मायक्रोमॅक्सने गुरुवारी भारतीय बाजारात आपला नवीन स्मार्टफोन मायक्रोमॅक्स कॅनवास एक्सप्रेस 4G लाँच केला. ह्या स्मार्टफोनला 2GB ची रॅम आणि 5 इंचाच्या आकर्षक डिस्प्लेसह लाँच करण्यात आले. ह्या स्मार्टफोनची किंमत ६,५९९ रुपये ठेवण्यात आली आहे.
ह्या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉपसह लाँच झाला. ह्या स्मार्टफोनमध्ये 5 इंचाची 720x1280 पिक्सेलचा उत्कृष्ट HD IPS डिस्प्ले दिला गेला आहे. स्मार्टफोनमध्ये 1GHz क्वाड-कोर मिडियाटेक MT6753P प्रोसेसर आणि 2GB ची रॅम दिली गेली आहे. फोनमध्ये 8GB चे अंतर्गत स्टोरेज दिले गेले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने ३२जीबीपर्यंत वाढवू शकतो. फोटोग्राफीसाठी स्मार्टफोनमध्ये ८ मेगापिक्सेलचा ऑटोफोकस सह रियर कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी स्मार्टफोनमध्ये 4G सह 3G, GPRS/EDGE, वायफाय 802.11 b/g/n, मायक्रो-युएसबी आणि ब्लूटुथ मिळत आहे. त्याशिवाय स्मार्टफोनमध्ये 2000mAh क्षमतेची बॅटरीसुद्धा दिली आहे. मात्र बाजारात असे काही स्मार्टफोन्स आहेत, ज्यांच्याशी ह्याचा तपशील मिळता-जुळता आहे. चला तर मग माहिती करुन घेऊयात ह्या ५ स्मार्टफोन्सविषयी..
मिजू M2
ह्या स्मार्टफोनला चीनमध्ये CNY 599(जवळपास ६,२०० रुपये) लाँच केले गेले होते. स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 5 इंचाची HD(720x1280 पिक्सेल) रिझोल्युशन डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याला AGC ड्रॅगनटेल प्रोटेक्टिव ग्लासने सुरक्षा प्रदान केली गेली आहे. ह्याची पिक्सेल तीव्रता 296ppi आहे आणि स्मार्टफोनमध्ये 64 बिट क्वाड-कोर मिडियाटेक MT6735 प्रोसेसर दिला गेला आहे, जो 1.3GHz स्पीड देतो. त्याचबरोबर स्मार्टफोनमध्ये आपल्याला 2GBची LPDDR3 रॅम आणि Mali T720 GPU मिळत आहे.
श्याओमी रेडमी २ प्राइम
श्याओमी रेडमी २ प्राईम ७ हजारात येणारा सध्याचा सर्वात चांगला स्मार्टफोन आहे. श्याओमी रेडमी २ प्राईम आणि आधीचा रेडमी २ ह्या दोन्ही स्मार्टफोन्सची बरेचशी वैशिष्ट्ये सारखीच आहेत. ह्यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 410 SoC देण्यात आले आहे. तसेच ह्यात रेडमी २ प्रमाणे ८ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि २ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे. फक्त रॅम आणि स्टोरेजची क्षमता ही श्याओमी रेडमी २ प्राईममध्ये दुप्पट करण्यात आली आहे. ह्यात 2GB चे रॅम आणि 16GB चे अंतर्गत स्टोरेज देण्यात आले आहे.
यू यूफोरिया
मायक्रोमॅक्सने अधिकृतरित्या आपला नवीन नेक्स जेन स्मार्टफोन यू यूफोरिया लाँच केला आहे. ह्याची किंमत ६,९९९ रुपये आहे. हा स्मार्टफोन आपल्याला अॅमेझॉनवर मिळेल. ह्या स्मार्टफोनमध्ये ५ इंचाचा ७२०पिक्सेल डिस्प्ले(TFT IPS,16.7M Color, 294 PPI) सोबत गोरिला ग्लास ३ ने संरक्षित आहे. हा ८.२५mm इतका बारीक असून आणि ह्याचे वजन १४३ ग्रॅम आहे. ह्यात ८ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये १६जीबीचे अंतर्गत स्टोरेज आहे. हा अॅनड्रॉईड लॉलीपॉपवर चालतो. ह्यात २२३०mAh ची बॅटरी दिली गेली आहे.
कूलपॅड डेझन 1
कूलपॅड भारतीय स्मार्टफोन बाजारात आलेली नवीन कंपनी आहे. कंपनी भारतात चीनवरुन आपले दोन नवीन स्मार्टफोन्स घेऊन आली आहेत, जे आहेत डेझन १ आणि डेझन X7. डेझन १ विषयी बोलायचे झाले तर, हा एक बजेट स्मार्टफोन आहे आणि त्याचे स्पेक्सही उत्कृष्ट आहे. तर डेझन X7 चे डिझाईन खूप चांगले आहे, तसेच ह्याच्या किंमतीच्या तुलनेत ह्याचे तपशील प्रभावित करणारे आहेत.
लेनोवो A6000 प्लस
लेनोवो A6000 प्लस आणि लेनोवो A6000 मध्ये समान प्रोसेसर आहे, आणि त्यांचे डिझाईनही बरेच मिळतेजुळते आहे.डिस्प्ले तर जवळपास सारखेच आहेत. मात्र A6000 प्लसला 2GB रॅम दिली गेली आहे आणि अंतर्गत स्टोरेज 8GB ऐवजी 16GB करण्यात आली आहे.