आपण कोणता बजेट IEM हेडफोन घ्यावा ह्याबाबत थोडे द्विधा मन:स्थितीत आहात? तर चिंता करु नका, येथे आम्ही तुम्हाला अशा १० चांगल्या IEM हेडफोन्स यादी दिली आहे, जे १००० च्या आत येतात. हा स्लाइडशो तुम्हाला योग्य आणि चांगला असा हेडफोन्स घेण्यास नक्कीच मदत करेल. चला तर मग पाहूयात कोणते आहेत हे हेडफोन्स.
Cowon EM1
किंमत : ९०० रुपये
Cowon EM1 हा खूप लोकप्रिय असा बजेट IEM हेडफोन आहे, जो खूपच समतोल/ बॅलेंन्स्ड प्रतिसाद देणारा हेडफोन म्हणून ओळखला जातो. हा २०-२२०००Hz च्या फ्रिक्वेंन्सी रिस्पॉन्स वापरण्यासाठी 10mm ड्रायव्हर यूनिट्स वापरतो.
Sennheiser CX180 Street II
किंमत : ८७५ रुपये
Sennheiser CX 180 Street II आवाज खूप चांगला आहे आणि जरी किंमतीच्या तुलनेत हा थोडा महागडा असला तरीही ह्या सोबत तुम्हाला २ वर्षाची वॉरंटी मिळते.
क्रिएटिव्ह EP- 630
किंमत: ८३० रुपये
EP-630 हा गेली ८ वर्षापासून आपल्या ग्राहकांना उत्तमोत्तम आउटपुट देण्यास कार्यशील आहे आणि अजूनही ते आपल्या बास साउंड आणि मोठ्या आवाजामुळे लोकांना प्रभावी करत आहे. त्यामुळे बास प्रेमींसाठी आम्ही काहीही विचार करता हा फोन घेण्याचा सल्ला देऊ.
MEElectronics Sport-Fi M6
किंमत: १,०७९ रुपये
तुम्ही MEElectronics हे नाव जास्त ऐकले नसेल, पण हा एक उत्कृष्ट बजेट ऑडियो प्रोडक्ट्स आहे. हा एक उत्कृष्ट अशा डिझाईनसह आणि IPX5 प्रमाणपत्रासहित येतो. ज्यामुळे घाम आणि पाण्यापासून होणारा त्रास टळतो. त्यामुळे हा वापरणे खूप सोयीस्कर होते.
Panasonic RP-HJE350
किंमत: ९९९ रुपये
हा हेडफोन तुमच्या जवळच्या टेकमार्टमधून तुम्ही अनेकदा खरेदी केला असाल. तुम्हाला कधीच ह्याला पर्याय शोधावा लागत नाही. हा तुमची कधीच निराशा करणार नाही. हा सुद्धा IEM प्रकारामधील उत्कृष्ट स्मार्टफोन आहे.
Brainwavz Delta
किंमत: ९९९ रुपये
Brainwavz Delta ईयरफोन हे Cowon EM1 इयरफोनसारखेच आहेत. हे उत्कृष्ट प्रकारचा आवाज, चांगला बास उत्पादित करतो.
Sennheiser CX213
किंमत:९४९ रुपये
हे ईयरफोन CX180 च्या धर्तीवर बनविण्यात आले आहेत. CX213 हा उत्कृष्ट साउंड आणि खूपच रिस्पॉन्सिव फ्रिक्वेन्सी देतात.
Audio Technica ATH-CKL203
किंमत: ८७५ रुपये
Audio Technica ATH CKL203 हे वजनाने खूपच हलके आणि आरामदायी असे हेडफोन्स आहेत. हे आपल्याला चांगल्या किंमतीत उत्कृष्ट दर्जाचा आवाज देतात. हे केबल रॅपसह येतात आणि टीप्सच्या ४ जोड्यांसह येतात.
Sony MDR-EX220LP
Sony MDR-EX220LP स्पष्ट आणि उत्कृष्ट असा साउंड आउटपुट देतात. उच्च बास आऊटपुट हा योग्य रित्या समतोल साधतात.
Mi In-Ear Headphones
किंमत: ९९९ रुपये
शाओमीचे ह्याआधीचे Mi Pistons इयरफोन चांगले होते पण आता नवीन आलेले MI In-Ear हेडफोन हे त्याच्यापेक्षाही चांगले आहेत. ह्यात ड्यूल ड्रायवर सेटअप आहेत आणि ते चांगले साउंड क्वालिटी देतात. त्याची खालची पातळी म्हणावी तितकी चांगली नाही पण बास प्रेमींना हा नक्की आवडेल.