बाजारात येणारे नवनवीन गॅजेट्स दिसायला जरी आकर्षक आणि फायदेशीर असले, तरीही ते तितकेच नाजूक आणि हाताळण्यास अवघड आहेत. कारण असे गॅजेट्स पाण्यात पडल्यास, भिजल्यास ते लगेच खराब होतात. तसेच जर ते महागडे किंवा साधे गॅजेट्स जरी असले तरीही आपले आर्थिक नुकसान अटळच असते. अशावेळी हे नुकसान टाळण्यासाठी आपण नेहमी शोधात असतो, ते वॉटरप्रुफ गॅजेट्सच्या, जेणेकरुन ते पाण्यात पडले तरी खराब होणार नाही. म्हणून आम्ही आज तुम्हाला अशाच काही उत्कृष्ट वॉटरप्रुफ गॅजेट्सची माहिती देणार आहोत, जे पाण्यात पडले तरीही खराब होत नाही. चला तर मग माहित करुन घेऊयात कोणते आहेत हे वॉटरप्रुफ गॅजेट्स...
सोनी एक्सपीरिया Z5
वॉटरप्रुफ आणि फिंगरप्रिंट सेंसर असलेला सोनी एक्सपिरिया Z5 हा बाजारात उपलब्ध असलेल्या स्मार्टफोन्सपैकी एक आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये 5.2 इंचाची पुर्ण HD स्क्रीन देण्यात आली आहे. हा अॅनड्रॉईड लॉलीपॉप 5.1 वर चालतो. ह्यात 23 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला आहे.
सोनी स्मार्टवॉच 3
सोनीचे हे स्मार्टवॉच 3 जास्त सूर्यप्रकाशातही चांगल्या पद्धतीने पाहता येते. तसेच हे वॉटरप्रुफ रेटिंग IP68 ने प्रमाणित आहे. तसेच ह्यात मोशन सेंसर्स आणि सोनीचा लाइफलॉग प्लेटफॉर्म देण्यात आला आहे.
Circle Muze वायरलेस ब्लूटुथ स्पीकर ह्याचा उत्कृष्ट आवाज, वायरलेस कनेक्टिव्हिटी आणि पाण्यापासून सुरक्षा ह्या गुणांमुळे हा वापरणे खूपच फायदेशीर आहे. ह्याचे वज ३६३ ग्रॅम आहे आणि ह्याचे परिमाण 18.6x13.4x9.2m आहे.
गो-प्रो हिरो4 सेशन
हिरो सेशन हा सर्वात छोटा आणि आकर्षक असा गोप्रो आहे. हा ३३ फूट खोल पाण्यातही खराब होत नाही. ह्याचे वजन 0.07 ग्रॅम आहे. हा वापरणे खूपच सोपे आहे. ह्याचे उत्कृष्ट डिझाईन आणि रचना यांमुळे हा वापरणे खूपच सोपे होते.
JVC Everio GZ-R320 हा केवळ वॉटरप्रुफ कॅमकोर्डर नसून हा पाण्यावर तरंगतोसुद्धा. हा १६ फूट खोल पाण्यातही चांगला राहतो. हो पण त्यामुळे त्याला दीर्घकाळ पाण्यात ठेवणेही योग्य नाही.