कूलपॅडने भारतीय बाजारात आपला नवीन स्मार्टफोन मेगा 2.5D लाँच केला आहे. कंपनीने आपल्या ह्या फोनची किंमत ६,९९९ रुपये ठेवली आहे. हा स्मार्टफोन २४ ऑगस्टच्या पहिल्या फ्लॅशसेलमध्ये मिळेल. ह्याला ऑनलाइन शॉपिंग साइट अॅमेझॉन इंडियावर खरेदी केला जाऊ शकतो. हा एक ड्यूल सिम स्मार्टफोन आहे आणि हा अॅनड्रॉईड 6.0 मार्शमॅलो ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित आहे. हा स्मार्टफोन 5.5 इंच HD IPS डिस्प्लेने सुसज्ज आहे. चला तर पाहूया, अजून काय काय खास आहे ह्या स्मार्टफोनमध्ये खास…
ह्या स्मार्टफोनमध्ये 5.5 इंचाची HD IPS डिस्प्ले दिली आहे. ह्या डिस्प्लेचे रिझोल्युशन 720x1280 पिक्सेल आहे आणि ह्याची पिक्सेल तीव्रता 294ppi आहे. ही डिस्प्ले 2.5D कर्व्ह्ड ग्लासने सुसज्ज आहे.
रचना ह्याचे डिझाईन खूपच चांगले आहे जसे की आपण ह्या फोटोंमध्ये पाहू शकता. ह्या किंमतीत हे एक खूप चांगले डिझाईन आहे.
कनेक्टिव्हिटी हा फोन 4G LTE सपोर्टसह येतो. ह्यात VoLTE चा सपोर्टसुद्धा आहे. ह्यात वायफाय, ब्लूटुथ, 3.5mm हेडफोन जॅक आणि मायक्रो USB सारखे फीचर्स दिले आहे.
फ्रंट कॅमेरा हा स्मार्टफोन 8MP च्या फ्रंट आणि रियर कॅमे-याने सुसज्ज आहे.
रियर कॅमेरा येथे आपण ह्या स्मार्टफोनचा रियर कॅमेरा पाहू शकता. ह्या स्मार्टफोनमध्ये 16GB चे अंतर्गत स्टोरेज दिले आहे, ज्याला मायक्रो-SD कार्डच्या साहाय्याने वाढवूही शकतो.