आणि 32GB अंतर्गत स्टोरेज आणि दुस-या व्हर्जनमध्ये स्नॅपड्रॅगन 652 प्रोसेसर, 4GB रॅम आणि 128GB चे अंतर्गत स्टोरेज आहे. स्नॅपड्रॅगन 650 प्रोसेसरने सुसज्ज असलेल्या 3GB रॅम व्हर्जनची किंमत १४,९९९ रुपये आहे. तर स्नॅपड्रॅगन 652 प्रोसेसरने सुसज्ज असलेल्या 4GB व्हर्जनची किंमत १९,९९९ रुपये आहे. ह्या फोनचा पहिला फ्लॅश सेल ६ जुलैला Mi.com वर आयोजित करण्यात आला आहे. हा फोन १३ जुलैपासून ओपन सेलमध्ये उपलब्ध होईल. चला तर मग झटपट पाहूया ह्या स्मार्टफोनची खास झलक आणि त्याची ठळक वैशिष्ट्ये….
सर्वात आधी माहित करुन घेऊयात ह्याची ठळक वैशिष्ट्ये…