Wiperoid: हा अॅप ठरणार मोबाईल चोरीच्या गंभीर प्रश्नावर रामबाण उपाय

ने Poonam Rane Poyrekar | अपडेट May 31 2016
Wiperoid: हा अॅप ठरणार मोबाईल चोरीच्या गंभीर प्रश्नावर रामबाण उपाय

स्मार्टफोन्सबाबत लोकांचे वाढते फॅड लक्षात घेता आता मोबाईलचा वापर आता कामापुरता मर्यादित न राहता आकर्षक मोबाईल घेणे हे एक प्रकारचे स्टेटस बनत चाललय. त्यामुळे मोबाईल चोरी होणे, हॅक होणे अशा गुन्ह्यांचे प्रमाणही वाढत चालले आहे. तसेच पोलीसात तक्रार केल्यास तो मोबाईल कधी पर्यंत मिळेल ह्याची शाश्वती देखील नाही. अशा वेळी ह्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आता गरज आहे ती स्वत:च दक्ष राहण्याची. कारण तुमचा मोबाईल सुरक्षित ठेवणे आता तुमच्या हातात आहे. म्हणून आम्ही आज तुम्हाला अशा अॅपविषयी माहिती देणार आहोत, जेणेकरुन तुमचा मोबाईल चोरी होणार नाही आणि झाल्यास तो त्वरित सापडेल. कारण ह्या अॅपच्या खास वैशिष्ट्यामुळे तुमचा मोबाईल तुमच्याजवळ नसला तरी तुम्ही तो हँडल करुन त्याचे ठिकाण ट्रॅक करु शकता. ह्या अॅपचे नाव आहे Wiperoid. हा अॅप खासकरुन भारतीयांसाठी डिझाईन करण्यात आला आहे. चला मग तर मग पाहूया स्लाइडशोच्या माध्यमातून ह्याची खास वैशिष्ट्ये आणि त्यांची कार्य..

Wiperoid: हा अॅप ठरणार मोबाईल चोरीच्या गंभीर प्रश्नावर रामबाण उपाय

सर्वात आधी नजर टाकूयात ह्याच्या खास फीचर्सवर..

  • अँटी थेफ्ट - जो केवळ एका एसएमएस द्वारा वापरु शकतो.

  • ऑफलाइन अॅनड्रॉईड डिवाइस मॅनेजर- तुमचा मोबाईल इंटरनेटशी कनेक्ट असला पाहिजे

  • रिमोट कॉन्टॅक्ट फाईंडर- संपर्क शोधण्यासाठी

  • इर्मजन्सी अलर्ट - महिलांसाठी फार उपयोगी

Wiperoid: हा अॅप ठरणार मोबाईल चोरीच्या गंभीर प्रश्नावर रामबाण उपाय

ह्या फीचर्सविषयी आता सविस्तर माहिती करुन घेऊया...

अँटी थेफ्ट (Anti-Theft)

फोन चोरीला गेला की, सर्वप्रथम ती व्यक्ती किंवा चोर त्या मोबाईलमधील सिम कार्ड काढून स्वत:चे सिमकार्ड टाकतो जेणेकरुन मोबाईलच्या ख-या मालकाला त्याचा पत्ता लागू नये. पण ह्या अॅपमधील अँटी थेफ्ट पर्यायामुळे जेव्हा तो चोर त्या मोबाईलमध्ये स्वत:चे सिम टाकेल, तेव्हा ख-या मोबाईलधारकाला त्याच्या पर्यायी क्रमांकावर एक एसएमएस अलर्ट येईल ज्यात त्या चोराच्या सिमचा नंबर आणि त्याचे ठिकाण येईल.

Wiperoid: हा अॅप ठरणार मोबाईल चोरीच्या गंभीर प्रश्नावर रामबाण उपाय

ऑफलाइन अॅनड्रॉईड डिवाइस मॅनेजर(Offline android Device Manager)

ह्या वैशिष्ट्यामुळे तुम्ही तुमचा मोबाईल लॉक, लोकेट, त्यातील डाटा डिलिट करु शकता. तसेच जर कोणी तुमच्या गुगल अकाउंटमध्ये साइन इन केलं तर तुमच्या मोबाईल एक विशिष्ट रिंग अलर्टसुद्धा देण्यात येत. पण ह्या सर्वासाठी महत्त्वाची गोष्ट हवी आहे ती म्हणजे तुमचा फोन इंटरनेटशी कनेक्ट असावा लागतो. पण आता तुम्ही Wiperoid च्या मदतीने इंटरनेटशिवाय केवळ एका SMS च्या माध्यमातून तुमच्या फोनला लॉक, रिंग, लोकेट तसेच त्यातील डाटा घालवू शकता. आम्ही पुन्हा एकदा तुम्हाला येथे सांगू इच्छितो, की ह्यासाठी तुम्हाला इंटरनेटची गरज पडणार नाही.

Wiperoid: हा अॅप ठरणार मोबाईल चोरीच्या गंभीर प्रश्नावर रामबाण उपाय

रिमोट कॉन्टॅक्ट फाईंडर

हा एक उत्कृष्ट आणि खूपच अफलातून असा फीचर आहे. उदाहरणार्थ, जर तुम्हाला त्वरित कोणाला कॉल करायचा असेल, पण त्याचा संपर्क क्रमांक तुम्हाला आठवत नसेल, किंवा तुमचा मोबाईल तुम्ही घरी विसरला आहात, अशा वेळी Wiperoid हा देवदूतासारखा तुमच्या मदतीला धावून येईल. जर तुम्ही तुमच्या मित्राच्या किंवा अन्य कोणाच्याही मोबाईलवरुन तुमच्या मोबाईलवरुन तुमच्या मोबाईलवर संबंधित व्यक्तीचे नाव SMS द्वारा पाठवलात, की लगेचच तुमच्या फोनमधील Wiperoid त्या व्यक्तीचा नंबर तुम्हाला Send करेल. हे एक यूनिक आणि अद्भूत वैशिष्ट्य आहे.

Wiperoid: हा अॅप ठरणार मोबाईल चोरीच्या गंभीर प्रश्नावर रामबाण उपाय

इर्मजन्सी अलर्ट
जेव्हा जेव्हा तुम्हाला असुरक्षित वाटेल किंवा तुम्ही कोणत्या संकटात असाल, तर ह्या अॅपच्या मदतीने तुम्ही एसएमएसद्वारा तुमच्या जवळच्या व्यक्तींना किंवा मित्रपरिवाराला जे तुमच्या सध्याच्या लोकेशनपासून जवळ असतील त्यांना एसएमएस अलर्ट पाठवाल. जेणेकरुन ते त्वरित तुमच्या मदतीस धावून येतील. हा अॅप खासकरुन महिला सुरक्षा प्रश्नाला डोळ्यासमोर ठेवून बनविण्यात आला आहे.