ह्या अॅप्सच्या मदतीने तुमची होळी बनवा अजून खास

ने Poonam Rane Poyrekar | अपडेट Mar 22 2016
ह्या अॅप्सच्या मदतीने तुमची होळी बनवा अजून खास

ह्या आठवड्यात आलेला मोठा विकेंड आणि त्यातच आलेला होळीचा सण हा दुग्धशर्करा योगच आहे असेच म्हणावे लागेल. त्यामुळे सध्या सर्वत्र जोरदार होळी आणि रंगपंचमी तयारी पाहायला दिसतेय. मात्र ह्यावेळी झालेल्या दुष्काळामुळे बहुधा सर्वांनी सुखी रंगपंचमी खेळण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे दुष्काळाचे सावट आपल्याला ह्यावेळी होळीवरही पाहायला मिळेल. त्यामुळे कदाचित आपल्याला फेसबुक, ट्विटर अशा सोशल साइट्सवर आपले चांगले फोटो अपडेट करायला मिळणार नाही, अशी सर्वांना चिंता लागून राहिली असेल, पण  पण तरीही निराश होऊ नका, कारण तुमच्या आनंदावर विरजण न पडू देण्यासाठी आले आहेत हे रंगीबेरंगी असे अफलातून अॅप्स, ह्यांच्या मदतीने तुम्ही तुमचे फोटो रंगांनी चक्क माखून टाकाल. आणि कदाचित तुमचे फोटो पाहून तुमच्या मित्रपरिवारालाही आश्चर्याचा धक्का बसेल. चला तर मग पाहूया कोणते आहेत हे अॅप्स..

ह्या अॅप्सच्या मदतीने तुमची होळी बनवा अजून खास

Holi Special Images

ह्या अॅपच्या मदतीने तुम्ही सहजरित्या तुमचे फोटो उजवी किंवा डावीकडे स्लाइड करु शकता. तसेच अगदी सहजपणे तुमच्या फोटोवर रंगांचे इफेक्ट देऊन ते व्हॉट्सअप, फेसबुक आणि इतर सोशल साइट्सवर पाठवू शकता. तसेच तो फोटो वॉलपेपर म्हणूनही वापरु शकता.

ह्या अॅप्सच्या मदतीने तुमची होळी बनवा अजून खास

Holi Photo frames 2016

ह्या अॅपच्या मदतीने तुम्ही तुमचे फोटो होळीच्या रंगीबेरंगी अशा फ्रेम्सममध्ये स्टायलिश बनवू शकता. तसेच तुम्हाला वेगळे काही मेसेजेश लिहून फ्रेम्स बनवायच्या असतील तर ते ही तुम्ही करु शकता.

ह्या अॅप्सच्या मदतीने तुमची होळी बनवा अजून खास

Holi Photo Effects

तुम्हाला हवा तो रंग निवडून तुम्ही त्यावर फोटोवर तो रंग वापरु शकता. तसेच सुंदर होळी इफेक्ट, कलरफुल फीचर्सही तुम्ही वापरु शकता. प्रो फोटो एडिटरच्या साहाय्याने तुम्ही फोटो एडिट करु शकता. त्यानंतर तो फोटो सेव करुन तुमच्या मित्रांना पाठवू शकता.

ह्या अॅप्सच्या मदतीने तुमची होळी बनवा अजून खास

Happy Holi 2016 Images Wishes

ह्या अॅपच्या मदतीने तुम्ही होळीच्या शुभेच्छा देणारे एसएमएस, इमेज, ग्रीटिंग्स, विशेस, चारोळी, फोटोज, वॉलपेपर तुमच्या मित्रपरिवाराला तसेच नातेवाईकांना पाठवू शकता.

ह्या अॅप्सच्या मदतीने तुमची होळी बनवा अजून खास

Holi Videos

ह्या अॅपच्या मदतीने तुम्ही होळीचे व्हिडियो आणि होळीशी संबंधी ब-याच गोष्टी पाहू शकतात. हा खूप सोपा आणि यूजर फ्रेंडली अॅप आहे. ह्यात होळीचे व्हिडियो बघताना तुम्हाला खूप मजा येईल.

ह्या अॅप्सच्या मदतीने तुमची होळी बनवा अजून खास

Holi Songs Hindi+

फोटो काढण्यासोबत आपल्याला आवड असते ती नाचण्याची, पण त्यासाठी कधी कधी चांगली गाणीच मिळत नाही. होळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हा अॅप बनविण्यात आला आहे. ह्यात होळीच्या सुंदर गाणी, रिंगटोन्स आणि बरेच काही मिळेल.

ह्या अॅप्सच्या मदतीने तुमची होळी बनवा अजून खास

Holi Theme Advance Lock Screen
होळीला आपल्या फोटोंबरोबरच आपल्या मोबाईलला रंगीन करण्यासाठी हा विशेष अॅप देण्यात आला आहे. ह्या अॅपच्या मदतीने तुम्ही तुमची मोबाइल स्क्रीन लॉक सिस्टम कलरफुल बनवू शकता. त्यासाठी ह्यात लॉक स्क्रीन लाँचर, लॉक स्क्रीन थीम देण्यात आल्या आहेत. तसेच ह्यात उत्कृष्ट वॉलपेपर आणि बॅकग्राउंड्सही देण्यात आले आहेत.