ह्या आठवड्यात लाँच झालेले १० आकर्षक स्मार्टफोन्स

ने Ashvani Kumar | अपडेट Oct 16 2015
ह्या आठवड्यात लाँच झालेले १० आकर्षक स्मार्टफोन्स

जर तुम्हाला तुमच्या कामाच्या व्यापामुळे ह्या आठवड्यात कोणकोणते खास स्मार्टफोन्स लाँच झाले हे माहित नसेल, तर आम्ही तुम्हाला आमच्या ह्या विकली राउंडमध्ये त्याची एक झलक दाखवणार आहे.

ह्या आठवड्यात लाँच झालेले १० आकर्षक स्मार्टफोन्स

मायक्रोसॉफ्ट लुमिया 640 XL LTE

 

ड्युल सिम मायक्रोसॉफ्टने आपल्या नवीन स्मार्टफोन लुमिया 640 XL LTE ड्युल सिमला लाँच केले आहे. हा नवीन स्मार्टफोन मायक्रोसॉफ्ट लुमिया 640 XL ड्युल सिमचा नवीन संस्करण आहे. कंपनीने आपल्या लुमिया 640 XL LTE ड्युल सिम स्मार्टफोनची किंमत १८,६९९ इतकी  ठेवली आहे, मायक्रोसॉफ्ट लुमिया 640 XL ड्युल सिम स्मार्टफोन विंडोज 8.1 ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित आहे. त्याचबरोबर ह्यात ३०जीबीचा क्लाऊ डेटा स्टोरेजसुद्धा मोफत उपलब्ध आहे. तसेच ह्यात इतर अॅप्लीकेशनसुद्धा मोफत उपलब्ध केली आहेत.

ह्या आठवड्यात लाँच झालेले १० आकर्षक स्मार्टफोन्स

मायक्रोमॅक्स बोल्ट Q338 लाँच, किंमत ६,४९९ रुपये

मोबाईल निर्माता कंपनी मायक्रोमॅक्सने आपला नवीन स्मार्टफोन Q338 लाँच केला आहे. कंपनीने ह्या स्मार्टफोनची किंमत ६,४९९ रुपये ठेवली आहे. हा एक ड्युल-सिम स्मार्टफोन आहे, जो ३जी ला सपोर्ट करतो. जर ह्याच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात ५ इंचाचा HD IPS डिस्प्ले दिला गेला आहे, ज्याचे रिझोल्युशन ७२०x१२८० पिक्सेल आहे.

ह्या आठवड्यात लाँच झालेले १० आकर्षक स्मार्टफोन्स

अॅप्पल आयफोन 6S आणि 6S प्लस आता भारतात उपलब्ध

मोबाईल निर्माता कंपनी अॅप्पलने आपले दोन नवीन स्मार्टफोन आयफोन 6S आणि 6S प्लसला भारतात लाँच केले आहे. गुरुवारी रात्री १२ वाजल्यापासूनच अॅप्पल आयफोन 6S आणि आयफोन 6S प्लस खरेदीसाठी उपलब्ध केले आहेत. ह्या नवीन स्मार्टफोनच्या किंमतीबाबत बोलायचे झाले तर ह्यांची किंमत पुढीलप्रमाणे आहे.  आयफोन 6S १६जीबी-६४,८३६ रुपये, आयफोन 6S ६४ जीबी-७४,११७ रुपये, आयफोन 6S १२८ जीबी- ८३,४०१ रुपये, तर आयफोन 6S प्लस १६ जीबी- ७४,११७ रुपये, आयफोन 6S प्लस ६४ जीबी-८३,४०१ रुपये, आयफोन 6S प्लस १२८जीबी-८८,४७८ रुपये.

ह्या आठवड्यात लाँच झालेले १० आकर्षक स्मार्टफोन्स

झोपो स्पीड 7 प्लस स्मार्टफोन लाँच, किंमत, १४,९९९ रुपये

मोबाईल निर्माता कंपनी झोपोने भारतात आपला नवीन स्मार्टफोन स्पीड 7 प्लस लाँच केला आहे. हा स्मार्टफोन झोपो स्पीड 7 ची नवीनतम आवृत्ती आहे. ह्याची किंमत १४,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे आणि हा स्मार्टफोन ऑनलाईन शॉपिंग साइट अॅमेझॉनवर खरेदी करु शकता. हा २५ ऑक्टोबरपासून भारतीय ग्राहकांसाठी उपलब्ध केला जाईल. झोपोच्या स्पीड 7 प्लस स्मार्टफोनबद्दल बोलायचे झाले तर ह्यात ५.५ इंचाची पुर्ण HD डिस्प्ले दिली गेली आहे. त्याचबरोबर हा स्मार्टफोन ६४ बिट मीडियाटेक प्रोसेसर आणि ३ जीबी रॅमने सुसज्ज आहे. हा एक ड्युल सिम 4G LTE स्मार्टफोन आहे. हा अॅनड्रॉईड ५.१ ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. तसेच ह्यात १६जीबीचे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले गेले आहे, ज्याला मायक्रो-SDकार्डच्या माध्यमातून ६४जीबीपर्यंत वाढवले जाऊ शकते.

ह्या आठवड्यात लाँच झालेले १० आकर्षक स्मार्टफोन्स

अॅमेझॉनच्या साइटवर वनप्लस X स्मार्टफोनची स्पेसिफिकेशन झाली लीक

ऑनलाईन शॉपिंग साइट अॅमेझॉनने लवकरच लाँच होणा-या स्मार्टफोन वनप्लस X चा तपशील लीक केला आहे. खरे पाहता, ह्या स्मार्टफोनला काही काळासाठी अॅमेझॉन इंडियाच्या वेबसाइटवर लिस्ट केले होते, मात्र साइटवर कुठेही ह्या स्मार्टफोनच्या किंमती संदर्भात काही खुलासा केला नाही. ह्या संदर्भातील माहिती ट्रू-टेक वेबसाइटने दिली आहे.

ह्या आठवड्यात लाँच झालेले १० आकर्षक स्मार्टफोन्स

मायक्रोमॅक्सच्या साइटवर बोल्ट Q331 आणि बोल्ट S302 स्मार्टफोन लिस्ट

मोबाईल निर्माता कंपनी मायक्रोमॅक्सने आपले २ नवीन स्मार्टफोन्स बोल्ट Q331 आणि बोल्ट S302ला आपल्या अधिकृ वेबसाइटवर लिस्ट केले आहे. तथापि, ह्या यादीत ह्या स्मार्टफोनची किंमत आणि उपलब्धता याबाबत कोणतीही माहिती दिली गेली नाही. ह्या दोन्ही स्मार्टफोन्सची सर्वात खास गोष्ट म्हणजे, हे दोन्ही स्मार्टफोन्स मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपच्या मोफत डेटा पॅकसह येतील. कंपनीने ह्यासाठी एयरटेलसोबत करार केला आहे. त्यामुळे कंपनी ह्याबाबत अधिक माहिती ह्याच्या लाँचवेळी सांगेल, अशी आशा आहे.

ह्या आठवड्यात लाँच झालेले १० आकर्षक स्मार्टफोन्स

सॅमसंग Z3 स्मार्टफोन लाँच, ८जीबीच्या अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज

मोबाईल निर्माता कंपनी सॅमसंगने आपला नवीन स्मार्टफोन Z3 लाँच केला आहे. ह्या स्मार्टफोनची किंमत ८,४९० रुपये ठेवण्यात आली आहे. ह्या स्मार्टफोनची विक्री पुढील आठवड्यापासून सुरु होईल. हा देशभरातील रिटेल स्टोअरमध्ये उपलब्ध होईल. तसेच हा ऑनलाईन शॉपिंग साइट स्नॅपडिलवरुनही खरेदी करु शकता. ह्यात ५ इंचाची HD सुपर AMOLED डिस्प्ले दिली गेली आहे. त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनमध्ये १.३GHz क्वाड-कोर स्प्रेडट्रम SC7730S चिपसेट आणि १जीबी रॅमसुद्धा दिली गेली आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये ८जीबीचे अंतर्गत स्टोरेज आहे ज्याला आपण मायक्रो-एसडी कार्डद्वारा १२८ जीबीपर्यंत वाढवू शकता.

ह्या आठवड्यात लाँच झालेले १० आकर्षक स्मार्टफोन्स

लिनोवो वाइब P1 आणि वाइब P1M स्मार्टफोन्स भारतात लवकरच होणार लाँच

मोबाईल निर्माता कंपनी लिनोवोचा नवीन स्मार्टफोन वाइब P1 लवकरच भारतात लाँच होईल. मिळालेल्या माहितीनुसार, लिनोवो २१ ऑक्टोबरला वाइब P1 स्मार्टफोनला भारतात सादर करेल. त्याचबरोबर असेही सांगितले जातय की, कंपनी आपल्या अजून एक स्मार्टफोन वाइब P1M ला सुद्धा भारतीय बाजारात सादर करेल.

ह्या आठवड्यात लाँच झालेले १० आकर्षक स्मार्टफोन्स

पॅनॅसोनिक P50 आयडल आणि P65 फ्लॅश स्मार्टफोन लाँच

मोबाईल निर्माता कंपनी पॅनॅसोनिकने आपल्या दोन नवीन स्मार्टफोन्स P50 आयडल आणि P65 फ्लॅशला भारतात लाँच केले आहे. पॅनॅसोनिक P50 आयडल आणि P65 फ्लॅशची किंमत क्रमश: ६,७९० आणि ८,२९० आहे.