ब्रह्मास्त्रच्या आधी ‘या’ भारतीय चित्रपटातील VFX तंत्रज्ञानाने जिंकली प्रेक्षकांची मने

ने Reshma Zalke | अपडेट Jan 30 2023
ब्रह्मास्त्रच्या आधी ‘या’ भारतीय चित्रपटातील VFX तंत्रज्ञानाने जिंकली प्रेक्षकांची मने

भारतीय सिनेसृष्टीमध्ये सध्या vfx तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. अलीकडेच लाँच झालेला रणबीर कपूर आणि आलीया भट्ट अभिनित 'ब्रह्मास्त्र' चित्रपटातील VFX तंत्रज्ञान बघून प्रेक्षक अगदी थक्क झाले होते. मात्र, याआधी देखील अनेक भारतीय चित्रपटांनी VFX तंत्रज्ञानाचा वापर करून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. चला तर मग बघुयात अशाच काही खास आणि जबरदस्त चित्रपटांची यादी... 

ब्रह्मास्त्रच्या आधी ‘या’ भारतीय चित्रपटातील VFX तंत्रज्ञानाने जिंकली प्रेक्षकांची मने

मि. इंडिया (Mr. India)

'मोगँबो खुश हुआ' हा डायलॉग आठवतो का ? शेखर कपूर दिग्दर्शित ‘मिस्टर इंडिया’ हा चित्रपट बॉलिवूडमधील पहिलावहिला चित्रपट, ज्यात पहिल्यांदा VFX तंत्रज्ञान वापरले गेले होते. चित्रपटात अनिल कपूर, श्रीदेवी आणि अमरीश पुरी मुख्य भूमिकेत होते.

ब्रह्मास्त्रच्या आधी ‘या’ भारतीय चित्रपटातील VFX तंत्रज्ञानाने जिंकली प्रेक्षकांची मने

कोई मिल गया (Koi mil gya) 

आपल्या लाडक्या 'जादू' ला आपण कसे विसरू शकतो. राकेश रोशन यांनी अभिनेता हृतिक रोशनसह या चित्रपटात एलिअन आणि एका मनुष्याची मैत्री दाखवली. आजही या चित्रपटातील VFX आपल्याला थक्क करून सोडतात. 

ब्रह्मास्त्रच्या आधी ‘या’ भारतीय चित्रपटातील VFX तंत्रज्ञानाने जिंकली प्रेक्षकांची मने

क्रिश (Krishh)

दिग्दर्शक राकेश रोशन यांनी आपल्या मुलाला म्हणजे हृतिकला घेऊन ‘कोई मिल गया’ या चित्रपटाचे तीन भाग काढले. दुसऱ्या भागात पहिल्यांदाच सुपरहिरो ही संकल्पना बॉलिवूडमध्ये त्यांनी आणली.

ब्रह्मास्त्रच्या आधी ‘या’ भारतीय चित्रपटातील VFX तंत्रज्ञानाने जिंकली प्रेक्षकांची मने

ओम शांती ओम (Om Shanti Om)

बॉलीवूडचा किंग शाहरुख खानच्या ‘ओम शांती ओम’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. या चित्रपटाद्वारे अभिनेत्री दीपिका पदुकोणने सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. या चित्रपटातील जबरदस्त vfx तंत्रज्ञानाने सर्वांची मने जिंकली. 

ब्रह्मास्त्रच्या आधी ‘या’ भारतीय चित्रपटातील VFX तंत्रज्ञानाने जिंकली प्रेक्षकांची मने

रोबोट (Robot)

आपल्या अनोख्या स्टाईलमुळे ओळखले जाणारे अभिनेते रजनीकांत यांनी ‘रोबोट’ चित्रपटात डबल रोल केला होता. रोबोटीक तंत्रज्ञानाचे मानवी आयुष्यावर चांगले वाईट परिणाम कसे होऊ शकतात, हे चित्रपटात दाखवले आहेत. चित्रपटात मोठ्या प्रमाणावर vfx चा वापर केला गेला होता.

ब्रह्मास्त्रच्या आधी ‘या’ भारतीय चित्रपटातील VFX तंत्रज्ञानाने जिंकली प्रेक्षकांची मने

रोबोट 2.0 (Robot 2.0)

रोबोट चित्रपटाचा पुढचा भाग 'रोबोट 2.0' चित्रपटात अक्षय कुमार आणि रजनीकांत एकमेकांसमोर मुख्य भूमिकेत होते.

ब्रह्मास्त्रच्या आधी ‘या’ भारतीय चित्रपटातील VFX तंत्रज्ञानाने जिंकली प्रेक्षकांची मने

अनियन (Anniyan )

‘अनियन’ हा तामिळ चित्रपट ज्यात विक्रम याने साकारलेलं पात्र हे मनोरुग्ण असते. विक्रमने यात केलेल्या अभिनयाचे कौतुक झाले होते. यातील काही सीन्स हे vfx तंत्राज्ञानावर चित्रित केले गेले होते.

ब्रह्मास्त्रच्या आधी ‘या’ भारतीय चित्रपटातील VFX तंत्रज्ञानाने जिंकली प्रेक्षकांची मने

मगधीरा (Magdheera)

दिग्दर्शक राजामौली यांच्या एका चित्रपटाची चर्चा VFX करता कायम होते. तो चित्रपट म्हणजे 'मगधीरा' होय. या चित्रपटात दोन कालखंडातील प्रेमकथा दाखवण्यात आली होती. 

ब्रह्मास्त्रच्या आधी ‘या’ भारतीय चित्रपटातील VFX तंत्रज्ञानाने जिंकली प्रेक्षकांची मने

बाहुबली (Bahubali)

दिग्दर्शक राजामौली कायमच प्रेक्षकांसाठी भव्यदिव्य कलाकृती घेऊन येत असतात. त्यांच्या, ‘बाहुबली’ चित्रपटाने मोठ्या प्रमाणावर कमाई केली होती. यात वापरलेल्या vfx तंत्राची चर्चा हॉलिवूडपर्यंत झाली होती. तब्बल 5 वर्षे  चित्रपटावर काम केलं गेलं आहे.

ब्रह्मास्त्रच्या आधी ‘या’ भारतीय चित्रपटातील VFX तंत्रज्ञानाने जिंकली प्रेक्षकांची मने

बाहुबली 2 (Bahubali 2 )

बाहुबली चित्रपटाच्या दुसऱ्या भागाने देखील प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. यात वापरलेले VFX तंत्रज्ञान प्रेक्षकांनी अगदी डोळे मोठे करून बघितले चित्रपटात प्रभास आपटत णि तमन्ना भाटिया मुख्य भूमिकेत होते. 

ब्रह्मास्त्रच्या आधी ‘या’ भारतीय चित्रपटातील VFX तंत्रज्ञानाने जिंकली प्रेक्षकांची मने

रा वन  (RA ONE )

यादीतील पुढील बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा रा वन हा चित्रपट होय. या चित्रपटात शाहरुखने एका सुपरहिरोची भूमिका निभावली होती. या चित्रपटात देखील जबरदस्त VFX वापरण्यात आले होते. 

ब्रह्मास्त्रच्या आधी ‘या’ भारतीय चित्रपटातील VFX तंत्रज्ञानाने जिंकली प्रेक्षकांची मने

मख्खी (Makhhi)

बाहुबलीचे दिग्दर्शक राजामौली यांच्या ‘मक्खी’ चित्रपटात देखील VFX वापरण्यात आले आहेत. या चित्रपटावर बऱ्याच टीका झाल्या. मात्र, या चित्रपटाने लोकांचे मनोरंजन नक्कीच केले. 

ब्रह्मास्त्रच्या आधी ‘या’ भारतीय चित्रपटातील VFX तंत्रज्ञानाने जिंकली प्रेक्षकांची मने

शिवाय (Shivay )

अजय देवगण दिग्दर्शित ‘शिवाय’ हा चित्रपट vfx आणि व्हिजुअल इफेक्ट्सने पुरेपूर भरला होता.  

ब्रह्मास्त्रच्या आधी ‘या’ भारतीय चित्रपटातील VFX तंत्रज्ञानाने जिंकली प्रेक्षकांची मने

झिरो (Zero)

शाहरुख खानचा ‘झिरो’ हा चित्रपट काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. मात्र चित्रपटात वापरले गेलेले तंत्रज्ञान नक्कीच स्तुतीस पात्र आहे.

ब्रह्मास्त्रच्या आधी ‘या’ भारतीय चित्रपटातील VFX तंत्रज्ञानाने जिंकली प्रेक्षकांची मने

तानाजी: द अनसंग वॉरियर (TANAJI : THE UNSUNG WORRIOR) 

अजय देवगणचा हा चित्रपट तान्हाजी: द अनसंग वॉरियर हा चित्रपट 3D मध्ये प्रदर्शित झाला. याबाबत अजय म्हणाला, 'तुम्ही जेव्हाही चित्रपट पाहाल तेव्हा तुम्हाला त्यात जे काही व्हिज्युअल्स आहेत, ज्या प्रकारचा थ्रीडी वापरण्यात आला आहे ते दिसेल. आजपर्यंत आपल्या देशात त्याचा वापर झालेला नाही.

ब्रह्मास्त्रच्या आधी ‘या’ भारतीय चित्रपटातील VFX तंत्रज्ञानाने जिंकली प्रेक्षकांची मने

RRR 

राजामौली दिग्दर्शिका RRR चित्रपटाने बॉक्स ऑफिस जोरदार कमाई केली. या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. 

ब्रह्मास्त्रच्या आधी ‘या’ भारतीय चित्रपटातील VFX तंत्रज्ञानाने जिंकली प्रेक्षकांची मने

KGF 

K.G.F: Chapter 1 चित्रपटाने त्याच्या VFX मुळे रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. चित्रपटाच्या इतर भागांनी सुद्धा प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. 

ब्रह्मास्त्रच्या आधी ‘या’ भारतीय चित्रपटातील VFX तंत्रज्ञानाने जिंकली प्रेक्षकांची मने

ब्रह्मास्त्र (Brahmastra)

रणवीर कपूर आणि आलिया भट्ट अभिनित ब्रह्मास्त्र चित्रपट अलीकडेच रिलीज झाला. या चित्रपटातील VFX तंत्रज्ञानाने प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले. या चित्रपटाने शेवटपर्यंत जोरदार कमाई केली.