तंत्रज्ञानाच्या ह्या माध्यमाचा वापर करुन तुमच्या जवळच्या व्यक्तींना द्या नववर्षाच्या शुभेच्छा!

ने Poonam Rane Poyrekar | अपडेट Apr 07 2016
तंत्रज्ञानाच्या ह्या माध्यमाचा वापर करुन तुमच्या जवळच्या व्यक्तींना द्या नववर्षाच्या शुभेच्छा!

चैत्र महिना मराठी महिन्यांतला पहिला महिना. त्या महिन्यांतला पहिला दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे नव वर्षाचा पहिला दिवस. ह्या दिवशी दारोदारी गुढी उभारून ह्या नवीन सुरू होणा-या वर्षांचे स्वागत केले जाते. ह्या दिवशी गुढी उभारायची ही आपल्या भारतीय संस्कृतीतील जुनी परंपरा आहे. आम्ही मग आपल्या जवळच्या व्यक्तींना फोनवरुन, पत्राने किंवा आपल्या आप्तलगांच्या घरी जाऊन नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या जातात. मात्र आता ह्यात थोडा बदल होऊन आधुनिक तंत्रज्ञानांमुळे अतिशय फास्ट झालेल्या आपल्या आजच्या तरुण पिढीला शुभेच्छा देण्याचे नवीन माध्यम शोधून काढले ते म्हणजे मोबाईल्स, चॅटिंग आणि ईमेल्स. ह्यामुळे जरी आपल्या जवळच्या व्यक्तींशी संवाद कमी झाला असला तरी त्यांना आठवणींनी एसएमएसद्वारे शुभेच्छा पाठवणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. असो.. सांगण्याचा उद्देश म्हणजे एसएमएसद्वारे, व्हॉट्सअॅप ट्विटर द्वारे शुभेच्छा पाठवण्यासाठी तुम्हाला काहीतरी वेगळे संदेश, फोटो हवे असतात. त्यामुळे आम्ही आज तुम्हाला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी उपयोगी पडतील अशा अॅप्सची माहिती देणार आहोत, कारण ह्यात दडलेत लाखो संदेश, फोटोज आणि शुभेच्छा….

तंत्रज्ञानाच्या ह्या माध्यमाचा वापर करुन तुमच्या जवळच्या व्यक्तींना द्या नववर्षाच्या शुभेच्छा!

Gudi Padwa SMS And Images

येथे तुम्ही तुमच्या आवडीचे गुढीपाडवा ग्रीटिंग कार्ड्स, मेसेजेस निवडून तो ईमेल, सोशल मिडियाच्या माध्यमातून तुमच्या खास व्यक्तींना पाठवू शकतात. तसेच सोशल मिडियावर गुढीपाडव्याची चित्रे पाठवून ती मित्रांसोबत शेअरही करु शकतात. ह्या अॅपमध्ये उत्कृष्ट गुढीपाडवा मेसेजेसचा आणि चित्रांचा भंडार आहे.

तंत्रज्ञानाच्या ह्या माध्यमाचा वापर करुन तुमच्या जवळच्या व्यक्तींना द्या नववर्षाच्या शुभेच्छा!

गुढीपाडवा मेसेजेस SMS

ह्या अॅपच्या माध्यमातून आपल्याला खूप चांगले एसएमएस आणि त्यासंबंधी चित्रे पाठवू शकतो. जेव्हा तुम्ही हा अॅप डाऊनलोड कराल, तेव्हा तुम्हाला तुमच्या मित्रपरिवाराला मोबाईलद्वारा पाठवता येतील असे गुढीपाडव्याचे अनेक ग्रीटिंग कार्ड्स मिळतात. तसेच ह्यात गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देणा-या चारोळी आणि संदेशसुद्धा मिळतीलय. ह्या करिता कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

तंत्रज्ञानाच्या ह्या माध्यमाचा वापर करुन तुमच्या जवळच्या व्यक्तींना द्या नववर्षाच्या शुभेच्छा!

Gudi Padwa SMS Ugadi Messages

येथे तुम्हाला मराठीतून गुढीपाडव्याचे एसएमएस , व्हॉट्सअॅप स्टेटस, फेसबुक स्टेटस, कोट्स, शायरी, छोटे एसएमएस, एका ओळीचे टेक्स मेसेजेस मिळतात. गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी हा एक उत्कृष्ट अॅप आहे.

तंत्रज्ञानाच्या ह्या माध्यमाचा वापर करुन तुमच्या जवळच्या व्यक्तींना द्या नववर्षाच्या शुभेच्छा!

गुढीपाडवा क्लॉक
गुढीपाडव्याचे एसएमएस पाठवण्याबरोबरच प्रत्येकाला आपल्या मोबाइला, कंम्प्यूटर, लॅपटॉपचा आणि मुख्य करुन आपला व्हॉट्स अप डीपी आणि फेसबुक प्रोफाईल फोटो बदलण्यासाठी आपण सर्व उत्सुक असतो. तर त्यासाठी आपल्या वॉलपेपरवर काही तरी वेगळे ठेवण्याच्या दृष्टीकोनातून हा अॅप खूपच महत्त्वाचा आहे. येथे आपल्याला ६ आकर्षक गुढीपाडवा इमेजेस, ६ बॅकग्राउंड्स आणि ५ उत्कृष्ट घड्याळ मिळतात. येथे तुम्हाला वेगवेगळ्या रंगाचे गुढीपाडव्याचे घड्याळही पाहायला मिळते.