ह्याआधी लाँच केलेल्या कूलपॅड नोट 3 आणि नोट 3 लाइटला भारतात भरघोस प्रतिसाद मिळाल्यानतर ह्या कंपनीने आपला एक नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन कूलपॅड मॅक्स लाँच केला आहे. ह्या स्मार्टफोनची किंमत २४,९९९ रुपये आहे. हा अॅमेझॉन इंडियाच्या माध्यमातून ह्या महिन्याच्या शेवटपर्यंत उपलब्ध केला जाईल. चला तर मग नजर टाकूयात ह्या फोनच्या काही ठळक वैशिष्ट्यांवर…
सर्वात आधी पाहूया ह्याची काही ठळक खास वैशिष्ट्ये…..
डिस्प्ले: ५.५ इंच, 1080p
प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 617
रॅम: 4GB स्टोरेज: 64GB
कॅमेरा: 13MP, 5MP
बॅटरी: 2800mAh ओएस: अॅनड्रॉईड लॉलीपॉप v5.1.1
हा स्मार्टफोन कूल UI 8.0 सह अॅनड्रॉईड 5.1.1 वर चालतो.
ह्या स्मार्टफोनमध्ये 5.5 इंचाची FHD 1080x1920 पिक्सेलची डिस्प्ले मिळत आहे, जी 401ppi पिक्सेल तीव्रतेसह मिळत आहे. ह्याच्या डिस्प्ले वर 5MP चा कॅमेरासुद्धा दिला आहे.
ह्याचा डिस्प्ले 2.5D कर्व्ह्ड असून ह्यात आपल्याला गोरिल्ला ग्लास 4 चे प्रोटेक्शन मिळत आहे.
हा खूपच स्लीम असा स्मार्टफोन आहे. ह्याचे वजन केवळ 7.6mm आहे आणि ह्याचे वजन केवळ १७० ग्रॅम आहे.
ह्या फोनमध्ये 13MP चा आकर्षक रियर कॅमेरा ड्यूल LED फ्लॅशसह दिला गेला आहे.
ह्या फोनमध्ये फिंगरप्रिंट सेंसर दिला गेला आहे आणि त्याचबरोबर हा पकडणेही खूप सोपे आहे.