अॅनड्रॉईडमुळे आता आपण आपला फोन हवा तसा आकर्षक बनवू शकता. किंबहुना तो इतरांच्या फोनपेक्षा वेगळा आणि उठून दिसावा ह्यासाठी आपण आपल्या फोनवर वेगवेगळे प्रयोगही करत असतो. ज्यात आकर्षक डिस्प्ले थीम, रिंगटोन्स, कॉलर ट्यून, कव्हर इत्यादींचा समावेश आहे. तसेच अॅनड्रॉईडमुळे आपण आपल्या फोनचा युआयही बदलू शकतो. त्यातच भर म्हणून आता गुगल प्ले स्टोरने आपल्यासाठी असे अॅप्सही आणले आहेत, ज्यांच्या मदतीने आपण आपला फोन अजून उत्कृष्ट आणि हायटेक बनवू शकतो. चला तर मग जाणून घेऊयात कोणते आहेत हे १० अॅप्स…
नोकियाद्वारे हा लाँचर असूनसुद्धा आपल्या बीटा टेस्टिंग फेजमध्ये आहे. मात्र हा आपल्या स्मार्टफोनला आकर्षक लूक देण्यात महत्त्वाची कामगिरी बजावू शकतो. ह्याला इन्स्टॉल केल्यानंतर फोटोत दाखवल्याप्रमाणे काहीसा दिसेल.
ह्याविषयी कदाचित तुम्हाला माहितीच असेल. हा अशा लोकांसाठी खूप उत्कृष्ट अॅप आहे ज्यांना आपल्या फोनला नेहमी एक नवीन लुक देण्याची आवड असेल किंवा देऊ इच्छितात.