शाओमीने आपला नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन आणि बहुप्रतिक्षीत असा शाओमी Mi5 लाँच केला आहे. ह्या स्मार्टफोनविषयी गेल्या वर्षभरापासून बरीच चर्चा तसेच अफवा ऐकायला मिळत होत्या. ह्या स्मार्टफोनला अनेक खास आणि आकर्षक फीचर्ससह लाँच केले गेले आहे. चला तर मग नजर टाकूयात ह्याच्या स्पेक्सवर....
सर्वात आधी पाहूया ह्याची ठळक वैशिष्ट्ये:
प्रोसेसर: क्वाल-कॉम स्नॅपड्रॅगन 820
डिस्प्ले: ५.१५ इंच, 1080p
रॅम: 3GB/4GB
स्टोरेज: 32/64/128GB
कॅमेरा: 16MP, 4MP
बॅटरी: 3000mAh
ओएस: अॅनड्रॉईड 6.0
स्मार्टफोनमध्ये 5.15 इंचाची आकर्षक 1920x1080 पिक्सेलची डिस्प्ले दिली गेली आहे. डिस्प्लेच्यावर 4MP चा अल्ट्रा पिक्सेल कॅमेरासुद्धा दिला गेला आहे, ज्याने उत्कृष्ट सेल्फी काढता येतील.
ह्या स्मार्टफोनला मेटल आणि ग्लासने बनवले आहे. त्याचबरोबर हा शाओमीकडून पहिली फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे, ज्यात फिंगरप्रिंट सेंसर दिला गेला आहे.
ह्या स्मार्टफोनचे दोन प्रकार लाँच झाले आहेत, 3GB आणि 4GB. ज्याला Mi5 प्रो असे नाव दिले आहे. आणि हा एक सेरामिक व्हर्जन आहे.
स्मार्टफोनमध्ये 16MP चा रियर कॅमेरा दिला गेला आहे, जो एक सोनी IMX298 सेंसर आहे. ह्याला आम्ही काही दिवसांपूर्वी हुआवे मॅट 8 मध्ये पाहिले होते. त्याशिवाय स्मार्टफोनमध्ये 4MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा आहे.
कॅमेरा अॅप लासुद्धा बदलले गेले नाही. अजूनही ते MiUI7 च आहे.
MiUI7 च्या यूजर्सला हा UI खूप चांगला वाटेल. हा वापरताना कोणतीही समस्या निर्माण होत नाही. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड 6.0 मार्शमॅलोवर चालतो.