सध्याच्या युगात जरी सीडी प्लेअर, आयपॉड आणि मुख्य करुन स्मार्टफोन्स आल्यामुळे हल्ली तरुणांमध्ये रेडिओची आवडच नसल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळते किंवा कदाचित नेटवर्क समस्या असल्यामुळे ते त्याकडे सर्रासपणे दुर्लक्ष करताना दिसतात. अशावेळी जर तुम्हाला तुमच्या स्मार्टफोन्समध्येच रेडिओ अॅप्सद्वारे तुमची पसंतीची गाणी ऐकायला मिळाली तर?? कदाचित ह्याने तुमची मराठी गाणी ऐकायची आवडसुद्धा वाढेल. त्यामुळे आम्ही आज तुम्हाला असे काही मराठी रेडिओ अॅप्स सांगणार आहोत, ज्यात तुम्हाला अशा काही सदाबहार मराठी गाण्यांचा तसेच सध्याचा नवीन गाण्यांचा नजराणा पाहायला मिळेल, जे कदाचित तुमच्यापैकी काही जणांनी ऐकली देखील नसतील. चला तर मग माहित करुन घेऊयात, कोणते आहेत हे मराठी रेडिओ अॅप्स…
मराठी रेडिओ
मराठी संगीताची ओढ असलेल्यांसाठी डोळ्यासमोर ठेवून हा मराठी रेडिओ अॅप बनविण्यात आला आहे. तसेच येथे तुम्हाला मराठी भावगीते, भक्तिगीते, चित्रगीते आणि इतर मराठी कार्यक्रम आपल्या मोबाइलवर केव्हाही, कुठेही ऐकायला मिळतील. तसेच येथे आपण ५ मराठी रेडिओ स्टेशनही ऐकू शकता, ती आहेत मराठी रेडिओ, प्रसार भारती मराठी, झकास मराठी FM, मायबोली मराठी आणि स्वस्तिक मराठी भजन.
रेडिओ झकास मराठी
रेडिओ झकास मराठी हा भारतातील पहिला इंटरनेट ऑनलाइन रेडिओ आहे. येथे तुमच्या जुन्या आठवणींना उजाळा देतील अशी जुनी सदाबहार गाणी, मराठी चित्रपटातील गाणी, तसेच सध्याची नवीन गाणी आणि असे इतर बरेच काही ऐकायला मिळेल. अशी गाणी तुम्हाला घरी, किंवा कुठे प्रवासात ऐकायला मिळणे म्हणजे दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल. त्यामुळे हा अॅप तुम्ही नक्की वापरुन पाहा.
मराठी भजनमाला
मराठी भजन ऐकण्यासाठी हा अतिशय सोपा आणि उत्कृष्ट अॅप आहे. येेथे तुम्हाला प्रार्थना, अभंग, रुपावली, गवळण, गजर, भैरवी असे बरेच प्रकार ऐकायला मिळतील.
मराठी साँग्स अँड रेडिओ
येथे मराठीतील सुपरहिट्स गाणी, रिमिक्सेसस, डिजे रिलीजेस ऐकायला मिळतील. हा खूप छोटा अॅप असला तरी ह्यात अनेक फीचर्स आहेत. येथे व्हिडियोसुद्धा अपडेट होतात. आणि स्मार्टफोनवर तर हा खूपच उत्कृष्ट चालतो.
रेडियो नमकिन
येथे तुम्ही मराठी आणि हिंदी ह्या दोन्ही भाषेतली गाणी ऐकू शकतात. मराठी हिट्स गाणी, जुनी मराठी गाणीही येथे ऐकायला मिळतील.