सॅमसंगने पुन्हा एकदा दोन मध्यम रेंजच्या स्मार्टफोन्ससह बाजारात पाऊल टाकले आहे. हे स्मार्टफोन्स आहेत गॅलेक्सी ऑन5 आणि ऑन 7. हे दोन्ही स्मार्टफोन्स भारतात ३ नोव्हेंबरला लाँच झाले. ह्या स्मार्टफोन्सना फ्लिपकार्टच्या माध्यमातून अगदी सहजपणे घेऊ शकतात. ह्या स्मार्टफोन्सना आम्ही काही काळासाठी वापरुन पाहिले. म्हणून आम्ही विचार केला की, तुम्हाला ह्या स्मार्टफोन्सबाबत ही माहिती देऊयात. चला तर मग जाणून घेऊयात काय खास आहे ह्या स्मार्टफोन्समध्ये?
सर्वात आधी माहित करुन घेऊयात सॅमसंग गॅलेक्सी ऑन 7 च्या वैशिष्ट्यांविषयी
प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 410
सीपीयू: 1.2GHz क्वाड-कोर
रॅम: 1.5GB
डिस्प्ले: 5.2 इंच, 720 पिक्सेल
स्टोरेज: 8GB
कॅमेरा: 13MP, 5MP
बॅटरी: 3000mAh
किंमत: 10,990 रुपये
आता माहित करुन घेऊयात सॅमसंग गॅलेक्सी ऑन ५ च्या वैशिष्ट्यांविषयी
प्रोसेसर: एक्सीनोस 3475
सीपीयू: 1.3GHz क्वाड-कोर
रॅम: 1.5 GB
डिस्प्ले: 5 इंच,720 पिक्सेल
स्टोरेज: 8GB
कॅमेरा: 8MP, 5MP
बॅटरी: 2600mAh
किंमत: 8,990 रुपये
दोन्हीही हँडसेट HD रिझोल्युशन (720x1280 पिक्सेल) TFT टचस्क्रीनसह येतील. मात्र दोन्ही डिस्प्लेच्या आकारात थोडे अंतर नक्की आहे.
पहिल्या नजरेत ह्या दोन्ही स्मार्टफोन्सचे डिस्प्लेचे रंग थोडे फिकट दिसतात. मात्र ठराविक वेळानंतर हे रंग ठीक वाटतात.
दोन्ही स्मार्टफोन्सच्या वरच्या बाजूस 5MP चा फ्रंट फेसिगं कॅमेरा दिला गेला आहे.जो योग्य प्रकाशात उत्कृष्ट फोटो काढण्यात सक्षम आहे.
सॅमसंग अजूनही आपल्या जुन्या डिझाईनसह बाजारात स्मार्टफोन्स आणत आहे. जसे मागील सर्व स्मार्टफोन्समध्ये पाहिले गेले आहे. होम बटण वर आणि त्यासह दोन नेव्हीगेशन बटन. आधीच्या स्मार्टफोन्सप्रमाणे येणा-या काही स्मार्टफोन्समध्ये आतापर्यंत कोणतेही USB-type C पोर्ट पाहायला मिळाले नाही.
जसे की आम्ही वैशिष्ट्यांविषयी पहिलेच सांगितले आहे की, ऑन5 मध्ये 8MP रियर कॅमेरा आणि ऑन7 मध्ये 13MP चा रियर कॅमेरा दिला गेला आहे. दोन्ही स्मार्टफोन्सच्या कॅमे-यामध्ये ऑटोफोकस आणि सिंगल LED फ्लॅश दिली गेली आहे.
आधीच्या स्मार्टफोन्सप्रमाणे ह्या स्मार्टफोन्समध्ये मागील पॅनल प्लॅस्टिकचे बनवलेले आहे. ह्या स्मार्टफोन्समध्ये रिमूव्हेबल बॅक पॅनल दिला गेला आहे. तसेच त्यांना फॉक्स लेदर फिनिश दिली गेली आहे. फोन्सच्या बाजूला मेटल फिनिश दिली गेली आहे, ज्यामुळे स्मार्टफोन आकर्षक दिसतो.
ह्याच्यां बॅटरीबाबत बोलायचे झाले तर, ऑन5 मध्ये 2600mAh क्षमतेची बॅटरी दिली गेली आहे आणि ऑन7मध्ये ३०००mAh ची बॅटरी दिली गेली आहे. कंपनीनुसार तुम्ही एकदा चार्ज केल्यास ह्या दोन्ही स्मार्टफोन्सची बॅटरी संपूर्ण एक दिवस चालते.
दोन्ही स्मार्टफोन्स 4G सपोर्टसह आले आहेत. हे दोन्ही ड्यूल-सिमलासुद्धा सपोर्ट मिळतो. मायक्रोएसडी सपोर्टसुद्धा स्मार्टफोन्स देत आहे, ज्याच्या माध्यमातून आपण 128GB पर्यंत डेटा कपॅसिटी वाढवू शकतो.