बाजारात दरदिवसा येणारे स्मार्टफोन्स त्यांच्या खास वैशिष्ट्यांमुळे स्वत:तच खास आहेत. मात्र बाजारात असेही काही स्मार्टफोन्स लाँच झाले आहेत, जे इतरांपेक्षा वेगळे आणि खास आहेत त्यामुळे आम्ही आज तुम्हाला अशा पाच स्मार्टफोन्सविषयी माहिती सांगणार आहोत, ज्यात 4K डिस्प्ले दिली गेली आहे. त्यातील एक स्मार्टफोन तर अगदी एखाद्या हातोड्याप्रमाणे काम करतो. ज्याला कितीही आपटले तरीही तुटणार नाही. तर एका मध्ये सुरक्षेसाठी काही आकर्षक फीचर्स देण्यात आले आहेत. चला तर मग पाहूयात कोणते आहेत हे स्मार्टफोन्स…
सोनी एक्सपिरिया Z5 प्रीमियम
ह्यात 5.20 इंचाची डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1080x1920 पिक्सेला आहे. त्याचबरोबर ह्यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 810 प्रोसेसर आणि 3GB ची रॅम दिली आहे. हा 32GB च्या अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे,ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 200GB पर्यंत वाढवू शकतो. हा अॅनड्रॉईड 5.1.1 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. त्याशिवाय ह्यात 23 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा आहे. ह्याच्या कॅमे-याची सर्वात खास गोष्ट म्हणजे ह्यात ½.3 एक्समोर RS दिला गेला आहे. कंपनीचा दावा आहे की, स्मार्टफोनच्या कॅमे-याला त्या तंत्रज्ञानान डिझाईन केले आहे, जे अल्फा रेंजच्या इंटरचेंजेबल लेन्स कॅमे-यामध्ये पाहायला मिळते.
फ्लिपकार्टवर खरेदी करा सोनी एक्सपिरिया Z5 प्रीमियम ५२,९९० रुपयात
यू यूटोपिया
ह्या स्मार्टफोनमध्ये 5.2 इंचाची डिस्प्ले देण्यात आली आहे. ह्यात स्नॅपड्रॅगन 810 चिपसेट आणि 4GB ची रॅमसुद्धा देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन 32GB च्या अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे. त्याशिवाय ह्या स्मार्टफोनमध्ये 21 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. कनेक्टिव्हिटीसाठी ह्यात 4G LTE सपोर्ट, ब्लूटथ, वायफाय आणि GPS देण्यात आला आहे.
HTC वन A9
अॅनड्रॉईड 6.0 मार्शमॅलोवर आधारित HTC सेंस युआयवर चालणारा HTC वन A9 गुगलच्या लेटेस्ट मार्शमॅलो ओएसवर चालणारा कंपनीचा पहिला हँडसेट आहे. HTC वन A9 मेटल यूनीबॉडीने सुसज्ज आहे. फोन दिसायला एकदम पातळ आहे आणि ह्याची जाडी ७.२६mm आहे. जर ह्या स्मार्टफोन्सच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 5 इंचाची डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1080x1920 पिक्सेल आहे, त्याचबरोबर हा डिस्प्ले गोरिल्ला ग्लास 4 कोटेड आहे. हा स्मार्टफोन क्वालकॉमच्या नवीन चिपसेट स्नॅपड्रॅगन 617 चिपसेट, 64 बिट्सचे ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि ३जीबीच्या रॅमने सुसज्ज आहे.
फ्लिपकार्टवर खरेदी करा HTC वन A9 फक्त ३०,३८८ रुपयांत
ब्लॅकफोन 2
ह्या स्मार्टफोनमध्ये ५.५ इंचाची FHD १०८०x१९२० पिक्सेल IPS डिस्प्ले दिली गेली आहे. तसेच त्याला कोर्निंग गोरिला ग्लास ३ ने सुरक्षा दिली गेली आहे. त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनमध्ये ६४ बिट ओक्टा-कोर क्वाल-कॉम स्नॅपड्रॅगन ६१५ प्रोसेसर दिला गेला आहे, जो १.७GHz ची गती देतो. तसेच ह्या स्मार्टफोनमध्ये ३जीबीचा LPDDR3 रॅम आणि एड्रेनो ४०५ दिला गेला आहे.फोटोग्राफीसाठी स्मार्टफोनमध्ये १३ मेगापिक्सेलचा ऑटोफोकस रियर कॅमेरा BSI सेंसर आणि ड्युल एलईडी फ्लॅशसोबत दिला गेला आहे. स्मार्टफोनमध्ये ५ मेगापिक्सेलचा फिक्स्ड फोकस फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला गेला आहे. स्मार्टफोनमध्ये आपल्याला ३२जीबी eMMC ची स्टोरेज दिली गेली आहे. जी आपण आपल्या मायक्रोएसडीच्या साहाय्याने १२८ जीबी पर्यंत वाढवू शकतो. ह्यासोबतच स्मार्टफोनमध्ये 4G LTE सपोर्टसुद्धा आहे. तसेच ह्यात 3060mAh क्षमता असलेली मोठी बॅटरी दिली गेली आहे.
ट्यूरिंग फोन
ह्या फोनला सेन फ्रान्सिंस्कोच्या ट्यूरिंग रोबोटिक इंडस्ट्रीजद्वारा बनवले गेले आहे. ह्यात एक वेगळेच लिक्विडमेटलने बनवले आहे. हे मेटल ५ इतर मेटल्सने बनल्यामुळे हा खूपच मजबूत आणि टिकाऊ आहे. ह्या मेटलला फोनच्या काही भागातच वापरले गेेल आहे. पुर्ण फोन हा ह्या मेटलने बनवला गेला नाही. कंपनीचा दावा आहे की, जे मटेरियल त्यांनी हा फोन बनविण्यासाठी वापरले आहे ते स्टील आणि टायटेनियमपेक्षाही अधिक मजबूत आहे. ज्यामुळे हा हातातून पडल्यावरही तुटण्यापासून किंवा कोणताही ओरखडा येण्यापासून सुरक्षित राहतो. हा फोन वॉटरप्रुफ नाही, पण कंपनीचा दावा आहे की, लवकरच त्याला वॉटरप्रूफ फीचर्स देतील. ट्यूरिंगचे म्हणणे आहे की, ह्या ऑथेंटिकेशन मेथडमुळे ह्या फोनला “सायबर क्राइमपासून सुरक्षित करु शकतो.