बाजारात दरदिवसा असे कित्येक स्मार्टफोन्स येतायत, ज्यात डेटा स्टोरेज आणि रॅमवर विशेष भर दिलेला असतो. कारण आज प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या कारणास्तव डेटा ट्रान्सफर करणे महत्त्वाचे झाले आहे. कुणाला कामाच्या महत्त्वाच्या फाइल्स, कुणाला अभ्यासासाठी महत्त्वाच्या नोट्स, तर कुणाला विरंगुळ्यासाठी एखादा चित्रपट, गाणी, व्हिडियो आपल्या मोबाईलमध्ये ट्रान्सफर करायचे असतात. पण डेटा ट्रान्सफरसाठी सर्वात मोठी अडचण असते, ती इंटरनेट कनेक्शनची. कारण डेटा ट्रान्सफर करताना प्रत्येक वेळी आपण इंटरनेट क्षेत्रात असूच असे नाही. त्यामुळे ह्यावर तोडगा म्हणून आम्ही आज तुम्हाला अशा अॅप्स विषयी माहिती देणार आहोत, ज्यात डेटा ट्रान्सफर करणे खूपच सोपे होईल आणि महत्त्वाचे म्हणजे ह्यासाठी तुम्हाला इंटरनेटची आवश्यकता लागणार नाही. चला तर मग पाहूयात कोणते आहेत हे अॅप्स….
SHARE it - File Transfer
ह्या अॅपमुळे आपण Wi-Fi किंवा इतर कोणत्याही इंटरनेट कनेक्शनशिवाय डेटा एका मोबाईलमधून दुस-या मोबाईलमध्ये ट्रान्सफर करु शकता. हा अॅप सर्वात जलद वेगाने डेटा ट्रान्सफर करतो. शेअर इट मुळे आपण कोणत्याही स्मार्टफोन्सशी जसे की iOS, विंडोज फोनशी कनेक्ट होऊ शकता. ह्यात तुम्ही फोटो, व्हिडियो, संपर्क, असा कोणताही डाटा किंवा फाइल्स ट्रान्सफर करु शकतात. शेअर इट चा वापर करणे अगदी सोपे आहे.
Xender: फाइल ट्रान्सफर, शेअरिंग
Xender हा ही फाइल ट्रान्सफर करण्यासाठी एक महत्त्वपुर्ण अॅप आहे. ह्यात तुम्ही कोणत्याही प्रकारची फाइल केव्हाही आणि कधीही ट्रान्सफर करु शकता. ह्यासाठी इंटरनेट गरज नाही. ब्लूटुथच्या 200 स्पीड समांतर आहे ह्याची फाइल ट्रान्सफर करण्याची वेळ. अॅनड्रॉईड, आयओएस, विंडोज, पीसी/मॅक ह्यापैकी कशावरही सहजरित्या डेटा ट्रान्सफर करु शकता.
CLONEit - batch copy all data
ह्या अॅपद्वारा तुम्ही संपर्क, मेसेजेस, एमएमएस, कॉल लॉग्स, अॅप्लिकेशन्स, अॅप डाटा बरोबरच SD कार्डमधील सर्व प्रकारच्या फाइल्स जसे की, फोटो, व्हिडियो, म्यूजिक, कॅलेडर तुम्ही अगदी सहजपणे ट्रान्सफर करु शकता. ह्या ट्रान्सफर स्पीड ब्लूटुथपेक्षा २०० पटीने जास्त आहे. ह्यासाठी इंटरनेटची गरज नसल्यामुळे तुमचा डाटा गहाळ होणार नाही. ह्या अॅपचे खास वैशिष्ट्य म्हणजे हा आपल्याला अनइन्स्टॉल, प्रीइन्स्टॉल अॅप्स विषयी माहिती देतो. तसेच स्पेस क्लिनिंगसाठीही मदत करतो.
Superbeam(सुपरबिम)
हा अॅप जलद गतीने डाटा ट्रान्सफर करतो. तसेच ह्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे डाटा ट्रान्सफर करताना तो दुस-या डिवाइसशी जोडण्याआधी संबंधित व्यक्तील NFC किंवा QR कोड स्कॅन करावा लागतो. त्यामुळे तुमच्या फाईल्स गहाळ होणार नाही, तसेच त्या संबंधित व्यक्तीलाच ट्रान्सफर होतील. तुम्ही ट्रान्सफर केलेल्या सर्व फाइल्स हिस्ट्री तुम्हाला मिळेल.