CES 2016 मध्ये स्नॅपड्रॅगन 820 काही काळासाठी चर्चेत होता. त्याचवेळी आम्ही ह्या खास प्रोसेसरसह लाँच झालेला Le मॅक्स प्रो स्मार्टफोन लाँच झालेला पाहिला. असे सांगितले जात होते की, ह्याच प्रोसेसरसह सर्वात आधी सॅमसंगचा गॅलेक्सी S7 लाँच केला जाईल. मात्र ह्या प्रोसेसरसह लाँच केला गेलेला स्मार्टफोन Le मॅक्स प्रो बनला. चला तर मग जाणूून घेऊया ह्यावर्षी अजून कोणते स्मार्टफोन्स ह्या प्रोसेसरसह लाँच केले जातील.
सॅमसंग गॅलेक्सी S7
हाती आलेल्या माहितीनुसार ह्या स्मार्टफोनला सर्वात आधी स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसर लाँच केले जाऊ शकते. सॅमसंगचा हा पहिला स्मार्टफोन असेल ज्यात हा प्रोसेसर पाहायला मिळेल.
एलजी G5/ एलजी जी फ्लेक्स 3
२०१६ मध्ये होणा-या MWC मध्ये ह्या दोन्ही स्मार्टफोन्सला ८२० प्रोसेसरसह लाँच केले जाऊ शकते. त्याचबरोबर अशीही अफवा मिळत आहे की, हे स्मार्टफोन्स मेटल बॉडीसह येऊ शकतात.
शाओमी Mi5
शाओमीसुद्धा आपला हा स्मार्टफोन ८२० प्रोसेसरसह बाजारात आणू शकतो. हा स्मार्टफोनसुद्धा अनेक दिवसापासून चर्चेत आहे आणि वेळोवेळी ह्या संबंधी लीक्सद्वारा बरीच माहिती समोर येत आहे. स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट सेंसर, 4GB रॅम, 16GB आणि 64GB चे अंतर्गत स्टोरेज पर्यायासह येऊ शकतो. तसेच ह्यात २० मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि ८ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा असू शकतो.
LeTV Le मॅक्स प्रो
जसे की आपल्या सर्वांनाच माहितच आहे की, हा जगातील पहिला स्मार्टफोन आहे, जो स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसरसह CES 2016 मध्ये लाँच झाला होता.
सोनी एक्सपिरिया Z6
जर सर्वच कंपन्या आपल्या स्मार्टफोन्समध्ये ह्या प्रोसेसरला आणण्याचा विचार करत आहे, तर ह्यात सोनी कसा मागे राहिल. सोनी आपल्या नवीन स्मार्टफोन Z6 ह्या प्रोसेसरसह लाँच करु शकते.
पुढील विंडोज फोन
२०१६ मध्ये पुढील विंडोज फोन लाँच केला जाणार आहे, त्याला ह्या प्रोसेसरसह लाँच करण्यासंबंधी असल्याचा विचार केला जात आहे.
पुढील नेक्सस स्मार्टफोन
विंडो फोनसह पुढील नेक्सस स्मार्टफोनसुद्धा स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसरसह लाँच केला जाऊ शकतो. ह्या स्मार्टफोनच्या मागील प्रकाराला स्नॅपड्रॅगन 810 प्रोसेसरसह बाजारात आणले होते.
नवीन मोटो X स्मार्टफोन
ह्या स्मार्टफोनच्या नावाविषयी सध्या तरी काही सांगितले जाऊ शकत नाही, मात्र असे सांगितले जातय की, पुढील मोटो X स्मार्टफोनसुद्धा ह्या प्रोसेसरसह बाजाराता आणला जाऊ शकतो.
वनप्लस 3
वनप्लसच्या पुढील वनप्लस 3 स्मार्टफोनमध्ये ह्या प्रोसेसरला स्थान दिले जाऊ शकते.
पुढील HTC वन
अलीकडेच HTC चा A9 स्मार्टफोन खूप चांगला वाटला, मात्र आता ह्याच्या पुढील स्मार्टफोनमध्ये HTC नवीन प्रोसेसरचा समावेश करणार आहे.