भारतात सध्या सर्वत्र ज्या स्मार्टफोनची हवा आहे, तो फ्रीडम 251 आता वेिक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. ह्याची किंमत केवळ २५१ रुपये आहे. ह्यासाठी आपल्याला ४० रुपये डिलिवरी चार्जेस द्यावे लागतील. एकूणच आपल्याला २९१ रुपये ह्या स्मार्टफोनसाठी मोजावे लागतील. ८ जुलैपासून कंपनीने ह्या स्मार्टफोनची डिलिवरी करणे सुरु केले आहे.
ह्या स्मार्टफोनमध्ये 4 इंचाची QHD IPS डिस्प्लेसह 1.3GHz चे क्वाड-कोर प्रोसेसर मिळणार आहे. हा स्मार्टफोन 5.1 लॉलीपॉपवर काम करतो. त्याशिवाय ह्या स्मार्टफोनमध्ये 1GB चे रॅम मिळत आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये 1450mAh क्षमतेची बॅटरी दिली गेली आहे.
त्याचबरोबर ह्यात फोटोग्राफीसाठी 3.2 MP चा रियर दिला गेला आहे. मात्र जेव्हा तुम्ही कॅमेरा अॅप उघडता तेव्हा आपल्याला केवळ 2MP चा रियर कॅमेरा दिसतो. 0.3MP VGA फ्रंट फेसिंग कॅमेरा मिळत आहे.
ह्याच्या डिस्प्ले विषयी बोलायचे झाले तर, हा खूपच रिफ्लेक्टिव आहे.
८ जुलैपासून बाजारात ह्याचे ५००० यूनिट्सची विक्री सुरु झाली आहे.
कंपनीने आपल्या ह्या स्मार्टफोनसह ४ फिचर फोन्स आणि नवीन लाँच झालेल्या 3 नवीन स्मार्टफोन्सवर ३० दिवसांची बदलता येईल अशी रिप्लेसमेंट वॉरंटी दिली आहे.