मागील एक वर्षापासून मेटल स्मार्टफोन्स मागणी वाढतच चालली आहे. आज जो तो चांगला आणि आकर्षक स्मार्टफोन्स घेण्याच्या प्रयत्नात असतो. सर्वांमध्ये आपला फोन उठून दिसावा हा एकच उद्देश त्यामागे असतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशा स्मार्टफोन्सविषयी माहिती देणार आहोत, जे उत्कृष्ट मेटल बॉडीसह येतात. चला तर मग माहित करुन घेऊयात, ह्या स्मार्टफोन्सविषयी पुढे दिलेल्या स्लाइडशोच्या माध्यमातून…
वनप्लस 3
हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड 6.0 मार्शमॅलो ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित ऑक्सिजन OS वर चालतो. ह्यात 5.5 इंचाची ऑप्टिक AMOLED पुर्ण HD डिस्प्ले देण्यात आली आहे. ही डिस्प्ले गोरिल्ला ग्लास 4 ने सुसज्ज आहे. हा स्मार्टफोन क्वाड-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसर आणि 6GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात एड्रेनो 530 GPU दिला गेला आहे. ह्यात 64GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा देण्यात आले आहे. ह्या स्टोरेजला आपण वाढवूही शकतो. ह्या फोनमध्ये 16 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा दिला गेला आहे. ह्या रियर कॅमे-यासह LED फ्लॅशसुद्धा देण्यात आली आहे. ह्या फोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा देण्यात आला आहे. ह्या फोनमध्ये एक फिंगरप्रिंट सेंसरसुद्धा देण्यात आले आहे. कनेक्टिव्हीटीसाठी ह्यात NFC सपोर्ट, USB टाइप-C, वायफाय, ब्लूटुथ आणि GPS सारखे फीचर्स देण्यात आले आहे. हा फोन 3000mAh बॅटरीने सुसज्ज आहे.
HTC 10
ह्या स्मार्टफोनच्या कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 12MP चा अल्ट्रापिक्सेल कॅमेरा दिला गेला आहे, जो f/1.8 अॅपर्चर आणि OIS सह लेजर ऑटोफोकससह लाँच झाला आहे. ह्या कॅमे-याने आपण 12 बिट ची रॉ, 4K 2160 व्हिडियो आणि Hi-res ऑडियो रेकॉर्डिंग करु शकता. असे पहिल्यांदाच होत आहे की, कोणत्या स्मार्टफोनच्या फ्रंट कॅमे-यामध्ये OIS दिला गेला आहे. हा कॅमेरा 5MP आहे, जो 1.34µm पिक्सेल आणि f/1.8 अॅपर्चरसह दिला गेला आहे. त्याशिवाय स्मार्टफोनमध्ये 5.2 इंचाची QHD 1440x2560 पिक्सेल रिझोल्युशनची डिस्प्ले दिली गेली आहे. ही एक सुपर LCD 5 डिस्प्ले आहे, जी कर्व्ह्ड गोरिला ग्लाससह येते. त्याशिवाय हा अॅनड्रॉईड 6.0 मार्शमॅलोवर चालतो आणि ह्यात आपल्याला स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसर सह 4GB रॅमसुद्धा दिली गेली आहे.
अॅप्पल आयफोन 6s
अॅप्पल आयफोन 6S आपल्या आधीच्या मॉडलपेक्षा थोडा पातळ आणि जड आहे. त्याचबरोबर ह्यात काही खास फीचरसुद्धा आहेत. ह्यात फोर्स टच फीचर आहे. हा तीन वेगवेगळ्या (टच, प्रेस आणि डीपर प्रेस) च्या टचमधील अंतर करु शकतो. हे फीचर अॅप्पल स्मार्टवॉच मध्ये पहिले दिल्या गेलेल्या फीचरचे पुढील जनरेशन व्हर्जन आहे. ह्यामुळे टचचा अनुभव आणखीन वाढेल आणि रिस्पॉन्स टाइम कमी होईल, ज्यामुळे ह्याचे अॅप्स अजून तेजीने काम करतील.त्याचबरोबर आयफोन 6S मध्ये आयसाइट सेंसरसह १२ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि फेसटाइम सेंसरसह ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिगं कॅमेरा दिला आहे.
Le Max 2
Le मॅक्स 2 कंपनीचा फ्लॅगशिप डिवाइस आहे आणि हा दोन व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. ह्याचा एक व्हर्जन 4GB रॅम आणि 32GB अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे, तर दुसरा व्हर्जन 6GB रॅम आणि 64GB च्या अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे. ह्याची किंमत २२,९९९ रुपये आणि २९,९९९ रुपये आहे. Le मॅक्स 2 मध्ये 5.7 इंचाची QHD डिस्प्ले दिली आहे. ह्यात 2.15GHz क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसरसुद्धा दिला गेला आहे. हा फोन 21 मेगापिक्सेल रियर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेलच्या फ्रंट फेसिंग कॅमे-याने सुसज्ज आहे. ह्या फोनमध्ये 3100mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
LeEco Le 2
Le 2 स्मार्टफोनची किंमत आहे ११,९९९ रुपये. ह्यात 5.5 इंचाची पुर्ण HD डिस्प्ले देण्यात आली आहे. हा फोन 1.8GHz क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 652 प्रोसेसरने सुसज्ज आहे. ह्या फोनमध्ये 3GB ची रॅम देण्यात आली आहे. ह्या फोनमध्ये १६ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे. ह्यात 32GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा देण्यात आले आहे. हा फोन 3000mAh च्या बॅटरीने सुसज्ज आहे.
नेक्सस 6P
हुआवे नेक्सस 6P च्या इतर वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, ह्या स्मार्टफोनमध्ये ५.७ इंचाची QHD डिस्प्ले दिली गेली आहे. ज्याचे रिझोल्युशन १४४०x२५६० पिक्सेल आहे आणि ह्यावर कॉर्निंग गोरिला ग्लास ४ चे संरक्षण दिले गेले आहे. हा स्मार्टफोन 2GHz ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८१० प्रोसेसर आहे आणि ३जीबी रॅम आहे. त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनमध्ये f/2.0 अॅपर्चरचा १२.३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आहे. ज्याचे रिझोल्युशन ४के आहे आणि ह्या स्मार्टफोनमध्ये ८ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. हा पहिला पुर्ण धातू असलेला स्मार्टफोन आहे, जो अॅल्युमिनियमने बनलेला आहे.
ह्याशिवाय हुआवे नेक्सस 6P स्मार्टफोनमध्ये ३४५०mAh ची बॅटरी दिली गेली आहे. ह्यात त्वरित चार्ज करण्यासाठी सपोर्ट उपलब्ध आहे. ह्या वैशिष्ट्यामुळे केवळ १० मिनिटांतील चार्जने तुमची बॅटरी ७ तास चालेल. हा हँडसेट फॉर्स्ट व्हाइट, अॅल्युमिनियम आणि ग्रेफाइट अशा रंगात उपलब्ध होईल.फ्लिपकार्टवर खरेदी करा नेक्सस 6P ३९,४९९ रुपयात
सॅमसंग गॅलेक्सी A8
ह्या स्मार्टफोनमध्ये 5.7 इंचाची FHD सुपर AMOLED डिस्प्ले, 64 बिट ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 615 प्रोसेसरसह 2GB रॅम दिली आहे. त्याशिवाय ह्या स्मार्टफोनमध्ये 16GB चे अंतर्गत स्टोरेजशिवाय वाढवण्यासाठी मायक्रो-एसडी कार्ड सपोर्टसुद्धा दिले आहे. मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 128GB पर्यंत वाढवू शकतो.