मागील काही काळापासून Samsung आपल्या स्मार्टफोन्सच्या किमतीत कपात करत आहे. कंपनीने Galaxy M आणि F सीरिजचे स्मार्टफोन स्वस्त केले आहेत. या स्मार्टफोन्सच्या यादीमध्ये Samsung Galaxy M14, Samsung Galaxy M04, Samsung Galaxy F14 आणि Samsung Galaxy F04 यांचा समावेश आहे. या स्मार्टफोन्सच्या नवीन किंमती Amazon India, Flipkart आणि कंपनीच्या साइटवर लाइव्ह देखील झाल्या आहेत.
दरम्यान, कालांतराने Samsung Galaxy S23, S23+ आणि नुकतेच लाँच झालेल्या Samsung Galaxy a05s स्मार्टफोनच्या किमतीत देखील घट करण्यात आली होती. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घ्या सर्व फोन्सच्या नव्या किमती-
कंपनी सॅमसंग गॅलेक्सी M14 स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट बाजारात उपलब्ध आहेत. फोनच्या 4GB रॅम + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 13,490 रुपये होती, पण आता त्याची किंमत 12,490 रुपयांवर आली आहे. तसेच, यात 6GB RAM + 128GB स्टोरेज वेरिएंट देखील आहे, ज्याची किंमत कपातीनंर 13,990 रुपये झाली आहे.
Galaxy M14 5G मध्ये 50 मेगापिक्सेल कॅमेरा आहे. याशिवाय, यात 6000 mAh ची मोठी बॅटरी आहे जी दोन दिवसांचा बॅकअप देईल असा दावा केला जातो. Galaxy M14 5G भारतात 5nm Exynos 1330 प्रोसेसर आणि 128 GB स्टोरेजसह 6 GB रॅमसह लॉन्च करण्यात आला आहे.
Samsung Galaxy F14 स्मार्टफोन दोन स्टोरेज व्हेरिएंटसह येतो. फोनच्या 4GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची नवी किंमत 11,990 रुपये इतकी आहे. तर, त्याचा 6GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंट 15,990 रुपयांना मिळत होता, आता त्याची किंमत 13,490 रुपये झाली आहे.
Samsung Galaxy F14 5G मध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.6-इंच लांबीचा FHD+ IPS LCD डिस्प्ले आहे. समोर वॉटरड्रॉप नॉच आणि कॉर्निंग गोरिला ग्लास 5 लेयर आहे. याशिवाय, डिव्हाइसचे सर्वात मोठे फिचर म्हणजे ते 25W फास्ट चार्जिंग सपोर्टसह मोठ्या 6,000mAh बॅटरीसह सुसज्ज आहे.
Samsung Galaxy M04 फोनच्या सिंगल 4GB RAM + 64GB स्टोरेज मॉडेलची किंमत 7,999 रुपये आहे, जी आता 500 रुपयांनी स्वस्त झाली आहे. म्हणजेच Samsung Galaxy M04 ची नवी किंमत आता 7,499 रुपये इतकी असेल.
Samsung Galaxy M04 मध्ये 720x1600 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.5-इंच लांबीचा HD+ PLS LCD डिस्प्ले आहे. म्हाला या फोनमध्ये Android 14 पर्यंत अपडेट्स मिळतील. प्रोसेसिंगसाठी फोन MediaTek Helio P35 प्रोसेसरने सुसज्ज आहे.
दुसरीकडे, Galaxy F04 ची किंमत देखील 7,999 रुपये आहे, जी आता 1700 रुपयांनी स्वस्त झाली आहे. म्हणजेच Samsung Galaxy F04 ची नवी किंमत आता 6,299 रुपये इतकी असेल.
Samsung Galaxy F04 मध्ये 6.5-इंचाचा HD+ डिस्प्ले आहे, जो 60Hz रिफ्रेश रेटसह येतो. फोनमध्ये ड्युअल सिमसह Android 12 आधारित One UI आहे. फोन MediaTek Helio P35 प्रोसेसर आणि 8 GB व्हर्च्युअल रॅमसह 64 GB पर्यंत स्टोरेजला सपोर्ट करतो.
Samsung Galaxy S24 सिरीज येण्यापूर्वी कंपनीने Galaxy S23 आणि Galaxy S23+ च्या किमतीत 10,000 रुपयांची घट केली आहे. यापूर्वी, Samsung Galaxy S23 5G च्या 128GB मॉडेलची किंमत 74,999 रुपये होती आणि 256GB मॉडेल 79,999 रुपयांना उपलब्ध होते. मात्र, कपातीनंतर हे मॉडेल्स अनुक्रमे 64,999 आणि 69,999 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहेत.
Samsung Galaxy S23 फोनमध्ये 6.1-इंच लांबीचा FHD+ डिस्प्ले आहे. स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी यात 50MP प्राथमिक कॅमेरा आहे. Samsung Galaxy S23 फोनमध्ये 3900mAh बॅटरी देण्यात आली आहे.
पूर्वी Samsung Galaxy S23+ फोनच्या 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 94,999 रुपये आणि 512GB मॉडेलची किंमत 1,04,999 रुपये होती. मात्र, 10,000 रुपयांच्या कपातीनंतर हे स्मार्टफोन्स 84,999 आणि 94,999 रुपयांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहेत. दोन्ही स्मार्टफोनची नवीन किंमत प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Flipkart वर लाइव्ह झाली आहे.
Samsung Galaxy S23+ मॉडेलमध्ये 6.6-इंच लांबीचा FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे.स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. तर, Samsung Galaxy S23+ मॉडेलमध्ये 4700mAh बॅटरी देण्यात आली आहे.
Samsung Galaxy A05s फोन 4GB आणि 6GB रामी व्हेरिएंटमध्ये येतो. यापैकी, 4GB आवृत्तीच्या किंमतीत 1000 रुपयांची कपात करण्यात आली आहे आणि 6GB व्हेरिएंटची किंमत 2000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे.
कपातीनंतर Galaxy A05s चा बेस म्हणजेच 4GB व्हेरिएंट 11,499 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. तर, फोनच्या 6GB व्हेरिएंटची किंमत 12,999 रुपये इतकी झाली आहे. हा हँडसेट लाइट ग्रीन, लाइट व्हायलेट आणि ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.
Samsung Galaxy A05s फोनमध्ये 6.7-इंच लांबीचा FHD+ डिस्प्ले आहे. उत्तम कार्यक्षमतेसाठी हा सॅमसंग डिव्हाइस ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 680 चिपसेटवर चालतो. फोटोग्राफीसाठी, Samsung Galaxy A05s हा ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअपसह सुसज्ज आहे. आकर्षक सेल्फी घेण्यासाठी या फोनमध्ये 13MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
आम्ही सांगितल्याप्रमाणे, सर्व फोनच्या नवीन किंमती Amazon India, Flipkart आणि कंपनीच्या साइटवर लाइव्ह झाल्या आहेत.
Samsung Unpacked 2024 इव्हेंट दरम्यान कंपनी आपली नवीन फ्लॅगशिप Samsung Galaxy S24 सीरीज लाँच करेल. कंपनी नवीन सीरीज अंतर्गत Galaxy S24, Galaxy S24+ आणि Galaxy S24 Ultra लाँच करू शकते.