हे आहेत भारतातील आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट स्मार्टवॉचेस

ने Team Digit | अपडेट May 19 2016
हे आहेत भारतातील आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट स्मार्टवॉचेस

जर तुम्ही चांगले स्मार्टवॉच घ्यायच्या विचारात असाल, तर बाजारात खूप चांगले स्मार्टवॉच आहेत, जे आकर्षक होण्यासोबत किंमतीच्या बाबतीत आपल्या बजेटमध्ये येतात आणि तुमच्या पर्सनॅलिटीला आणखी खुलवून टाकतात. चला तर मग माहित करुन घेऊयात बाजारात आलेल्या ह्या स्मार्टवॉचेसविषयी...

हे आहेत भारतातील आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट स्मार्टवॉचेस

अॅप्पल वॉच
हा आपल्यात एक खास आणि आकर्षक स्मार्टवॉच आहे. त्यातच जर ते अॅप्पल सारख्या नामांकित कंपनीचे स्मार्टवॉच असेल, तर सोन्याहून पिवळे. ह्याचे डिझाईन आणि ह्याचे फीचर्स खूपच उत्कृष्ट आहेत.

हे आहेत भारतातील आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट स्मार्टवॉचेस

सॅमसंग गियर S2

सॅमसंग गियर S2 स्मार्टवॉचच्या डिझाईनविषयी बोलायचे झाले तर, ह्याचा आकार गोलाकार आहे. त्याचबरोबर ह्याला रोटेटिंग बेजलसह लाँच केले गेले आहे. रोटेट बेजलच्या माध्यमातून मेन्यू, अॅप्स आणि फीचर अगदी सहजरित्या ओपन करुन त्याचा वापर केला जाऊ शकतो. सॅमसंग गियर S2 स्मार्टवॉचच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 1.2GHz इंचाची सर्कुलर डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्युशन 360x360 पिक्सेल आहे. ह्यात 1GHz ड्यूल कोर प्रोसेसर आणि 512MB ची रॅमसुद्धा दिली गेली आहे. हा डिवाइस 4GB च्या अंतर्गत स्टोरेजसह येतो. भारतात ह्याची किंमत २४,३०० रुपयांपासून २५,८०० रुपयापर्यंत ठेवण्यात आली आहे.

हे आहेत भारतातील आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट स्मार्टवॉचेस

हुआवे वॉच
हासुद्धा आपल्यातच एक खास स्मार्टवॉच आहे. ह्यात AMOLED टचस्क्रीन वापरण्यात आली आहे. ह्यात जलद गतीने चार्जिंग करता येते. तसेच ह्यात MP3 प्लेअर, फोटो व्ह्यूवर, व्हॉईस डाइल सारखी उत्कृष्ट वैशिष्ट्ये देण्यात आली आहे.

हे आहेत भारतातील आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट स्मार्टवॉचेस

आसूस झेनवॉच
आसूसने मागील काही दिवसांपासून आपल्या स्मार्टफोनच्या जोरावर भारतीय लोकांना आपल्याकडे प्रभावित केले आहे. आणि त्यामुळे ह्याचे स्मार्टवॉचही लोकांना तितकेच प्रभावित करत आहे. हे कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 ने संरक्षित करण्यात आले आहे.

हे आहेत भारतातील आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट स्मार्टवॉचेस

LG Urbane

ह्या स्मार्टवॉचनेही भारतीय यूजर्सला बरेच प्रभावित केले आहे. ह्यात नाजूक अशी मेटल बॉडी देण्यात आली आहे. तसेच उत्कृष्ट बॅटरी आणि अंतर्गत स्टोरेज देण्यात आले आहे.

हे आहेत भारतातील आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट स्मार्टवॉचेस

मोटो 360
ह्या डिवाइसच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात एक बिल्ट-इन GPS आहे. ह्यात 1.37 इंचाची डिस्प्ले, 1.2GHz स्नॅपड्रॅगन 400 क्वाड-कोर प्रोसेसर, 300mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ह्याच्या डिस्प्लेचे रिझोल्युशन 360x325 पिक्सेल आहे आणि ह्याची पिक्सेल तीव्रता 263ppi आहे. ह्या डिवाइसला आपण सहजपणे स्मार्टफोनशी जो़डू शकतो. ह्यात ब्लूटुथ आणि वायफायसारखे फीचर्सही देण्यात आले आहेत.

फ्लिपकार्टवर खरेदी करा मोटो 360 स्पोर्ट स्मार्टवॉच १९,९९९ रुपयांत

हे आहेत भारतातील आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट स्मार्टवॉचेस

पेबल टाईम
पेबल स्मार्टवॉचची तुलना अॅनड्रॉईड आणि iOS सह केली जाते. ह्यात 13,000 पेक्षा जास्त अॅप आहेत. पेबल क्लासिक 144x168 पिक्सेल रिझोल्युशनसह 1.26 इंच ई-पेपर डिस्प्लेसुद्धा आहे. डिवाइसमध्ये मोशन-सेंसिंग accelerometer आणि एम्बिल्ट लाइट सेंसरसुद्धा आहे. ही स्मार्टवॉच वॉटरप्रुफसह ७ दिवसांची बॅटरी बॅकअप देते. क्लासिक मॉडल चेरी रेड, जेट ब्लॅक आणि व्हाइट रंगात उपलब्ध आहे. पेबलने दावा केला आहे की, पेबल टाइम राउंड ७ दिवसांची बॅटरी लाइफ देतो. आणि पेबल टाइम स्टील 10 दिवसांच्या बॅटरी लाइफसह येतो. ह्याला आपण क्विक चार्जसुद्धा करु शकता. ह्याचे वजन क्रमश: 14mm, 20mm आणि 28mm आहे.

अॅमेझॉनवर खरेदी करा पेबल क्लासिक 301BL स्मार्टवॉच केवळ ५,९९९ रुपयांत

अॅमेझॉनवर खरेदी करा पेबल टाइम 501-00020 स्मार्टवॉच ९,९९९ रुपयात

अॅमेझॉनवर खरेदी करा पेबल टाइम राउंड 601-00046 स्मार्टवॉच १३,५९९ रुपयात

अॅमेझॉनवर खरेदी करा Smartwatch पेबल टाइम स्टील 511-00023 स्मार्टवॉच १५,९९९ रुपयांत