मोबाईल जगतात सर्वात मोठे आणि नामांकित नाव म्हणजे नोकिया… नोकिया काही काळासाठी फोन जगतापासून दूर राहिला खरा... मात्र अजूनही नोकियाचे प्रत्येकाच्या मनात जे विशेष स्थान आहे त्याला अजिबात धक्का पोहोचलेला नाही. आजही लोक नोकियाच्या स्मार्टफोन्सची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. असे सांगितले जातय की, २०१६ मध्ये नोकिया आपले नवीन फोन C1 अॅनड्रॉईडसह बाजारात रिएन्ट्री करणार आहे. तसेच नोकिया अॅनड्रॉईडसह बाजारात धमाकेदार एन्ट्री करणार आहे, त्यामुळे ती जरा विशेषच असेल असे सांगण्यात येत आहे. चला तर मग जाणून घेऊयात नोकियाच्या अशा फोन्सविषयी ज्याचे डिझाईन यूनिक असण्याबरोबरच आकर्षक सुद्धा आहे. ह्या फोन्सच्या जिवावरच नोकियाने फोन जगताचा एक काळ खूप गाजवलाय. चला तर मग जाणून घेऊयात, ह्या स्मार्टफोन्सविषयी....
नोकिया 6800
ह्याला नोकियाने 2003 मध्ये लाँच केले होते आणि हे आपल्यामध्येच काही खास आहे. जे आपण ह्या चित्रात पाहू शकता. ह्याचे डिझाईन आणि लूक खूपच वेगळे आणि आकर्षक आहे.
नोकिया 3600
हा सुद्धा स्वत:तच एक खास आणि आकर्षक स्मार्टफोन आहे. ह्याच्या किपॅडसह आपल्याला 176x208 पिक्सेल रिझोल्य़ुशनची डिस्प्ले मिळते. ह्यात 4MB मेमरी आणि एक VGA कॅमेरा दिला आहे.
नोकिया 7600
हा फोन तर फोन कमी आणि एक विचित्र गॅजेटच दिसत आहे. मात्र हा सुद्धा एक आकर्षक फोन असल्याचे आपण बोलू शकतो.
नोकिया 7700
नोकियाचा हा फोन, फोन कमी आणि लहान मुलांना खेळता येणारा एक व्हिडियो गेम जास्त वाटतोय. तम्हाला ही कदाचित पहिल्यांदा पाहिल्यावर हा एखाद्या व्हिडियोगेम सारखा वाटेल, मात्र तसे नसून हा एक वेगळ्या डिझाईनचा आकर्षक स्मार्टफोन आहे, ज्याने एके काळी एक चांगलाच रेकॉर्ड बनवला होता.
नोकिया 8910i
ह्याला आपण जर बिझनेस फोन म्हटले तरी वावगं ठरणार नाही. त्यामुळे हा फोनसुद्धा जास्तकरुन बिझनेस करणा-या लोकांनीसुद्धा पसंत केले होते. हा एक आकर्षक फोन होता.
नोकिया 7370
केवळ ह्या डिझाईनला बघूनच अनेक कंपन्यांनी फोन्सची निर्मिती केली. मात्र नोकियाच्या ह्या फोनने बाजारात एन्ट्री करतात, अगदी अल्पावधी काळात लोकांची मन जिंकली. फीचरप्रमाणे डिझाईनच्या बाबतीतही हा फोन इतर फोन्सपेक्षा कमी नाही.
नोकिया 7280
नोकियाचा हा फोन एक लिपस्टिक सारखा दिसतो. मात्र एक जबरदस्त फोन आहे. ह्या आपण अगदी सहजपणे हाताळू शकता, कुठेही ठेवू शकता. त्यामुळे अनेकांना हा फोन आहे हे कदाचित कळणारही नाही, आणि जर एखाद्याला कळाले की हा फोन आहे, तर तो त्याची तोंडभरुन स्तुती केल्याशिवाय राहणार नाही.
नोकिया 3250
कॅमे-याच्या बाबतीत ह्या फोनला एक आकर्षक फोन बोलू शकतो. कारण ह्याचा कॅमेरा आपण हवा तसा फिरवू शकता. फोनला फिरवल्याशिवाय कॅमे-याला कोणत्याही दिशेला नेऊन आपण फोटो काढू शकता.
नोकिया 7900 प्रिज्म
डिझाईनच्या बाबतीत ह्या फोनला कोणीही टक्कर देऊ शकत नाही. आपण कधी विचारच करु शकत नाही की, अशा डिझाईनचाही फोन असू शकतो. मात्र नोकियाने हे देखील शक्य करुन दाखवले आहे. ह्या फोनचे डिझाईन आपल्यातच खूप खास आहे.
नोकिया N91
नोकियाच्या आकर्षक N सीरिजचा हा फोन स्वत:तच खूप खास आहे. ह्या फोनचे डिझाईन खूपच खास आहे. एकूणच एखाद्या फोनमध्ये ज्या गोष्टी आपल्याला हव्या असतात, त्या सर्व ह्या फोनमध्ये आहे.
नोकिया सोडा फोन (कॉन्सेप्ट)
हा फोनसुद्धा सध्या एक कॉन्सेप्ट आहे, मात्र जर हा फोन बाजारात आला तर आपण विचार करु शकता, नोकिया ह्या फोनसह बाजारात किती रेकॉर्ड तोडेल.