लेनोवोने आपला वाइब K5 प्लस आणि K5 ला MWC 2016 मध्ये लाँच केले होते आणि आता ह्या स्मार्टफोनला भारतात लाँच केले गेले आहे. (वाइब K5 प्लस) स्मार्टफोनची किंमत ८,४९९ रुपये ठेवण्यात आली आहे. हा १०,००० च्या किंमतीतील एक उत्कृष्ट स्मार्टफोन असेल. चला तर मग नजर टाकूयात, ह्या स्मार्टफोनच्या स्पेक्सवर...
लेनोवो वाइब K5 प्लसची ठळक वैशिष्ट्ये:
डिस्प्ले: 5-इंच, 1080p
प्रोसेसर: क्वाल-कॉम स्नॅपड्रॅगन 616
रॅम: 2GB
स्टोरेज: 16GB
कॅमेरा: 13MP, 5MP
ओएस: अॅनड्रॉइड 5.1
बॅटरी: 2750mAh
ह्या स्मार्टफोनला MWC 2016 मध्ये अॅनड्रॉईड 6.0 मार्शमॅलोसह लाँच केले गेले होते. मात्र ह्या स्मार्टफोनला अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉपसह लाँच केले गेले आहे.
आपण येथे ह्याचा UI पाहू शकता. हा दिसायला वाइब X3 सारखाच वाटतो.
फोनमध्ये 5 इंचाची 1080p डिस्प्ले 178 डिग्री व्ह्यूविंग अँगल्ससह दिले आहे.
डिस्प्लेच्या वरच्या बाजूस 5MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरा आपण पाहू शकता. ज्याने तुम्ही उत्कृष्ट सेल्फी काढू शकता.
ह्या डिस्प्लेच्या खालच्या बाजूस तीन नेविगेशन बटन्स दिले गेले आहेत, जे आपण येथे पाहू शकता.
आपण ह्याची इतर बटन्स येथे पाहू शकता.
फोनचा USB पोर्ट आणि हेडफोन जॅक आपण येथे पाहू शकता.
फोनमध्ये 13MP चा आकर्षक कॅमेरा दिला गेला आहे जो आपल्याला LED फ्लॅशसह मिळत आहे.
ह्या स्मार्टफोनमध्ये 2750mAh क्षमतेची बॅटरी मिळत आहे.