आजकाल तरुणाईमध्ये OTT चे क्रेझ वाढतच चालले आहे. ज्या प्रेक्षकांना थिएटरमध्ये जाऊन नवीन चित्रपट एन्जॉय करता येत नाही, त्यांच्यासाठी हे प्लॅटफॉर्म अत्यंत फायदेशीर आहे. नवीन चित्रपट, वेब सिरीज आणि इतर स्पोर्ट्स इव्हेंट तुम्हाला OTT वर बघायला मिळतील. तसेच, सिनेरसिकांसाठी OTTवर दर आठवड्याला नवीन रिलीज होत असतात. Netflix, Prime Video आणि Disney + Hotstar लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्म्स आहेत. चला तर मग जास्त वेळ न घालवता बघुयात या प्लॅटफॉर्म्सच्या सब्स्क्रिप्शन प्लॅन्सची यादी-
Netflix सिनेरसिकांसाठी एक लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्म आहे. यावर तुम्हाला वेब सिरीज, नवीन रिलीज चित्रपट, गेम्स आणि Netflix ओरिजनल इ. अनेक मनोरंजनाची सामग्री पाहता येणार आहे. मात्र, यासाठी तुम्हाला Netflix सब्सक्रिप्शन प्लॅन्स घ्यावे लागतील.
Netflix चा सर्वात स्वस्त सब्सक्रीप्शन प्लॅन 149 रुपयांचा आहे. या प्लॅनसह एका महिन्याची वैधता मिळते. या प्लॅनमध्ये एका वेळी केवळ एका डिव्हाइसवर कंटेंट पाहता येणार आहे.
Netflix च्या 199 रुपयांच्या सब्सक्रीप्शन प्लॅनमध्ये वरील प्लॅनप्रमाणेच फीचर्स मिळणार आहेत. मात्र, यात पिक्चर कॉलिटी बेस्ट मिळेल.
Netflix च्या 499 रुपयांच्या सब्सक्रीप्शन प्लॅनमध्ये ग्राहकांना एकाच वेळी दोन डिव्हाइसेसवर ऍक्सेस मिळेल. या प्लॅनमध्ये चित्रपट, टीव्ही शो आणि मोबाईल गेम्स उपलब्ध आहेत. फुल HD व्हीडिओ तुम्हला या प्लॅनसह बघता येतील.
Netflix च्या 649 रुपयांच्या सब्सक्रीप्शन प्लॅनमध्ये ग्राहकांना एकाच वेळी चार डिव्हाइसेसवर ऍक्सेस मिळेल. या प्लॅनमध्ये अल्ट्रा HD पिक्चर कॉलिटी कंटेंट उपलब्ध आहे.
Disney + Hotstar भारतात प्रसिद्ध प्रीमियम OTT प्लॅटफॉर्म आहे. हे देखील जगातील लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्म्समधून एक आहे. यावर चित्रपट, शो आणि स्पोर्ट्स इव्हेंट बघता येतात. यासोबतच, ग्राहकांना स्टार, HBO, स्टार वर्ल्ड, स्टार प्लस इ. टीव्ही चॅनेल्समधील शोजचा आनंद घेता येईल. बघुयात Disney + Hotstar सब्सक्रीप्शन प्लॅन्सची यादी -
Disney + Hotstar चा सुरुवातीच्या प्लॅनची किंमत 299 रुपये आहे. या प्लॅनची वैधता एका महिन्याची आहे.प्लॅनमध्ये युजर्स मोबाईल, टीव्ही, लॅपटॉपसह चार स्क्रीनवर कंटेंट पाहू शकतात. यामध्ये चित्रपट, लाईव्ह शोज, टीव्ही, स्पेशल इ. कंटेंट पहिला जाऊ शकतो.
Disney + Hotstar च्या 899 रुपयांच्या प्लॅनमध्ये संपूर्ण एका वर्षाची वैधता मिळणार आहे. प्रेक्षक एकाच वेळी दोन डिवाइसवर फुल HD कॉलिटी शो पाहू शकतात.
Disney + Hotstar च्या 1,499 रुपयांच्या प्लॅनची वैधता देखील संपूर्ण एका वर्षाची आहे. यामध्ये ग्राहक एकाच वेळी चार डिवाइसेसवर 4K कॉलिटीमध्ये चित्रपट, लाईव्ह शो, टीव्ही, स्पेशल वॉच यांसारख्या कंटेंट पाहू शकतात.
Amazon चे देखील स्वतःचे OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video प्लॅटफॉर्म आहे. यावर अनेक भाषांचे मनोरंजक कंटेंट उपलब्ध आहेत. यावर अनेक भारतीय आणि परदेशी शो उपलब्ध आहेत. परदेशी शोच्या भाषा तुमहाला समजत नसल्यास बऱ्याच शोमध्ये तुमच्या भाषेत सब-टायटल्स देखील येतात. या प्लॅटफॉर्मवर ग्राहकांसाठी उत्तम सोय करून देण्यात आली आहे.
Amazon Prime Video च्या सब्सक्रीप्शन प्लॅनची किमंत 179 रुपयांपासून सुरु होते. यामध्ये Amazon वर फास्ट डिलिव्हरी, प्राईम व्हीडिओ, प्राईम म्युझिक हे सर्व लाभ मिळणार आहेत. या प्लॅनची वैधता एका महिन्याची आहे.
Amazon Prime Video च्या 459 रुपयांचा सब्सक्रीप्शन प्लॅनची वैधता एकूण तीन महिन्यांची आहे. यामध्ये वरील प्लॅनप्रमाणेच सर्व फीचर्स आणि सुविधा मिळणार आहेत.
Amazon Prime Video चा 599 रुपयांचा प्लॅन एकूण सहा महिन्यांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये सुद्धा Amazon वर फास्ट डिलिव्हरी, प्राईम व्हीडिओ, प्राईम म्युझिक हे सर्व लाभ मिळणार आहेत.
Amazon Prime Video कडेही 1,499 रुपयांचा सब्सक्रीप्शन प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये प्रेक्षकांना एकूण एका वर्षाची वैधता मिळणार आहे. वरील प्लॅनप्रमाणे सर्व सुविधा या प्लॅनमध्ये मिळतील.
VOOT कडे Voot Select म्हणून सबस्क्रिप्शन सेवा उपलब्ध आहे. म्हणजेच Voot Select ही Voot ची सशुल्क आवृत्ती आहे. यामध्ये तुम्हला शो, चित्रपट, टीव्ही मालिका सर्व प्रकारचा कंटेंट पाहायला मिळेल.
VOOT च्या मोबाईल सब्स्क्रिप्शन प्लॅनची किंमत 299 रुपये आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला संपूर्ण एका वर्षाची वैधता मिळेल. यात तुम्हाला जाहिरातमुक्त सामग्री पाहता येणार आहे. यात चित्रपट, रियालिटी शो, टीव्ही चॅनेल आणि लाईव्ह गेम्सचा ऍक्सेस मिळेल. हा प्लॅन केवळ मोबाईलसाठी असणार आहे. सब्स्क्रिप्शन प्लॅनसह लोकप्रिय रिऍलिटी शो बिग बॉसचे चोवीस तास प्रक्षेपण बघता येते.
Gold Voot सब्स्क्रिप्शन प्लॅनची किंमत 499 रुपये आहे. हा प्लॅन सुद्धा एका वर्षाच्या वैधतेसह येतो. यात देखील चित्रपट, रियालिटी शो, टीव्ही चॅनेल आणि लाईव्ह गेम्सचा ऍक्सेस मिळेल. प्लॅनसह तुम्ही टीव्ही वरही Vootचा लाभ घेऊ शकता. दोन डिवाइसवर या प्लॅनमध्ये कंटेंट पाहता येईल.
Platinum Voot सब्स्क्रिप्शन प्लॅनची किमंत 499 रुपये आहे. या प्लॅनची वैधता संपूर्ण एका वर्षाची आहे. या प्लॅनसह तुम्ही एकाच वेळी चार स्क्रीनवर कंटेंट बघू शकता. यामध्ये तुम्हाला जाहिरातमुक्त कंटेंट बघायला मिळेल.