कसा आहे HTC वन X9 स्मार्टफोन

ने Poonam Rane Poyrekar | अपडेट Feb 29 2016
कसा आहे HTC वन X9 स्मार्टफोन

MWC 2016 मध्ये HTC ने आपला नवीन स्मार्टफोन HTC वन X9 लाँच केला आहे. हा स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच केला जाईल. मात्र ह्याची किंमत थोडी जास्त असू शकते. चला तर मग नजर टाकूयात ह्या स्मार्टफोनवर.....

कसा आहे HTC वन X9 स्मार्टफोन

सर्वात आधी पाहूयात ह्याची काही ठळक वैशिष्ट्ये:

 

डिस्प्ले: ५.५ इंच, 1080p

प्रोसेसर: मिडियाटेक हेलिओ X10

रॅम: 3GB

स्टोरेज: 32GB

कॅमेरा: 13MP, 5MP

बॅटरी: 3000mAh

ओएस: अॅनड्रॉईड 6.0

कसा आहे HTC वन X9 स्मार्टफोन

ह्या स्मार्टफोनमध्ये 5.5 इंचाची IPS डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1920x1080p आहे. त्याचबरोबर ह्याची पिक्सेल तीव्रता 401ppi आहे.

कसा आहे HTC वन X9 स्मार्टफोन

फोनच्या उजव्या बाजूला आपल्याला मायक्रो-एसडी कार्ड स्लॉट आणि पॉवरसह  वॉल्यूम रॉकर बटन दिले गेले आहे. हा एक ड्यूल सिम सपोर्ट स्मार्टफोन आहे.

कसा आहे HTC वन X9 स्मार्टफोन

ह्यात 3000mAh क्षमतेची बॅटरी दिली गेली आहे. हा स्मार्टफोन उत्कृष्ट बॅटरीने सुसज्ज आहे.

कसा आहे HTC वन X9 स्मार्टफोन

फोनमध्ये 13MP चा कॅमेरा दिला आहे, ज्याला ड्यूल LED फ्लॅश दिला गेला आहे. त्याचबरोबर स्मार्टफोनमध्ये 5MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला गेला आहे.

कसा आहे HTC वन X9 स्मार्टफोन

हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड 6.0 मार्शमॅलोवर चालतो.