शेतीविषयक इत्यंभूत माहिती देतील हे अॅप्स आणि ते ही मराठीतून!

ने Poonam Rane Poyrekar | अपडेट Apr 13 2016
शेतीविषयक इत्यंभूत माहिती देतील हे अॅप्स आणि ते ही मराठीतून!

विविधतेने नटलेला आपला भारत देश कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. मात्र ही शेती अवलंबून असते ती भारतातील तीन ऋतूंवर अर्थात उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. भारतातील ह्या तीन ऋतूंमुळे कोणत्या ऋतूत कोणते पिक लावावे, त्यासाठी काय करता येईल, त्याकरता कोणते आधुनिक तंत्रज्ञान वापरता येईल का असे अनेक प्रश्न आपल्या बळीराजासमोर पडलेले असतात. कारण योग्य आणि पुरेसे उत्पन्न मिळाले नाही, तर त्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. अशावेळी  काही शेतक-यांनी तर कर्जबाजारी झाल्यामुळे नैराश्यातून आत्महत्या केल्याच्याही घटना वारंवार कानावर ऐकायला मिळतात. त्यामुळे शेतक-यांनी हे कठोर पाउल टाकण्यापूर्वी त्यांना अशी कोणती माहिती आम्ही देऊ शकतो ह्याबाबत आम्ही खूप विचार केला. कारण सर्वच आज आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आपआपल्या क्षेत्रात प्रगती करत आहे, तर मग आपला सर्वांचा लाडका बळीराजा तरी मागे का राहावा? त्यामुळे आम्ही ह्यावर एक उपाय शोधून काढला तो म्हणजे ह्या बळीराजाला शेतीविषयक योग्य ती माहिती देणारे हे अॅप्स..ह्या अॅप्सच्या साहाय्याने आता बळीराजाही शेती व्यवसायात प्रगती करु शकतो. चला तर मग पाहूया कोणते आहेत हे अॅप्स…

शेतीविषयक इत्यंभूत माहिती देतील हे अॅप्स आणि ते ही मराठीतून!

शेतकरी मासिक

ह्या अॅपच्या मदतीने तुम्हाला शेती आणि त्यातील आधुनिक बदलत्या तंत्रज्ञानाबद्दल माहिती मिळेल. ह्यात तुम्हाला सर्व प्रकारची पिकं, पशुसंवर्धन, कुक्कुटपालन, मत्स्य व्यवसाय आदी, वनीकरण, कृषी उद्योग, जैवतंत्रज्ञान आणि शेतीविषयक इतर बरीच माहिती मिळते. तसेच येथे तुम्ही ह्यांचे शेतकरी मासिकही डाऊनलोड करु शकतात.

शेतीविषयक इत्यंभूत माहिती देतील हे अॅप्स आणि ते ही मराठीतून!

किसान योजना

शेती व्यवसायासाठी हा अतिशय उत्कृष्ट अॅप आहे. शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती करुन घेण्याची ओढ असलेल्यांसाठी हा एक उत्कृष्ट अॅप आहे. ह्या अॅपच्या माध्यमातून सरकारच्या कृषीविषयक वेगवेगळ्या योजनांची येथे माहिती मिळते. तसेच कोणत्या राज्यासाठी कोणती आणि कशा प्रकारची योजना राबविण्यात आली आहे, ह्या विषयीही माहिती मिळते. तसेच कोणत्या स्कीम्स कोठे उपलब्ध होतील आणि कुठे मिळतील हेदेखील ह्या अॅपच्या माध्यमातून कळते.

शेतीविषयक इत्यंभूत माहिती देतील हे अॅप्स आणि ते ही मराठीतून!

कृषीकिंग
ह्या अॅप्सच्या माध्यमातून तुम्हाला शेतीसाठी पूरक असणा-या हवामानाविषयी माहिती मिळते. तसेच पिकांविषयी, बाजारभाव, सरकारी योजना ह्यांविषयीही माहिती मिळते. तसेच येथे तुम्ही शेती तज्ज्ञांना तुमचे प्रश्न विचारु शकता.

शेतीविषयक इत्यंभूत माहिती देतील हे अॅप्स आणि ते ही मराठीतून!

कृषी उन्नती

येथे तुम्ही शेतीतज्ज्ञांनी फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि कृषीउन्नती वेबसाइटवर केलेली चर्चा पाहू शकता. हा अॅप्सवर लॉग-इन केल्यावर तुम्ही जॉयनिंग केलेल्या तारखेपासून तुम्हाला सर्व शेतीवषयक माहिती मिळते. ही माहिती ६ विभागात दिलेली आहे.

शेतीविषयक इत्यंभूत माहिती देतील हे अॅप्स आणि ते ही मराठीतून!

चावडी

चावडी हा एक सल्लागार अॅप म्हणून काम करतो. येथे तुम्हाला शेतीतील तज्ज्ञ आणि उच्चशिक्षित शेतक-यांना शेतीविषयक ट्रेनिंग देतात तसेच शेतक-यांना पडलेल्या प्रश्नांचे समाधानकारक उत्तरही देतात. तसेच छोट्या उद्योगांना आणि ज्यांना आपला स्वत:चा व्यवसाय सुरु करायचा असेल त्यांना योग्य ती माहिती पुरवतात तसेच त्यांचा उद्योगासाठी लागणारा कच्चा मालही पुरवतात.