बाजारात येणारे आकर्षक स्मार्टफोन्स आणि तसेच DSLR कॅमेरे हे फोटोग्राफीची आवड असलेल्यांसाठी एक पर्वणीच म्हणावी लागेल. DSLR कॅमे-यांप्रमाणे आता स्मार्टफोन्स कंपन्यांनीही कॅमे-याच्या बाबतीत आपल्या स्मार्टफोन्समध्ये फोटोग्राफीचे आकर्षक फीचर्स देण्याचा प्रयत्नात आहे.पण असे सर्व असले तरी आपल्यातील ब-याच जणांना फोटोग्राफीची बेसिक माहिती नसते, जसे की कॅमेरा कसा हाताळणे, लाइट कशी अॅडजस्ट करणे, झूम इन, झूम इत्यादी. त्यामुळे कधी कधी चांगला कॅमेरा असूनही कॅमे-याची हँडलिंग आपल्याला माहित नसल्यामुळे आपली पंचाईत होते. तुमची ही अडचण लक्षात घेता आज आम्ही तुम्हाला अशा अॅप्सविषयी माहिती देणार आहोत, जेथे तुम्हाला बेसिक फोटोग्राफीसाठी आवश्यक ती माहिती दिली होईल, जेणेकरुन फोटोग्राफीची तुमची आवड तुम्हाला जोपासता येईल. चला तर मग पाहूयात कोणते आहेत हे अॅप्स…
DSLR Camera - Photo Guide Free
येथे तुम्हाला योग्य फोकस कसा शोधायचा, वेगवेगळ्या प्रकाशात फोटोग्राफी कशी करायची, फोटो काढण्यासाठी योग्य अँगल्स, फ्रेम कशी शोधायची ह्याची माहिती मिळते. तसेच पोर्ट्रेट्स आणि अॅक्शन शॉट्सचे योग्य फोटो कसे शोधणे ह्याची माहितीही येथे मिळते. ह्या अॅपची सर्वात खास गोष्ट म्हणजे हा ऑफलाइनही काम करतो.
EoP: Photography Tips Tutorial
फोटोग्राफीची सुरुवात करणा-यांसाठी हा खूप महत्त्वपुर्ण अॅप आहे. येथे तुम्हाला DSLR तसेच इतर कॅमे-यांविषयी माहिती दिली जाते. तसेच फोकल लेन्थ, शटर स्पीड, अॅपर्चर, ISO, कम्पोझिशन, डेप्थ ऑफ फिड, एक्सपोजर, कॅमेरा मोड्स, अॅपर्चर प्रायोरिटी ह्याविषयी सविस्तर माहिती दिली जाते.
Photographer FREE
येथे तुम्हाला ६० वेगवेगळ्या पद्धतीने कसे फोटो काढता येईल ह्याविषयी माहिती दिली आहे, ज्यात पोर्ट्रेट्स, रेनबो, मून इत्यादींचा समावेश आहे. तसेच फोटोसाठी तुमच्या पोजेस कशा असाव्या, जसे की जोडप्यांसाठी, पुरुषांसाठी आणि स्त्रियांसाठी, लहान मुलांसाठी, ग्रुप्ससाठी इत्यादी. तसेच येथे तुम्हाला अॅडव्हान्स फोटोग्राफीविषयी माहिती दिली जाईल.
ह्यात तुम्हाला फोटोग्राफीचे बेसिक माहिती दिली जाते. तसेच ब्लॅक अँड व्हाइट, लँडस्केप, पोर्ट्रेट, मॅक्रो, नाइट, वेडिंग फोटोग्राफीसाठी सोप्या टिप्स दिल्या जातात.