ऑनरने भारतात आपले दोन नवीन स्मार्टफोन लाँच केले आहेत. हे स्मार्टफोन्स आहेत ऑनर 5X आणि ऑनर होली 2 प्लस. तथापि, ऑनर 5X ह्याआधी पहिले चीनमध्ये लाँच केले गेले आहे, मात्र ऑनर होली 2 प्लसला पहिल्यांदाच लाँच केले गेले आहे आणि ते ही भारतात. ह्या स्मार्टफोनची किंमत ८,४९९ रुपये आहे. ह्यात अनेक आकर्षक फीचर्सचा समावेश आहे. चला तर मग नजर टाकूयात ह्या फीचर्सवर ह्या स्लाइडशोच्या माध्यमातून…
डिस्प्ले: 5 इंच
प्रोसेसर: मिडियाटेक 6735P
रॅम: 2GB
स्टोरेज: 16GB
कॅमेरा: 13MP, 5MP
बॅटरी : 4000mAh
ह्या स्मार्टफोनमध्ये ५ इंचाची 720p डिस्प्ले दिली गेली आहे. ज्याचे कलर सेच्युरेशन खूप चांगले आहे. त्याचबरोबर ह्याचे व्ह्युविंग अॅगल्ससुद्धा खूप चांगले आहे. हा एक बजेट स्मार्टफोन असून त्यात आकर्षक डिस्प्लेसुद्धा आहे.
फोनचे डिझाईन खूप खास आहे. हा बराचसा ऑनर होली स्मार्टफोनशी मिळता जुळता आहे. ह्या फोटोत ह्याचे स्मार्टफोनचे आकर्षक डिझाइन आपण पाहू शकता.
हा स्मार्टफोन प्लॅस्टिकचा बनलेला आहे. त्याशिवाय स्मार्टफोनमध्ये ऑनरने बाजूच्या भागाला मेटल फिनिश दिले आहे.
ह्या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 1.3GHz चा मिडियाटेक 6735P प्रोसेसर दिला गेला आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये 2GB ची रॅमसुद्धा दिली आहे.
फोटोग्राफीसाठी ह्या स्मार्टफोनमध्ये 13MP रियर कॅमेरा आणि 5MP फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. त्यासोबतच ह्यात LED फ्लॅशसुद्धा दिला आहे.
स्मार्टफोनमध्ये 4000mAh क्षमतेची बॅटरी दिली गेली आहे. जी कंपनीनुसार, जवळपास २ दिवस चालते.
ह्या स्मार्टफोनमध्ये ड्यूल सिम स्लॉट आणि एक मायक्रोएसडी कार्ड स्लॉटसुद्धा देण्यात आला आहे.
एकूणच हा एक चांगला स्मार्टफोन असल्याचे आम्ही सांगू शकतो.