दहावी, बारावीच्या परीक्षा संपल्या आणि आता शाळा, महाविद्यालयाच्या परीक्षाही संपण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे तुमच्यातील अनेक जण सुट्टीत बाहेर फिरायला जाण्याचे प्लान बनवत असतील. पण विविधतेने नटलेल्या आपल्या ह्या विशाल भारत देशात इतकी प्रेक्षणीय स्थळे आहेत, की आपण कुठे जायचे, कसे जायचे आणि कुठे राहायचे असे अनेक प्रश्न आपल्याला पडलेले असतात. त्यामुळे पडलेल्या या आणि अशा अनेक प्रश्नांचे निराकरण करतील हे अॅप्स..पाहा भारतातील सुंदर, प्रेक्षणीय स्थळांची माहिती देणारे ट्रॅव्हल अॅप्स...
ट्रीप अॅडव्हायजर (Trip Advisor)
ह्या अॅपच्या साहाय्याने तुम्हाला एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी योग्य पर्याय, तसेच तेथील उत्कृष्ट हॉटेल्स, तेथील जेवण, किंमत आणि त्या हॉटेल्सची रेटिंग येथे गेलेल्या लोकांनी केलेल्या रिव्ह्यूमध्ये कळते. त्यात काहींनी त्यांचा अनुभव, व्हिडियोज, फोटो टाकून इतरांना सांगितलेले असतात. तसेच एअरफेअर, रेल्वेभाडे, बसेस ह्याविषयी येथे माहिती मिळते.
प्लान ट्रीप: ट्रॅव्हल गाइड्स इंडिया (Plan Trip: Travel guides India)
येथे तुम्हाला तुमचे विकेंड्स तसेच मोठी सुट्टीचे पिकनिक्स प्लान्स करण्यासाठी अनेक आयडिया मिळतील. तसेच येथे तुम्ही तुमचे अॅडव्हेंचर पिकनिक्स तसेच तुमच्या बजेटनुसार महागड्या पिकनिक्सही प्लान करु शकतात. येथे तुम्हाला भारतातील ८०० पेक्षा जास्त ठिकाणांचे माहिती देणारे मार्गदर्शक मिळतील. तसेच तुम्ही येथे तुम्हाला संंबंधित ठिकाणाबद्दल असलेले प्रश्नही विचारु शकता. त्यावर जे तेथे जाऊन आले आहेत ते तुम्हाला २४ तासाच्या आत उत्तर देतील.
अमेझिंग इंडिया(Amazing India)
येथे तुम्हाला भारतातील ७२ ठिकाणांपेक्षा जास्त स्थळांची सविस्तर माहिती, तेथील लोकप्रिय गोष्टी, ठिकाण, खाद्य ह्याविषयी माहिती मिळते. ह्यात गेटवे ऑफ इंडिया, ताज महल पासून ते अगदी काश्मीर, कन्याकुमारी पर्यंत लोकप्रिय ठिकाणांची माहिती मिळते.
हायवे डिलाइट प्लॅन रोड ट्रीप्स
एखाद्या ठराविक हॉटेल्स, रिसॉर्टमध्ये जाण्यासाठी त्या हॉटेल्स किंवा रिसॉर्ट सविस्तर माहिती, राहण्याची, खाण्याची व्यवस्था, सुरक्षा, स्वच्छतागृहे ह्याविषयी सविस्तर माहिती मिळते, त्याचबरोबर पार्किंग व्यवस्था, क्रेडिट कार्ड सेवा, जवळील इतर सोयीसुविधा ह्याविषयी सविस्तर माहिती मिळते. तसेच ठराविक ठिकाणी जाण्यासाठी हायवेवरील इतर सोयीसुविधा, पेट्रोल पंप, अपघाती क्षेत्र एवढेच नव्हे तर प्रवासादरम्यान किती टोल लागतात आणि त्याचे भाडे किती ह्याविषयीही माहिती मिळते.