मोबाईल जगतात सर्वात मोठे आणि नावाजलेले नाव म्हणजे नोकिया… नोकिया काही काळासाठी फोन जगतापासून दूर राहिला खरा... मात्र अजूनही नोकियाने प्रत्येकाच्या मनात जे विशेष स्थान आहे त्याला अजिबात धक्का पोहोचू दिलेला नाही. आजही लोक नोकियाच्या स्मार्टफोन्सची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. असे सांगितले जातय की, २०१६ मध्ये नोकिया आपले नवीन फोन C1 अॅनड्रॉईडसह बाजारात रिएन्ट्री करणार आहे. असो, पण ज्या बेसिक फोन्समुळे नोकिया कंपनी एवढी नावारुपास आली अशा स्मार्टफोन्सची आज आम्ही तुम्हाला आठवण करुन देणार आहोत. हे आहेत नोकियाचे असे फोन्स ज्यांनी विक्रीमध्ये सर्वाधिक उच्चांक गाठला होता. चला तर मग जाणून घेऊयात, कोणते आहेत हे फोन्स...
नोकिया 1100
ह्याला नोकियाने 2003 मध्ये लाँच केले होते आणि हे आपल्यामध्येच काही खास आहे. जे आपण ह्या चित्रात पाहू शकता. ह्याचे डिझाईन आणि लूक खूपच वेगळे आणि आकर्षक आहे. ह्यावरील Snake II हा गेम सर्वांच्या खूपच आवडीचा होता.
नोकिया 1110
हा फोन जून २००५ मध्ये लाँच झाला होता. लूक आणि डिझाईनच्या बाबतीत हा फोन स्वत:तच खास होता.
नोकिया 3210
हा फोन १९९९ मध्ये लाँच झाला. ह्या फोनबद्दल काय बोलावे. ह्याची रिंगटोन आणि वायब्रेशन खूपच जबरदस्त आणि सर्वांच्याच आठवणीत राहील असे होते. बॅटरीच्या बाबतीतही हा जबरदस्त फोन होता. कमी किंमतीतील नोकियाचा खूप लोकप्रिय असा फोन होता.
नोकिया 1200
हा मे २००७ लाँच झाला. छोट्या आकाराचा हा नोकियाचा हा फोन सर्वांच्याच आठवणीत राहिल असा होता.
नोकिया 6600
हा फोन २००३ मध्ये लाँच झाला. यूनिक आणि आकर्षक डिझाईन हीच ह्या फोनची खरी यूएसपी होती. ह्या फोनची कामगिरीही तितकीच जबरदस्त होती.
नोकिया 2600
हा फोन २००४ मध्ये लाँच झाला. ह्या फोनचे डिझाईनही स्वत:तच खूप खास होते.
नोकिया 1600
हा फोन २००५ मध्ये लाँच झाला होता. ह्या फोनची बॅटरी लाइफ आणि डिझाईन खूप चांगले आणि आकर्षक होते.
नोकिया 3310
२००० साली हा फोन लाँच झाला. हा फोन बॅटरी लाइफच्या बाबतीत एक जबरदस्त फोन होता. तसेच ह्याची रिंगटोन क्वालिटीही उत्कृष्ट होती.
नोकिया 1208
हा फोन मे २००७ मध्ये लाँच झाला. डिझाईनच्या बाबतीत हा खूप जबरस्त फोन होता.
नोकिया 6010
२००४ साली हा फोन लाँच झाला. ह्यात 1000mAh ची बॅटरी होती.