हे स्मार्टफोन्स देणार आयफोन SE ला कडक टक्कर

ने Poonam Rane Poyrekar | अपडेट Mar 25 2016
हे स्मार्टफोन्स देणार आयफोन SE ला कडक टक्कर

अॅप्पलचा हा नवीन आयफोन SE दोन प्रकारात उपलब्ध आहे. ४ इंचाचा हा आयफोन 16GB आणि 64GB प्रकारात उपलब्ध आहे. ज्याची क्रमश: किंमत ३९९ आणि ४९९ डॉलर आहे. हा स्मार्टफोन अॅप्पलच्या आयफोन 6S आणि 5S चे नवीन आणि वेगळे व्हर्जन असल्याचा दिसतो. हा आयफोन भारतात ८ एप्रिलला लाँच केला जाईल आणि ह्याची किंमत असेल ३९००० रुपये. त्यामुळे लोकांचे असे म्हणणे आहे की केवळ १६ जीबीच्या व्हर्जनसाठी ३९,००० रुपये देणे म्हणजे थोडे जास्तच आहे. कारण त्यापेक्षाही कमी किंमतीत उत्कृष्ट फीचर्स असलेले अनेक स्मार्टफोन्स मिळतात, चला तर मग जाणून घेऊया कोणते आहेत हे स्मार्टफोन्स जे आयफोन SE ला देतील कडक टक्कर…

हे स्मार्टफोन्स देणार आयफोन SE ला कडक टक्कर

LG G4

ह्या स्मार्टफोनमध्ये 5.5 इंचाची QHD रिझोल्युशन डिस्प्ले देण्यात आली आहे. ह्या नवीन स्मार्टफोनमध्ये क्वांटम LCD पॅनल आहे, जो कंपनीनुसार हाय -कॉन्ट्रास्ट, वायब्रंट इमेज ज्यात रंगांचाही समावेश आहे. कंपनीने ह्या नवीन स्मार्टफोनच्या इन-सेल टच डिस्प्लेविषयीही सांगितले आहे. कंपनीनुसार, ह्यामुळे ह्या स्मार्टफोनमध्ये सुपर-रिस्पॉन्सिव फील येतो. त्याचबरोबर कमी प्रकाशातसुद्धा ह्याच्या स्क्रीनवर आपण काम करु शकता. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉपवर चालतो. त्याशिवाय ह्यात क्वाल-कॉम स्नॅपड्रॅगन 808 सह X10 LTE प्रोसेसर आणि 3GB रॅमसुद्धा दिली आहे.

हे स्मार्टफोन्स देणार आयफोन SE ला कडक टक्कर

नेक्सस 6P

हुआवे नेक्सस 6P च्या इतर वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, ह्या स्मार्टफोनमध्ये ५.७ इंचाची QHD डिस्प्ले दिली गेली आहे. ज्याचे रिझोल्युशन १४४०x२५६० पिक्सेल आहे आणि ह्यावर कॉर्निंग गोरिला ग्लास ४ चे संरक्षण दिले गेले आहे. हा स्मार्टफोन 2GHz ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८१० प्रोसेसर आहे आणि ३जीबी रॅम आहे. त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनमध्ये f/2.0 अॅपर्चरचा १२.३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आहे. ज्याचे रिझोल्युशन 4k आहे आणि ह्या स्मार्टफोनमध्ये ८ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. हा पहिला पुर्ण धातू असलेला स्मार्टफोन आहे, जो अॅल्युमिनियमने बनलेला आहे. ह्याशिवाय हुआवे नेक्सस 6P स्मार्टफोनमध्ये ३४५०mAh ची बॅटरी दिली गेली आहे. ह्यात त्वरित चार्ज करण्यासाठी सपोर्ट उपलब्ध आहे. ह्या वैशिष्ट्यामुळे केवळ १० मिनिटांतील चार्जने तुमची बॅटरी ७ तास चालेल.  हा हँडसेट फॉर्स्ट व्हाइट, अॅल्युमिनियम आणि ग्रेफाइट अशा रंगात उपलब्ध होईल.

हे स्मार्टफोन्स देणार आयफोन SE ला कडक टक्कर

गुगल नेक्सस 5X

एलजी नेक्सस 5X स्मार्टफोनबद्दल बोलायचे झाले तर, ह्यात ५.२ इंचाची पुर्ण एचडी डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन १०८०x१९२० पिक्सेल आहे आणि ज्यात कॉर्निंग गोरिला ग्लास ३ ने संरक्षण दिले आहे. त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनमध्ये १.८GHz हेक्सा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८०८ प्रोसेसर आणि २जीबीची रॅम दिली गेली आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये  f/2.0 अॅपर्चरचा १२.३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा (४के रिझोल्युशन) आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनमध्ये २७००mAh ची बॅटरी दिली गेली आहे. ह्यात त्वरित चार्ज सपोर्ट उपलब्ध आहे. १० मिनिटांच्या चार्जमध्ये वापरकर्त्याला ३.८ तासांपर्यंत बॅटरी पॉवर देईल. हा स्मार्टफोन कार्बन ब्लॅक, क्वाटर्ज व्हाईट आणि आइस ब्लू रंगात उपलब्ध होईल.

हे स्मार्टफोन्स देणार आयफोन SE ला कडक टक्कर

सॅमसंग गॅलेक्सी S6

डिस्प्ले: 5.1 इंच, 1440p
प्रोसेसर: एक्सीनोस 7420

रॅम: 3GB

स्टोरेज: 32GB

कॅमेरा: 16MP, 5MP

बॅटरी: 2550mAh

ओएस: अॅनड्रॉईड 6.0

हे स्मार्टफोन्स देणार आयफोन SE ला कडक टक्कर

HTC वन A9

अॅनड्रॉईड 6.0 मार्शमॅलोवर आधारित HTC सेंस युआयवर चालणारा HTC वन A9 गुगलच्या लेटेस्ट मार्शमॅलो ओएसवर चालणारा कंपनीचा पहिला हँडसेट आहे. HTC वन A9 मेटल यूनीबॉडीने सुसज्ज आहे. फोन दिसायला एकदम पातळ आहे आणि ह्याची जाडी ७.२६mm आहे. जर ह्या स्मार्टफोन्सच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 5 इंचाची डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1080x1920 पिक्सेल आहे, त्याचबरोबर हा डिस्प्ले गोरिल्ला ग्लास 4 कोटेड आहे. हा स्मार्टफोन क्वालकॉमच्या नवीन चिपसेट स्नॅपड्रॅगन 617 चिपसेट, 64 बिट्सचे ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि ३जीबीच्या रॅमने सुसज्ज आहे. त्याशिवाय ह्यात 32GB चे अंतर्गत स्टोरेज दिले गेले आहे, ज्याला मायक्रो एसडी कार्डच्या साहाय्याने 2TB पर्यंत वाढवता येऊ शकते. त्याशिवाय ह्या स्मार्टफोनमध्ये १३ मेगापिक्सेलचा रियर आणि 4 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. हा अल्ट्रापिक्सेल तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे.

हे स्मार्टफोन्स देणार आयफोन SE ला कडक टक्कर

मोटोरोला मोटो X स्टाइल

ह्या स्मार्टफोनमध्ये 5.7 इंचाची QHD डिस्प्ले (1440x2560 पिक्सेल) रिझोल्युशन दिले गेले आहे. त्याचबरोबर स्मार्टफोनमध्ये आपल्याला क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 808 हेक्सा-कोर प्रोसेसर दिला गेला आहे, जो 1.8GHz ची गती देतो. स्मार्टफोनमध्ये आपल्याला 3GB ची रॅम ऑफर केली गेली आहे. तसेच ह्यात 16GB आणि 32GB चे अंतर्गत स्टोरेज दिले गेले आहे, ज्याला आपण मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने वाढवू शकतो. तसेच ह्यात फोटोग्राफीसाठी 21 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा f/2.0 अॅपर्चर आणि ड्यूल CCT flash अॅपर्चरसह मिळत आहे.