लेनोवोने MWC 2016 मध्ये आपले दोन नवीन स्मार्टफोन लाँच केले वाइब K5 आणि K5 प्लस. जरी हे स्मार्टफोन्स दिसायला खूप सारखे असले तरीही ह्यांच्या स्पेक्समध्ये थोडे अंतर जरुर आहे. ते काय अंतर आहे हे पाहण्यासाठी नजर टाकूयात लेनोवो वाइब K5 प्लस स्मार्टफोनच्या स्पेक्सवर…
सर्वात आधी पाहूयात याची ठळक वैशिष्ट्ये:
डिस्प्ले: 5-इंच, 1080p
प्रोसेसर: क्वाल-कॉम स्नेपड्रैगन 616
रॅम: 2GB
स्टोरेज: 16GB
कॅमरा: 13MP, 5MP
बॅटरी: 2750mAh
ओएस: अॅनड्रॉइड 5.1
लेनोवो वाइब K5 मध्ये सुद्धा जवळपास हीच वैशिष्ट्ये आहेत फक्त ह्याचे डिस्प्ले रिझोल्युशन 1280x720p आहे आणि प्रोसेसरसुद्धा स्नॅपड्रॅगन 415 दिला गेला आहे.
आपण सर्वच सध्या पाहात आहोत की, सध्या सर्वच कंपन्या आपल्या स्मार्टफोन्सला अॅनड्रॉईड 6.0 मार्शमॅलोसह बाजारात आणत आहेत. मात्र लेनोवोने आपले हे स्मार्टफोन्स अॅनड्रॉईड 5.1 सह लाँच केले आहे.
फोनमध्ये 5 इंचाच्या डिस्प्ले खाली 5MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला आहे.
ह्याच्या कडा खूपच उत्कृष्ट आहेत. स्मार्टफोनमध्ये उजव्या बाजूला वॉल्यूम रॉकर आणि पॉवर बटन दिले गेले आहेत.
स्मार्टफोनमध्ये मायक्रो-USB पोर्टसह हेडफोन जॅकसुद्धा दिला गेला आहे, आपण येथे पाहू शकता.
दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा LED फ्लॅशसह दिला आहे.
जर ह्या स्मार्टफोन्सच्या किंमतीविषयी बोलायचे झाले तर, K5 ची किंमत १२९ डॉलर जवळपास ८८०० रुपये आहे. तर K5 प्लसची किंमत 149 डॉलर जवळपास १०,२०० रुपये आहे. स्मार्टफोन्समध्ये 2750mAh क्षमतेची मोठी बॅटरी दिली गेली आहे.