मेटल गियर सॉलिड V, विचर 3, रॉकेट लीग, ओरी अँड ब्लाइंड फॉरेस्ट यांसारख्या अनेक गेम्समुळे गेमर्ससाठी २०१५ हे वर्ष जरी चांगले गेले असले तरी, त्यात इतर असेही काही गेम्स होते, ज्यांनी लोकांची निराशा केली. त्यातील असे काही गेम्स ज्यामुळे काहींचा स्वत:वरचा ताबा सुटला, काहींना आपले केस ओढावेसे वाटले तर काहींना आपण स्वत:ला मारून टाकावे असेही वाटले. अशा निराशाजनक गेम्सची यादी आम्ही आज तुम्हाला देणार आहोत.
द ऑर्डर 1886
संपुर्ण गेम्समध्ये असलेल्या 16:9 प्रसर गुणोत्तरचा काही अर्थच लागत नाही आणि ह्यात सर्व धीम्या गतीने चालतायत, जे खूप त्रासदायक आहे. प्रथमच खेळताना असे वाटते की, ह्या गेम्समध्ये खूप कही करता येण्यासारखे आहे. पण अंतिमत: येणारे प्रोडक्ट हे आपल्या मनासारखे नाही.
इवॉल्व
एक शिका-यांची टीम राक्षस शोधत आहे, जी की एक चांगली कल्पना आहे आणि जेव्हा तुम्ही ऑनलाइन खेळता, तेव्हा अजूनच मजा येते. मग काय चुकीचे घडते ह्या गेममध्ये ? ह्यातील महत्त्वाची स्टेज पार झाल्यानंतर हा गेम खूप रिपिटेड वाटतो. आणि हे त्या राक्षसासाठी आणि शिका-यांसाठी ते पुरेसे नाही.
बॅटमॅन: अर्कम नाइट
जेव्हा बॅटमॅन: अर्कम नाइट ची PC release झाली होती, त्याचवेळी रेडरिंगदरम्यान त्यात खूप ग्लिचेस आले होते आणि हा गेम खूप वेळापर्यंत चालूच झाला नव्हता. ह्या सर्व समस्येची प्रकाशकाला जाणीव असूनसुद्धाही त्याने PC गेमर्ससाठी हा गेम रिलीज केला.
Tony Hawk Pro skater 5
एकदा का प्रो स्केटिंग गेम्स कळस गाठल्यानंतर, Tony Hawk Pro Skater गेममधील मजा निघून जाते. तसा हा इतका खराब नाही, पण ठराविक ठिकाणी जे पंचेस हवे होते ते कमी पडल्यामुळे हा गेम काही काळानंतर कंटाळवाणा होऊन जातो.
Need for Speed
हा गेम त्याच्या उत्कृष्ट ग्राफिक्स आणि गतिशीलपणामुळे खूप आकर्षक वाटतो. पण मूर्ख गोष्टीमुळे त्याला नापसंतीच्या यादीत बसवले आहे.
बॅटलफिल्ड हार्डलाइन
बॅटलफिल्ड हार्डलाइन मल्टीप्लेअर गेम खूप मजेशीर आहे. आणि जरी तुम्ही गेम्सच्या बाबतीत अनुभवी नसला तरीही तुम्हाला हा खेळताना मजा येईल. पण हा गेम तिथेच संपतो. ह्या गेमचा एकूणच अनुभव तसेच ह्याची स्टोरी खूप कंटाळवाणी वाटते.
WWE 2K16
ह्या गेमला लोकप्रिय असा मताधिकार असतानासुद्धा एकूणच हा गेम खूप फिक्का वाटला. ह्या गेम्सचे ग्राफिक्स आपले खूप अपेक्षाभंग करते. ह्यातील सामन्यांचे प्रकार कमी झाले असल्यामुळे हा जास्त आकर्षक वाटत नाही.