तसे पाहायला गेले तर, २०१५ मध्ये अगदी स्वस्त स्मार्टफोन्सपासून अनेक महागडे स्मार्टफोन्स लाँच झाले. त्यातील काहींची नावे तर आपण विसरुन गेलो तर, काही त्यांच्या नाविन्यपुर्ण आणि आकर्षक वैशिष्ट्यांमुळे आपल्या लक्षात राहिले. आणि आपले स्वतंत्र असे स्थान बनवले. सर्व कंपन्यांचा हाच प्रयत्न असतो की, आपण आपला स्मार्टफोन्स सर्वात वेगळा आणि आकर्षक बनवावा, पण सर्वच स्मार्टफोन खास होतात असे नाही. तसे प्रत्येक स्मार्टफोन्सचे स्वत:चे असे वेगळेपण आहे, मात्र एकूणच कामगिरीचा विचार केला तर, असे ठराविकच स्मार्टफोन्स आहेत जे खास आहेत. आम्ही आज आपल्यासाठी असे स्मार्टफोन्स आणले आहेत, जे स्वत:तच वेगळे असल्यामुळे २०१५ मध्ये सर्वात आकर्षक स्मार्टफोन्सच्या यादीत आले. चला तर मग नजर टाकूयात अशा स्मार्टफोन्सवर…
लेनोवो K3 नोट
ह्या स्मार्टफोनमध्ये 5.5 इंचाची पुर्ण HD डिस्प्ले आहे, त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर मिडियाटेक 6572 प्रोसेसर आहे. तसेच ह्यात 16 कोर माली GPU सुद्धा आहे आणि ह्यात 2GB रॅमसुद्धा आहे. फोटोग्राफीसाठी ह्या स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये आपल्याला 16GB चे अंतर्गत स्टोरेज दिले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 32GB पर्यंत वाढवता येऊ शकते. लेनोवो K3 नोट 4G कनेक्टिव्हिटीने सुसज्ज आहे. तसेच तो अॅनड्रॉईड लॉलीपॉपवर चालतो. ह्या स्मार्टफोनमध्ये 3000mAh क्षमतेची बॅटरी दिली गेली आहे. ह्याची किंमत ९,९९९ रुपये आहे.
मोटोरोलो मोटो X प्ले
मोटो X प्लेमध्ये २१ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. कंपनीचा दावा आहे की, हा स्मार्टफोन 30 तासांची बॅटरी लाइफ देईल. ह्यात 3630mAh ची बॅटरी दिली गेली आहे. मोटो X प्ले मध्ये ५.५ इंचाची पुर्ण HD डिस्प्ले दिली गेली आहे, जी गोरिल्ला ग्लास 3 ने संरक्षित आहे. ह्यात 2GB रॅम दिली गेली आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये ड्यूल नॅनो सिम दिले गेले आहे. ह्याचे वजन 169 ग्रॅम आहे. हा 4G ला सपोर्ट करतो. ह्यात ब्लूटुथ, वायफाय, मायक्रो-USB आणि 3.5mAh चा हेडसेट जॅक दिला गेला आहे.
शाओमी Mi4
हा विंडोज १० रोम केवळ LTE व्हर्जनसाठी सादर केला आहे. कंपनीने ही माहिती आपल्या वेईबो पेजवर एका फोटो पोस्टसह दिली आहे. ज्यात असे पाहिले गेले आहे की, शाओमी Mi 4 विंडोज 10 वर चालतो. तसेच शाओमीने अधिकृत वेबसाइटवरही ह्याची माहिती दिली आहे आणि विेंडोज 10 ला उपलब्ध केले आहे. विंडोज 10 चा हा रोम मायक्रोसॉफ्ट विंडोज इंसायडर प्रोग्रामच्या अंतर्गत आणला आहे आणि कोणताही ग्राहक ते डाऊनलोड करु शकतो. कंपनीचा दावा आहे की, ह्याच्या माध्यमातून आपण आपल्या फोनमध्ये पुर्णपणे विंडोज 10 ऑपरेटिंग सिस्टमचा अनुभव करु शकू.
नेक्सस 5X
ह्या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात ५.२ इंचाची पुर्ण HD डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1080x1920 पिक्सेल आहे आणि ह्यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ३ चे संरक्षणसुद्धा आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये 1.8GHz हेक्सा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८०८ प्रोसेसर आणि 2GB रॅम दिली आहे. हा स्मार्टफोन f/2.0 अॅपर्चरने १२.३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा (4k रिझोल्युशन) आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमे-याने सुसज्ज आहे. ह्यात 2700mAh ची बॅटरी दिली गेली आहे. ह्यात क्विक चार्जचा सपोर्टसुद्धा आहे. हा स्मार्टफोन कार्बन ब्लॅक, क्वार्टज व्हाइट आणि आइस ब्लू रंगात उपलब्ध होईल. नटच्या चार्जमध्ये यूजरला 3.8तासापर्यंत बॅटरी पॉवर मिळेल.
सॅमसंग गॅलेक्सी S6 एज
जर आपण एक अत्याधुनिक अॅनड्रॉईड स्मार्टफोन घेऊ इच्छिता, तर आपण गॅलेक्सी S6 एज बद्दल विचार करु शकता. ह्या स्मार्टफोनमध्ये आकर्षक कॅमेरा, डिस्प्ले आणि उत्कृष्ट बॅटरी लाइफ मिळते. ह्याची कर्व्ह्ड डिस्प्ले जास्त कामाची नाही, आणि हातात पकडताना भीतीही वाटते की, कदाचित हा आपल्या हातातून पडेल. पण जर तुम्ही असा स्मार्टफोन घेऊ इच्छिता जो पाहून सर्व लोक आश्चर्यचकित होतील, तर तुम्ही ह्या स्मार्टफोनचा विचार करु शकता.
आयफोन 6S
जर ह्या स्मार्टफोनच्या किंमतीविषयी बोलायचे झाले तर, ती पुढीलप्रमाणे आहे. आयफोन 6S 16GB-६४,८३६ रुपये, आयफोन 6S 64GB- ७४,११७ रुपये, आयफोन 6S 128GB- ८३,४०१ रुपये, आयफोन 6S प्लस 16GB-७४,११७ रुपये, आयफोन 6S प्लस 64GB- ८३,४०१ रुपये, आयफोन 6S प्लस 128GB- ८८,४७८ रुपये. तथापि ह्या किंमती आता थोड्या कमी झाल्या आहेत.
सॅमसंग गॅलेक्सी नोट 5
जर ह्या स्मार्टफोनच्या तपशीलाविषयी बोलायचे झाले तर, ह्या स्मार्टफोनमध्ये गॅलेक्सी S6 सारखे एक्सीनोस 7 ऑक्टा-कोर प्रोसेसर दिले गेले आहे. ह्याक आपल्याला 4GB ची रॅम मिळत आहे. त्याचबरोबर स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी 16 मेगापिक्सेलचा OIS कॅमेरा मिळत आहे, त्याचबरोबर 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा मिळत आहे. ज्याच्या माध्यमातून तुम्ही सेल्फी काढू शकता. ह्या स्मार्टफोनला गॅलेक्सी S6 सारखी ग्लास बॅक दिली गेली आहे. मात्र ह्या स्मार्टफोनमध्ये दिले गेलेली ग्लास वक्र आहे.
नेक्सस 6P
हुआवे नेक्सस 6P च्या इतर वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, ह्या स्मार्टफोनमध्ये ५.७ इंचाची QHD डिस्प्ले दिली गेली आहे. ज्याचे रिझोल्युशन १४४०x२५६० पिक्सेल आहे आणि ह्यावर कॉर्निंग गोरिला ग्लास ४ चे संरक्षण दिले गेले आहे. हा स्मार्टफोन 2GHz ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८१० प्रोसेसर आहे आणि ३जीबी रॅम आहे. त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनमध्ये f/2.0 अॅपर्चरचा १२.३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आहे. ज्याचे रिझोल्युशन ४के आहे आणि ह्या स्मार्टफोनमध्ये ८ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. हा पहिला पुर्ण धातू असलेला स्मार्टफोन आहे, जो अॅल्युमिनियमने बनलेला आहे.
जिओनी मॅरेथॉन M5
जियोनी मॅरेथॉन M5 स्मार्टफोनच्या इतर वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात ५.५ इंचाची पुर्ण HD डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1920x1080 पिक्सेल आहे. हा डिस्प्ले AMOLED तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. त्याचबरोबर हा स्मार्टफोन 1.3GHz क्वाड-कोर प्रोसेसर आणि 2GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 16GB चे अंतर्गत स्टोरेज दिले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 128GB पर्यंत वाढवू शकतो. ह्यात १३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. हा अॅनड्रॉईड 5.0 लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. कनेक्टिव्हिटीसाठी ह्या स्मार्टफोनमध्ये ब्लूटुथ, वायफाय आणि 4G LTE सपोर्ट आहे.