पावसाच्या दिवसात मोठे दिव्य असते ते आपला मोबाईल पाण्यापासून सुरक्षित ठेवणे. पावसाच्या पाण्याने तो भिजून खराब होऊ नये म्हणून आपल्याला वेगवेगळे उपाय करुन जणू तारेवरची कसरतच करावी लागते.त्यातच जर एखादा महागडा स्मार्टफोन असला तर पाण्यामुळे त्याचे होणारे नुकसानही आपल्याला परवडण्यासारखे नसते. ह्या प्रश्नावर तोडगा म्हणून आम्ही आणली आहे अशा स्मार्टफोन्सची यादी जे आहेत वॉटरप्रुफ स्मार्टफोन्स. हे स्मार्टफोन्स पाण्यात भिजले तरी, त्याच्या कार्यात कोणताही अडथळा येत नाही. चला तर मग पाहूया कोणते आहेत हे स्मार्टफोन्स…
मोटोरोला मोटो G (3rd gen)
ह्या स्मार्टफोनमध्ये 5 इंचाची 720p डिस्प्ले दिली आहे. त्याचबरोबर ह्यात LTE सपोर्टसह 1.4GHz क्वाड-कोर स्नॅपड्रॅगन 410 प्रोसेसरसुद्धा दिले गेले आहे. हा अॅनड्रॉईड 5.1.1 वर चालतो. ह्यात IPx7 वॉटर रेसिस्टंट देण्यात आले आहे. हा ३ फूट पाण्यात ३० मिनिटे कोणत्याही नुकसानाशिवाय राहू शकतो. ह्या स्मार्टफोनमध्ये 2470mAh ची बॅटरी दिली गेली आहे.
सॅमसंग गॅलेक्सी S7
ह्या स्मार्टफोनमध्ये ५.१ इंचाची QHD डिस्प्ले देण्यात आली आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये एक्सीनोस 8890 प्रोसेसरसह ४जीबीची रॅम दिली गेली आहे. त्याचबरोबर आपल्याला 32GB चे स्टोरेजसुद्धा स्मार्टफोनमध्ये मिळत आहे. ह्याला आपण मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने वाढवू शकता. फोनमध्ये मागील बाजूस १२ मेगापिक्सेलचा ड्यूल पिक्सेल कॅमेरा f/1.7 अॅपर्चर लेन्ससह आणि 5MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरा वाइड अँगल्ससह मिळत आहे. तसेच सॅमसंग गॅलेक्सी S7 मध्ये आपल्याला 3000mAh क्षमतेची बॅटरी मिळत आहे. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड 6.0 मार्शमेलोवर काम करतो. ह्यात फिंगरप्रिंट सेंसरसुद्धा दिला गेला आहे. त्याशिवाय हा स्मार्टफोन वॉटरप्रुफ आहे, जे IP68 प्रमाणित आहे. त्याशिवाय हा स्मार्टफोन ३० मिनिटांपर्यंत 1.5 मीटर पाण्यात राहू शकतात.
सॅमसंग गॅलेक्सी S7 एज
हा स्मार्टफोन S7 एज 5.5 इंचाच्या QHD कर्व्ह्ड एज डिस्प्लेसह लाँच झाला आहे.ह्या स्मार्टफोनमध्ये एक्सीनोस 8890 प्रोसेसरसह ४जीबीची रॅम दिली गेली आहे. त्याचबरोबर आपल्याला 32GB चे स्टोरेजसुद्धा ह्या स्मार्टफोनमध्ये मिळत आहे. ह्याला आपण मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने वाढवू शकता. फोनमध्ये मागील बाजूस १२ मेगापिक्सेलचा ड्यूल पिक्सेल कॅमेरा f/1.7 अॅपर्चर लेन्ससह आणि 5MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरा वाइड अँगल्ससह मिळत आहे. S7 एजमध्ये आपल्याला थोडी मोठी म्हणजेच 3600mAh क्षमतेची बॅटरी मिळत आहे. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड 6.0 मार्शमेलोवर काम करतो. ह्यात फिंगरप्रिंट सेंसरसुद्धा दिला गेला आहे. त्याशिवाय हा स्मार्टफोन वॉटरप्रुफ आहे, जे IP68 प्रमाणित आहे. त्याशिवाय हा स्मार्टफोन ३० मिनिटांपर्यंत 1.5 मीटर पाण्यात राहू शकतात.
सोनी एक्सपिरिया Z5
ह्या स्मार्टफोनमध्ये 5.2 इंचाची पुर्ण HD डिस्प्ले दिली आहे. ह्यात २३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे. ह्यात 3GB चे रॅम आणि 32GB चे अंतर्गत स्टोरेज देण्यात आले आहे. ज्याला आपण मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 256GB पर्यंत वाढवू शकतो. हा अॅनड्रॉईड 6.0 मार्शमॅलोवर आधारित आहे. हा वॉटरप्रुफ स्मार्टफोन आहे.
सोनी एक्सपिरिया M4 अॅक्वा
ह्या फोनमध्ये ५ इंचाची 720p डिस्प्ले देण्यात आली आहे. हा अॅनड्रॉईड 5.0 लॉलीपॉपवर चालतो. हा ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 615 प्रोसेसरवर काम करतो. ह्यात 2GB रॅम देण्यात आली आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये 2400mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. कनेक्टिव्हिटीसाठी ह्यात GPS, ब्लूटुथ 4.1, NFC, युएसबी देण्यात आली आहे. हा वॉटरप्रूफ आणि धूळीपासून संरक्षित आहे.
अॅमेझॉन इंडियावर खरेदी करा सोनी एक्सपिरिया M4 अॅक्वा १९,९९९ रुपयात
सॅमसंग गॅलेक्सी S5
सॅमसंग गॅलेक्सी S5 स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 5 इंचाची डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1920x1080 पिक्सेल आहे. हा स्मार्टफोन ऑक्टाकोर प्रोसेसर आणि 2GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 16GB चे अंतर्गत स्टोरेज देण्यात आले आहे. हा कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 ने सुरक्षित आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये 2800mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. हा IP67 ने प्रमाणित असून धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित करण्यात आला आहे. थोडक्यात हा वॉटरप्रूफ स्मार्टफोन आहे.