आजकाल स्मार्टफोनची कामगिरी आणि कॅमेरा ह्या दोन गोष्टी अशा श्रेणीतील स्मार्टफोन्सला आकर्षक स्मार्टफोनच्या श्रेणीत आणून ठेवतात. तेथे आजकाल स्मार्टफोनच्या लूकही तितकेच महत्त्वाचे मानले जातय. कारण हल्ली प्रत्येक जण आपल्या स्टाइल स्टेंटमेंटबद्दल आग्रही दिसतो. त्यामुळे आपल्या पर्सनॅलिटीला सूट होणाराच स्मार्टफोन घ्यावा याकडे ग्राहकांचा कल असतो. चारचौघात आपण उठून आणि वेगळे दिसावे, हा एकच उद्देश त्यामागे असतो. त्यामुळेच आम्ही तुम्हाला अशा दहा आकर्षक स्मार्टफोन्सविषयी माहिती देणार आहे, जे उत्कृष्ट कामगिरीसोबत लूकच्या बाबतीतही तितकेच जबरदस्त आहे. चला तर मग जाणून घेऊया ह्या स्मार्टफोन्सविषयी पुढील स्लाइडशो च्या माध्यमातून…
लेनोवो वाइब S1
स्मार्टफोनमध्ये ८ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा आणि त्याचबरोबर २ मेगापिक्सेलचा आणखी एक सेकेंडरी कॅमेरा दिला गेला आहे. ज्याच्या माध्यमातून आपण एक चांगला सेल्फी घेऊ शकता. त्याचबरोबर आपले फोटो अजून चांगले येण्यासाठी स्मार्टफोनमध्ये फोटो एडिटिंग टूलसुद्धा दिला गेला आहे. उदाहरणार्थ जर आपण आपल्या सेल्फीवर ब्लर करु इच्छिता, तर हा आपल्या फोटोवर कुठेही री-फोकसिंग करु शकतो. जर ह्या स्मार्टफोनच्या इतर लीक्सवर लक्ष केंद्रीत केले असता, ह्या स्मार्टफोनमध्ये ५ इंचाची FHD डिस्प्ले, 64-बिट मिडियाटेक ऑक्टा-कोर 1.7GHz प्रोसेसरसह 3GB ची रॅम आणि 32GB चे अंतर्गत स्टोरेज दिले आहे. त्याशिवाय ह्या स्मार्टफोनमध्ये 2500mAh क्षमतेची मोठी बॅटरी दिली आहे. ह्या स्मार्टफोनचे वजन १३० ग्रॅम आहे आणि 143 x 70.8 x 7.85mm परिमाणासह लाँच होईल. त्याचबरोबर हा काळा, पांढरा, निळा, जांभळा आणि गुलाबी रंगात मिळेल. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड ५.० लॉलीपॉपवर चालतो. त्याशिवाय कनेक्टव्हिटीसाठी ह्यात 4G LTE वैशिष्ट्य दिले आहे.
वनप्लस X
ह्याच्या वैशिष्ट्याविषयी बोलायचे झाले तर, ह्यात ५ इंचाची पुर्ण HD IPS डिस्प्ले दिली गेली आहे. हा डिस्प्ले AMOLED आहे. त्याचबरोबर हा स्मार्टफोन 3GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात एक हायब्रिड ड्युल सिमसुद्धा आहे. वनप्लस X स्मार्टफोन ऑक्सिजन ओएस २.१ वर चालेल. हा अॅनड्रॉईड 5.1.1 लॉलीपॉपवर आधारित आहे. हा स्मार्टफोन 2.3GHz क्वाड-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 801 चिपसेटने सुसज्ज आहे. ह्यात १६जीबीचे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने १२८जीबीपर्यंत वाढवू शकतो.
लेनोवो वाइब X3
लेनोवो वाइब X3 स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 5.5 इंचाची HD डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1080x1920 पिक्सेल आहे. ह्या डिस्प्ले वर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 चे प्रोटेक्शन दिले आहे. हा स्मार्टफोन हेक्सा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 808 प्रोसेसर आणि 3GB च्या रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 32GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 128GB पर्यंत वाढवू शकतो.लेनोवो वाइब X3 मध्ये २१ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा दिला गेला आहे. जो सोनी IMX २३० सेंसर, LED फ्लॅश, फेज डिटेक्शन ऑटोफोकस आणि 4K व्हिडियो रेकॉर्डिंग फीचरने सुसज्ज आहे. त्याचबरोबर ह्यात 8 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला आहे. त्याचबरोबर ह्याच्या रियर पॅनलावर प्रायमरी कॅमे-याच्या खाली फिंगरप्रिंट सेंसर दिला गेला आहे. हा हायब्रिड ड्यूल-सिम स्लॉटसह येईल. याचाच अर्थ मायक्रो-एसडी कार्डच्या वापर केल्यावर यूजर केवळ एकच सिमकार्डचा वापर करु शकेल. ह्यात 3600mAh ची बॅटरी दिली गेली आहे.
जिओनी S6
हा जिओनी S सीरिजचा स्मार्टफोन आहे. हा तसेच वैशिष्ट्यांनुसार हा उत्कृष्ट आणि आकर्षक स्मार्टफोन आहे.
पॅनासोनिक एलुगा ARC
जर तुम्ही एक कॉम्पॅक्ट आणि आकर्षक स्मार्टफोनच्या शोधात असाल, तर हा स्मार्टफोन एक उत्कृष्ट पर्याय आहे.
LG K10
ह्यात 5.3 इंचाची HD इन-सेल टच डिस्प्ले दिली आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह येतो. फोनमध्ये 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये 2GB ची रॅम दिली आहे. फोन 16GB च्या अंतर्गत स्टोरेजसह येतो. कनेक्टिव्हिटीसाठी ह्यात 4G LTE+VoLTE, Vo वायफाय, 3G, 2G सारखी वैशिष्ट्ये दिली आहे. हा व्हाइट, इंडिगो आणि सोनेरी रंगात मिळेल.
मोटो X प्ले
हा स्मार्टफोन दिसायला खूपच आकर्षक आहे आणि हा आकर्षक स्पेक्ससह लाँच केला गेला आहे. ह्या स्मार्टफोनची परफॉर्मन्स आणि कॅमेराही उत्कृष्ट आहे.
LeEco le 1S
ह्या स्मार्टफोनमध्ये ५.५ इंचाची IPS LCD डिस्प्ले 1080p रिझोल्युशनसह दिली आहे. त्याचबरोबर ह्याची पीक ब्राइटनेस 500 निट्स जी इतकी वाईटही नाही. त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनच्या मागील बाजूकडे लक्ष दिले तर, ह्या स्मार्टफोनमध्ये एक फिंगरप्रिंट सेंसरसुद्धा दिले गेले आहे. फोटोग्राफीसाठी ह्यात 13MP चा रियर कॅमेरा ISOCELL कॅमेरा सिंगल LED फ्लॅशसह दिला गेला आहे आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे.
मायक्रोमॅक्स कॅनवास 6
सध्या सर्वत्र चांगल्या लूकच्या स्मार्टफोन्सची सर्वांमध्ये क्रेज लक्षात घेता मायक्रोमॅक्सनेही आपला नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन आणला आहे. ह्यात हेलिओ X10 प्रोसेसर वापरण्यात आले आहे.
शाओमी Mi 4i
शाओमी Mi 4i आता जुना झाला असून त्याची जागा रेडमी नोट 3 ने घेतली आहे. जर तुम्ही उत्कृष्ट कॅमेरा आणि चांगले डिझाईन असलेल्या स्मार्टफोनच्या शोधात असाल, तर शाओमी Mi 4i हा एक चांगला पर्याय आहे.