2024 चा चौथा म्हणेजच एप्रिल महिना सुरु आहे. हा वर्ष सुरु झाल्यापासून भारतीय स्मार्टफोन बाजारात अनेक कंपन्यांनी आपले स्मार्टफोन्स सादर केले आहेत. या महिन्यात आणि जवळपास अलीकडेच अनेक नवीनतम 5G स्मार्टफोन्स लाँच करण्यात आले आहेत. यामध्ये Oneplus, Samsung, Nothing इ. प्रसिद्ध ब्रँडच्या स्मार्टफोन्सचा समावेश आहे. अशाच काही स्मार्टफोन्ससह आम्ही काही जबरदस्त स्मार्टफोन्सची यादी तुमच्यासाठी तयार केली आहे. तुम्हाला या यादीमध्ये नवीनतम आणि प्रत्येक बजेट श्रेणीतील स्मार्टफोन्स मिळतील. जर तुम्हाला नवीन 5G स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर, हा रिपोर्ट तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे.
अखेर OnePlus Nord CE 4 फोन भारतात लाँच करण्यात आला आहे. फोनच्या विशेष फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, फोन Qualcomm Snapdragon 7 Gen 3 प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोनमध्ये 5500mAh बॅटरी आहे, जी 100W फास्ट चार्जिंग सपोर्टसह उपलब्ध आहे. हा फोन मिड बजेट रेंजमध्ये सादर करण्यात आला आहे. फोनच्या 8GB रॅम + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 24,999 रुपये आहे. तर, 8GB RAM + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 26,999 रुपये आहे. अधिक माहितीसाठी क्लिक करा
Realme चा हा स्मार्टफोन 11,999 रुपयांना लाँच करण्यात आला आहे. हे फोनच्या 4GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह येणाऱ्या बेस व्हेरिएंटची ही किंमत आहे. Realme 12x 5G मध्ये 6.72 इंच लांबीचा फुल HD डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. तर, उत्तम परफॉर्मन्ससाठी स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 6100+ प्रोसेसर आहे. अधिक माहितीसाठी क्लिक करा
Motorola Edge 50 Pro कंपनीने हा प्रीमियम फोन AI पावर्ड फीचर्ससह सादर केला आहे. फोनची सुरुवातीची म्हणजेच 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह येणाऱ्या व्हेरिएंटची किंमत 31,999 रुपये आहे. विशेष म्हणजे हा फोन स्टाइल सिंक AI जनरेटिव्ह थीमिंग मोड आणि व्हिडिओसाठी AI अडॅप्टिव्ह स्टॅबिलायझेशनसह आणला गेला आहे. फोनमध्ये डोळ्यांच्या सुरक्षेसाठी SGS देण्यात आला आहे. स्मार्टफोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह येतो. अधिक माहितीसाठी क्लिक करा
Tecno Pova 6 Pro फोन अप्रतिम आणि अतिशय अनोख्या डिझाईनसह सादर केला गेला आहे. एवढेच नाही तर फोनमध्ये 108MP कॅमेरा सारखे भारी फीचर्स देखील देण्यात आले आहेत. Tecno Pova 6 Pro ची सुरुवातीची म्हणजेच 8GB + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 19,999 रुपये ठेवण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी क्लिक करा
Samsung Galaxy M55 5G च्या बेस व्हेरिएंटची किंमत 26,999 रुपये आहे. यात 8GB रॅमसह 128GB स्टोरेज आहे. Samsung Galaxy M55 5G स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 7 Gen 1 प्रोसेसरसह आणला गेला आहे. फोटोग्राफीसाठी फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येतो. यात OIS सपोर्टसह 50MP मुख्य कॅमेरा, 8MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आणि 2MP मॅक्रो लेन्स आहे. अधिक माहितीसाठी क्लिक करा
Samsung Galaxy M15 5G फोन 4GB रॅम आणि 128GB वेरिएंटसह 13,299 रुपयांमध्ये लाँच केले गेले आहे. या फोनमध्ये 6.5 इंच FHD+ सुपर AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रीफ्रेश रेट 90Hz आहे. उत्तम परफॉरमन्ससाठी हा फोन MediaTek Dimensity 6100+ चिपसेट सह येतो. अधिक माहितीसाठी क्लिक करा
कंपनीने भारतात Infinix Note 40 Pro आणि Pro+ 5G हे दोन स्मार्टफोन सादर केले आहेत. या सीरिजच्या स्मार्टफोन्सची किंमत 21,999 रुपयांपासून सुरु होते. Infinix Note 40 Pro 5G स्मार्टफोनमध्ये 6.78 इंच लांबीचा फुल HD+ डिस्प्ले आहे. त्याबरोबरच, Infinix Note 40 Pro 5G हँडसेट Mediatek Dimensity 7020 प्रोसेसरसह येतो. अधिक माहितीसाठी क्लिक करा
Infinix Note 40 Pro+ 5G ची व्हेरिएंटची किंमत 24,999 रुपये आहे. प्रो प्लस व्हेरिएंटमध्ये 6.78 इंच लांबीचा फुल HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याबरोबरच, फोटोग्राफीसाठी या हँडसेटमध्ये 108MP मुख्य, 2MP द्वितीय आणि 2MP तृतीय सेन्सर आहे. आकर्षक सेल्फीसाठी 32MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी क्लिक करा
Realme P1 5G ची सुरुवातीची किंमत 15,999 रुपये आहे. ही कंपनीची नवी सिरीज आहे. Realme P1 5G फोन MediaTek Dimensity 7050 octa-core प्रोसेसरवर लॉन्च करण्यात आला आहे. Realme P1 फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेराला सपोर्ट करतो. त्याच्या मागील पॅनलवर 50MP चा Sony LYT600 सेन्सर प्रदान केला आहे. अधिक माहितीसाठी क्लिक करा
Realme P1 Pro 5G चे 8GB + 128GB स्टोरेज वेरिएंट 19,999 रुपयांना लाँच करण्यात आला आहे. Realme P1 Pro मध्ये उत्कृष्ट फोटोग्राफीसाठी यात 50MP ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यात सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP कॅमेरा आहे. उत्तम परफॉर्मन्ससाठी यात क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 6 Gen 1 प्रोसेसर आहे. अधिक माहितीसाठी क्लिक करा
Motorola च्या लेटेस्ट Moto G64 5G फोनच्या 8GB रॅम वेरिएंटची किंमत 14,999 रुपये आहे. हा फोन Moto G64 5G फोन Android 14 वर लाँच करण्यात आला आहे. प्रोसेसिंगसाठी फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 7025 ऑक्टा-कोर प्रोसेसर प्रदान केले गेले आहे. त्याबरोबरच, Moto G64 5G ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. अधिक माहितीसाठी क्लिक करा
Vivo T3x 5G फोनची किंमत 13,499 रुपयांपासून सुरू होते. Vivo T3x 5G या फोनमध्ये 6.72 इंच लांबीचा फुल HD+ डिस्प्ले आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 6 Gen 1 प्रोसेसरसह येतो. या फोनच्या मागील बाजूस 50MP मुख्य कॅमेरा आणि 2MP डेप्थ कॅमेरा देण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी क्लिक करा
itel S24 स्मार्टफोन 10,999 रुपयांना लॉन्च करण्यात आला आहे. न 6.6 इंच लांबीच्या HD+ डिस्प्लेने सुसज्ज आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz इतका आहे. सेल्फी कॅमेरासाठी डिस्प्लेवर पंच होल कटआउट आहे. या फोनमध्ये Octa Core MediaTek Helio G91 प्रोसेसर देण्यात आला आहे.
Realme Narzo 70 5G फोनची सुरुवातीची म्हणेजच 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 15,999 रुपये आहे. फोनमध्ये 6.7 इंच लांबीचा FHD+ डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन MediaTek Dimensity 7050 प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी क्लिक करा
Realme Narzo 70x 5G फोनच्या 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 11,999 रुपये आहे. फोनमध्ये 6.72 इंच लांबीचा FHD+ AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रीफ्रेश रेट 120Hz इतका आहे. याशिवाय, हा फोन MediaTek Dimensity 6100+ प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देखील आहे. अधिक माहितीसाठी क्लिक करा
Nothing Phone (2a) अनोख्या पारदर्शक डिझाइनसह येतो. यामध्ये तीन व्हेरिएंट उपलब्ध आहेत. ज्यामध्ये 8GB + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 23,999 रुपये आहे. फोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 संरक्षणासह 6.7-इंच लांबीचा लवचिक AMOLED डिस्प्ले आहे.यात 50MP+50MP रियर कॅमेरा सेटअप आणि 32MP सेल्फी कॅमेरा आहे.
Samsung Galaxy A34 5G ची किंमत 24,499 रुपयांपासून सुरू होते. या फोनमध्ये 120 Hz रिफ्रेश रेटसह 6.60-इंच लांबीचा डिस्प्ले आहे. फोनमध्ये फास्ट चार्जिंगसह 5000mAh बॅटरी आहे. यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यामध्ये 48MP प्रायमरी कॅमेरा, 8MP कॅमेरा आणि 5MP कॅमेरा आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे.
Realme 12+ 5G स्मार्टफोन दोन व्हेरिएंटमध्ये येतो. फोनच्या 8GB RAM+128GB व्हेरिएंटची किंमत 20,999 रुपये आहे. या फोनमध्ये तुम्हाला 120Hz रिफ्रेश रेटसह 6.67 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले मिळेल. सुरळीत कामकाजासाठी हा स्मार्टफोन MediaTek Dimension 7050 चिपसेटच्या सपोर्टसह येतो.
Poco X6 Pro च्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 22,999 रुपये आहे. हा फोन Qualcomm Snapdragon 778G चिपसेट आहे. स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.67-इंच लांबीचा Xfinity AMOLED डिस्प्ले आहे. फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये 108MP प्रायमरी कॅमेरा, 8MP अल्ट्रा-वाइड आणि 2MP मॅक्रो कॅमेरा असेल.