नेक्स्टबिटने भारतीय बाजारात आपला नवीन फोन नेक्स्टबिट रॉबिन लाँच केला. भारतीय बाजारात ह्या फोनची किंमत १९,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन ऑनलाइन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर सोमवारपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल. हा एक क्लाउड-बेस्ड अॅनड्रॉईड स्मार्टफोन आहे.
नेक्स्टबिट रॉबिनमध्ये ड्यूल टोन कलर स्कीम ज्यात पांढरा आणि आकाशी रंग वापरण्यात आला आहे. तसेच डिस्प्लेच्या वर ड्यूल कॅमेरा सेटअप देण्यात आले आहे, ज्यात 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे.
हा एक उत्कृष्टरित्या डिझाईन केलेला स्मार्टफोन आहे. ह्या फोनवर दोन गोलाकार असे ग्रील्स देण्यात आहेत, जे तुम्हाला ड्यूल स्पीकरचा अनुभव देतील.
ह्या स्मार्टफोनच्या उजव्या बाजूला सिम स्लॉट देण्यात आले आहे आणि त्याच्या बाजूला असलेले फिंगरप्रिंट सेंसर असलेले पॉवर बटन देण्यात आले आहे. हा लेआऊट सोनी एक्सपिरिया Z5 सारखा आहे.
डाव्या बाजूला आवाज कमी जास्त करण्याचे बटन्स देण्यात आले आहेत. इतर स्मार्टफोन्समध्ये आवाज कमी जास्त करण्यासाठी एकच बटन असते, पण नेक्स्टबिट रॉबिनमध्ये २ वेगवेगळ्या कीज देण्यात आल्या आहेत.
ह्या स्मार्टफोनमध्ये 5.2 इंचाची पुर्ण HD 1080x1920 पिक्सेल डिस्प्ले दिली गेली आहे. ज्यात एक फंकी प्लॅस्टिक बॉडी लावण्यात आली आहे.
फोटोग्राफीसाठी ह्या स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सेलचा रियर ड्यूल टोन LED फ्लॅशसह आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे.