येथे आपल्याला अशा स्मार्टफोन्सविषयी माहिती मिळेल, ज्यांना फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात लाँच केले गेले. हे सर्व स्मार्टफोन्स खूपच उत्कृष्ट आहेत. ह्यात काही स्वस्त, काही बजेट तर काही हाय-एंड स्मार्टफोन्स आहेत. चला तर मग माहित करुन घेऊया ह्या स्मार्टफोन्सविषयी सविस्तरपणे...
१) HTC डिझायर 626 ड्यूल सिम 4G
मोबाईल निर्माता कंपनी HTC ने बाजारात आपला नवीन स्मार्टफोन डिझायर 626 ड्यूल-सिम सादर केला आहे. कंपनीने बाजारात ह्या स्मार्टफोनची किंमत १४,९९० रुपये ठेवली आहे. ह्यात 5 इंचाची HD डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 720x1280 पिक्सेल आहे. हा स्मार्टफोन 1.7GHz ऑक्टा-कोर मिडियाटेक MT6752 प्रोसेसर आणि 2GB रॅमने सुसज्ज आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये 16GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले गेले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 32GB पर्यंत वाढवू शकतो. ह्यात 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला.
२) सॅमसंग गॅलेक्सी A5 (2016)
सॅमसंगने अलीकडेच बाजाराता आपला नवीन स्मार्टफोन गॅलेक्सी A5(2016) 29,400 रुपयाच्या किंमतीत लाँच केला आहे. ह्यात 5.2 इंचाची पुर्ण HD डिस्प्ले दिली गेला आहे. हा सुद्धा सुपर AMOLED डिस्प्ले आहे. हा स्मार्टफोन 1.6GHz ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि 2GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 16GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा देण्यात आले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डने वाढवू शकतो. ह्या स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सेलचा रियर आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे. हा स्मार्टफोन 2900mAh बॅटरीने सुसज्ज आहे.
3) जिओनी S6
जिओनी S6 हा स्मार्टफोन १९,९९९ रुपयाच्या किंमतीत भारतात सादर केला गेला. ह्यात 5.5 इंचाची HD डिस्प्ले आहे, ज्याची रिझोल्युशन 720x1280 पिक्सेल आहे. हा स्मार्टफोन 1.3GHz 64- बिट ऑक्टा-कोर मिडियाटेक MT67538 प्रोसेसर आण 3GB च्या रॅमने सुसज्ज आहे. ग्राफिक्ससाठी माली-T720 GPU दिला गेला आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये 32GB चे अंतर्गत स्टोरेज दिले गेले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 128GB पर्यंत वाढवू शकतो. ह्यात 13 मेगापिक्सेलचा ऑटोफोकस रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे.
४) सॅमसंग गॅलेक्सी A7 (2016)
ह्या स्मार्टफोनची किंमत ३३,४०० रुपये आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये ५.५ इंचाची पुर्ण HD डिस्प्ले दिली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1080x1920 पिक्सेल आहे. हा सुपर AMOLED डिस्प्ले आहे. हा स्मार्टफोन 1.6GHz ऑक्टा-कोर चिपसेट आणि 3GB रॅमने सुसज्ज आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये 16GB ची अंतर्गत स्टोरेजसुद्धा आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 128B पर्यंत वाढवू शकतो. ह्या स्मार्टफोनमध्ये १३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिगं कॅमेरा दिला आहे.
५) झोपो हीरो 1
झोपोने भारतीय बाजारात ह्या स्मार्टफोनची किंमत १२,००० रुपये ठेवली आहे. ह्यात ५ इंचाची HD डिस्प्ले दिली आहे, ज्याचे रिझोल्युशन 720x1280 पिक्सेल आहे. ह्या डिस्प्लेची पिक्सेल तीव्रता 293ppi आहे. हा स्मार्टफोन 64 बिट क्वाड-कोर मिडियाटेक MT6735 प्रोसेसर आणि 2GB रॅमने सुसज्ज आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये ग्राफिक्ससाठी माली-T720 MP1 (600GHz) GPU इंटिग्रेटेड आहे. त्याशिवाय ह्यात 16GB चे अंतर्गते स्टोरेजसुद्धा दिले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 64GB पर्यंत वाढवू शकतो. यूजरसाठी 11.13GB वापरासाठी उपलब्ध होईल. ह्यात 13.2 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा आहे.